Breaking News
सातारा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्य निसर्ग सौंदर्याचा मेरुमणी आहे. याच जिल्ह्यातून देशातील प्रमुख नदी, कृष्णा, कोयना उगम पावतात. याच जिल्ह्यात कायेनेसारखे महाकाय धरण, महाबळेश्वर सारखे थंड हेवेचे ठिकाण, देशातल पहिल पुस्तकाचं गाव भिलार, देशातल सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून गौरवलेल पाचगणी? आणि देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून पंतप्रधानांनी गौरविले, त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या स्वच्छतेची ख्याती जगभर पासली आहे. हागणदारी मुक्त जिल्हा, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन जिल्ह्याने केले नियोजनबद्ध काम यावर प्रकाश टाकणारा हा लेख?.!! सातारा जिल्ह्यात एकूण 1 हजार 500 ग्रामपंचायतीर आहे. यापैकी 1 हजार 437 ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार मिळालेला आहे. तसेच जिल्ह्यात 11 पंचायत समितीत्या असून त्यापैकी 4 पंचायत समितीत्या निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त आहेत. जिल्हा परिषदेच्या 2 हजार 703 शाळा असून या शाळेंमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा जिल्हा परिषदेने उपलब्ध करुन दिली आहे. तसेच 4 हजार 810 अंगणवाड्यांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सातारा तालुक्यातील 194 ग्रामपंचायती, कोरेगाव 141, खटाव 131, माण 95, फलटण 128, वाई 99, खंडाळा 63, जावली 125, महाबळेश्वर 79, कराड 199 आणि पाटण मधील 236 ग्रामपंचायती असे एकूण 1 हजार 490 ग्रामपंचायती हाणदारीमुक्त झाल्या आहेत. तसेच केंद्र शासनाच्या 2012 पायाभूत सर्वेक्षणानुसार 4 लाख 70 हजार 870 कुटंबाना वैयक्तीक शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच 223 ग्रामपंचायतींपैकी 159 ग्रामपंचायतीत घनकचरा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून 67 प्रगती पथावर आहेत. वाई तालुक्यातील बावधन, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ, सातारा तालुक्यातील काशिळ, अतीत, नागठाणे, शिवथर, तासगाव, लिंब, क्षेत्र माहुली, बोरगाव, अपशिंगे, वडूथ, अंगापूर, मालगाव, पाटखळ, शेंद्रे, खोजेवाडी, कोरेगाव तालुक्यातील कुमठे, साप, वाठार की., तारगाव, आर्वी, खटाव तालुक्यातील डिस्कळ, कटगुण, म्हासुर्णे, विसापूर, भोसरे, औंध, पुसेगाव, निमसाड, फलटण तालुक्यातील, कोळकी, वाठार निं, जाधववाडी फ, साखरवाडी, कराड तालुक्यातील किवळ, बनवडी, हजारमाची, पार्ले, येळगाव, गोळेश्वर या गावातील ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु केले आहे. स्वच्छतेचे धडे शाळेतून व महाविद्यालयातून मिळावे यासाठी 2 हजार 773 शाळा व 744 महाविद्यालये असे एकूण 3 हजार 517 शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी शालेय विद्यार्थी स्वच्छता मतदान हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये 3 लाख 95 हजार 595 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्लॅस्टिक मुक्ती अभियान सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये प्लॅस्टिक मुक्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये शाळा व महाविद्यालयातील 2 लाख 24 हजार 485 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून 47 हजार 374 किलो प्लॅस्टिक संकलन केले. स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षण-2018 स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षण -2018 अभियानाची घोषणा 13 जुलै 2018 रोजी झाली. यानुसार स्वच्छ सर्वेक्षण प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 ते 30 ऑगस्ट 2018 या कालावधीत करण्यात आली. 1 लाख 28 हजार 328 लोकांनी या अभियानात अभिप्राय नोंदविला आहे. केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये संपूर्ण देशातील 718 जिल्हयाचे स्वच्छता सर्वेक्षण केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 16 गावांची केंद्रीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली होती. तपासणीच्या घटकांमध्ये प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, बाजारस्थळे, धार्मिक ठिकाणांची शौचालय उपलब्ध, वापर तसेच सार्वजनिक परिसरांची स्वच्छता या निकषांच्या आधारे तपासणी करण्यात आली होती. एकूण 100 गुणांकणामध्ये सेवास्तर प्रगतीचे 35 पैकी 35 गुण व ग्रामस्थांच्या प्रतिसादाचे 35 पैकी 33.46 गुण व थेट परिक्षणाचे 30 पैकी 29.44 गुण असे एकत्रीत 100 पैकी 97.90 या आधारे संख्यात्मक व गुणात्मक परीक्षण कंतार या केंद्र शासनाच्या त्रेयस्थ संस्थेमार्फत गुण देण्यात आले. या गुणांनुसार देशातील पहिला स्वच्छ जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची निवड झाली. 2 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांचा दिल्ली येथे सन्मान करण्यात आला. - युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
समुद्र सपाटी पासून तब्बल १२०० मीटरवर ... जिथ चाळकेवाडीच्या पठारावर पवन चक्यांचा पार्क उभा आहे त्याच्याही वर हवेचा अवेग पावसाळ्यात माणूसही उडून जाईल असा असतो ... अशा डोंगर रांगात ४ एकर जागेत रेवंडे (ता. सातारा ) गावचा युवक प्रमोद भोसलेनी कृषी विभागाच्या सहकार्याने सहा जणाना सोबतीला घेवून चक्क सामुहिक शेत तळे उभ केल आहे ... मुंबई विद्यापीठातून एम. एस्सी ( परफ्युम ऐंड कॉस्म्याटिक ) विषयातील पदयुत्तर शिक्षण घेतलेला चार वर्षे अत्तर बनविणा- या कंपनीत काम करुन .... हिमालया एवढी स्वप्न घेवून परळीच्या खो- यातल्या उंच गिरीशिखरावर आपल नशीम आजमावतो आहे.... पहिल्यांदाच एक कोटी लीटर क्षमतेच शेततळे जवळपास ६० टक्के भरलेल आहे. सध्या एक झेंडूचा सीजन प्रयोग म्हणून घेवून झालेला आहे. आता सीट्रोडोरा ,सिट्रोनेला या सुगंधीत वनस्पती त्यांनी दुर दुरच्या पर्वत राजीतून आणल्या आहेत ..... लेमन ग्रासचीही लागवड केली आहे. आणि त्या वनस्पतीचा सुगंध तिथे गेल्या गेल्या नखशिखांत भारुन जातो आहे. इथे लाईटची व्यवस्था नाही पण पाण्याची व्यवस्था गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रयोगातून केली आहे. कालच त्याच्या शेतकरी गटाला कृषी विभागाने मान्यता दिली आहे. तो आता इथल्या शेतकऱ्यांना घेवून सुगंधी वनस्पतीची लागवड आणि इथेच प्रक्रिया उद्योग सुरु करणार आहे ... प्रचंड उर्जावान आणि स्वप्नाला प्रचंड मेहनतीच बळ असलेल्या या युवकाने जवळपास ६० केसर अंब्याची झाड पाणी नसताना आई वडिलांच्या सोबतीन डोक्यावर पाण्याचे हंडे घेवून एवढा मोठा डोंगर चढून जगवले आहेत. याच्या जिद्दीच्या पुढे निसर्गानेही गुढघे टेकले आहेत. आता पर्यंत निसर्गाच्या कृपेनी येइल तेवढा भात पिकवणा- या या खो- यात प्रमोदच्या प्रयत्नान सुंगध दरवळणार आहे. प्रमोद भोसलेच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या रासायनिक सुगंधाच्या इंडस्ट्रीवर मात करुन देशात नैसर्गिक सुगंध निर्माण करायच हिमालया एवढ स्वप्न घेवून हा युवक सह्याद्रीच्या पठारावर जीवाच रान करतो आहे..... आम्ही तिथे जावून त्याचे काम पाहून आभाळभर शुभेच्छा देवून परत आलो आहोत ... भविष्यातले आकाशा एवढे काम बघण्याचे स्वप्न पाहून ... प्रमोदला लाख लाख शुभेच्छा देवून .... !! @ युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी , सातारा
सातारा, : साताऱ्या पासून १५ किलोमीटर अंतरावर धावडशी हे गाव आहे. मेरुलिंग डोंगर कुशीत असलेल्या या गावात पावसाळ्यात चांगला पाऊस होतो. मोठ्या प्रमाणावर डोंगरी क्षेत्र असल्यामुळे छोट्या-छोट्या नाल्या वाटे हे पाणी वाहून जायचे आणि उन्हाळ्यात डोंगर बोडके व्हायचे आता मात्र या सीसीटी मुळे डोंगराच्या गर्भातही पाणी साठून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळे आता डोंगर सदाहरित राहतील अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. हे गाव २०१६- २०१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात आले. त्यात संरक्षित सिंचनासाठी डिप सीसीटी , लूज बोल्डर, छोटे तलाव , बंधारा रुंदीकरण असे मोठ्या प्रमाणात कामे झाली. आता या भागातला पाण्याचा थेंबनाथेंब इथे मुरतो आहे. पाण्याची पातळी कमालीची वाढली असून आता हाच उत्साह कायम ठेवून हे पाण्याचे स्त्रोत असेच बळकट ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार असल्याचे धावडशी ग्रमास्थांनी सांगितले. धावडशी या गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची पहाणी करण्यासाठी कृषी विभाग व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आज पत्रकार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, मंडल कृषी अधिकारी रविराज कदम, भरत रणवरे, कृषी सहायक अजय पवार यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत धावडशी या गावात सिमेंट बंधारे 5, माती नालाबांध 5, अनघड दगडी बांध 104, यांत्रिकीकरण विभागामार्फत 140 हेक्टरवर खोल सलग समतल चराचे काम, 15 हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चर अशा विविध कामांमुळे 120.45 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे पिक पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. जयलुक्तच्या कामांपूर्वी या गावामध्ये फक्त ज्वारी आणि सोयाबीन पिके घेतली जात होती आता ऊस, हळद, आले यासारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असून येथील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली झाली आहे. यामुळे आता गावातील तरुण गावातच शेती व शेतीपुरक व्यवसाय करु लागला आहे. श्रीरंग पवार : आमच्या गावात चांगला पाऊस पडतो. पण आमचे गाव मेरुलिंग डोंगर लगत असल्यामुळे हे पाणी वाहून जायचे. जलयुक्त शिवार अभियानात आमच्या गावाची निवड झाली. या अभियानातून आमच्या गावात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. तसेच डोंगरा लगत 150 हेक्टरवर डीपसीसीटीची कामे केली. तसेच गावालगत सिमेंट बंधारे बांधली. डीपसीसीटीमुळे शिवारात पडणारा पाऊस हा शिवारात मुरु लागला. आमच्या गावातील सर्व सिमेंट बंधारे पाण्याची तुडूंब भरुन वाहत आहे. जलयुक्त शिवार अभियान कामा पूर्वी आम्ही फक्त ज्वारीचे पिक घेत होतो. आता आम्हाला शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यामुळे आले, हळद, ऊस अशी नगदी पिके घेवू लागलो असून येथील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे. विठ्ठल ढेंबे : आमच्या गावात भरपूर पाऊस होतो पण आमचे गाव डोंगर माथ्यावर असल्यामुळे पाणी टीकत नव्हते. मला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सन 2016-17 मध्ये विहिर मंजूर झाली. मला 2 लाख 63 हजार रुपयांचे अनुदान मिळाले. याच वर्षी गावामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठी कामे झाली. या कामांमुळे माझ्या विहिरीची पाणी पातळी आता 48 फुट आहे. यंदाच्या वर्षी भात, भुईमूग, घेवडा, सोयाबीन अशी पिके घेतली आहे. आता मी ज्वारी पेरली असून या ज्वारीला तिन वेळा पाणी देईन येवढे पाणी माझ्या विहिरीत आहे. जयलुक्त शिवारच्या कामांमुळे पाण्याची परिस्थिती पूर्वी पेक्षा खूप बदललेली आहे. याचा आता आम्हाला फायदा होत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग अवर्षण प्रवण म्हणून ओळखला जातो. उंचच उंच डोंगर कडा आणि त्याखाली खडकानी भरलेली लालसर ओबडधोबड नेहमीच तहानलेली जमीन? अशाच तहानलेल्या डोंगराळ खडकाला पाणी पाजणाऱ्या एका शेतकऱ्याची ही प्ररेणादायी कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी म्हणून हा लिहण्याचा प्रपंच तुमच्यासाठी?!! कोरेगाव तालुक्याचा उत्तरेचा भाग म्हणजे सह्याद्रीच्या सावलीचा प्रदेश त्यामुळे पर्जन्यमान अतिशय कमी .. याच भागात जाधववाडी गाव आहे ... या गावच शिवार म्हणजे चक्क खडकांचा , डोंगर माथ्याचा ...म्हणजे कुसळ उगवतानाही खुप कुतत उगवत असेल .... शेकडो एकर रान असाच कुसळ गवताच ... आमची गाडी वाटार स्टेशन वरुन वळून उत्तरेला निघाली .... दहा किलोमीटर डांबरी रस्त्यावरुन जावून ... डोंगर रस्त्याच्या कच्या मार्गाला गाडी निघाली .. समोर जणू डोंगर रस्त्यासाठीच मोटार सायकल बनवलेली असावी असे मोटरसायकल स्वार जात होते आम्हाला गंतव्यस्थान कुठे कळत नव्हते .. माणसालाही चालता येणार नाही असा डोंगर रस्ता .. आजूबाजूला प्रचंड झाडाझुडपाची गर्दि ... आपण जंगलात चालोय असा भास होणारा रस्ता .... एक किलो मीटर , दोन किलो मीटर रस्ता काही सरायचा मार्गच नाही ... समोर डोंगर दिसतोय ... हा माणूस डोंगरावर तर नेणार नाही ना असे वाटत असतानाच तीन साडे तीन किलोमीटर मोठ्या मुस्किलीन आलो ... तितक्यात वाळवंटात ओयायसिस चमकावे तसे पाणी आणि शेती दिसली ... आणि तिथे जावून गाडी थांबली ... शेतकरी पुढे आले ... माझ नाव रामचंद्र जाधव .. सहा वर्षापूर्वी हे बाप दादाच डोंगराळ रान शेत करायच हे मनी ठरवल .. एक मुलगा मिलटरीत दुसरा माझ्या सोबतीला ... घरची मंडळी यांना घेवून लागलो कामाला ... दिड दोन वर्षात आमच्या सोळा एकर जमिनी पैकी बारा एकर जमिन ... मोठ्या हिम्मतीन मोठ्मोठे दगड काढून गाळाची शेकडो ट्रॅक्टर माती आणून टाकली आणि शेती योग्य जमिन केली. खालच्या बाजुला ओढा आहे तिथे विहीर खोदली ... कूपनलिका घेतली ...कृषी विभागाच्या मदतीने शेततळे खोदले त्याच्या तांत्रिक बाजू सगळ्या मजबूत करुन.... विहिर आणि कूपनलिका मध्ये जे पाणी असेल ते यात घेतल ... शेती करायला घेतली ... आम्ही कुटुंबानी रक्त ओतून केलेल हे काम दोन वर्षापूर्वी फळाला आल ...रोजगार हमी योजनेची मदत घेवून डाळींब लावल ... ते डाळींब मोठ होइपर्यंत अंतर पीक म्हणून आल घेतल ... टोम्याटोचा प्लॉट लावला ... आल झाल पाच लाखाच आणि टोम्याटोही चार एक लाखाच झाल आणि जिंदगानीच चांगभलं झाल ... रात्रीचा दिवस करुन डोंगर फोडून शेती करण्याच येड धाडस केल त्याला लागलेल हे फळ बघुन रानातल पाणी आनंदानी डोळ्यात येत आणि हिम्मत दोगुणा वाढते ... यावर्षा फक्त अडीचशे मिलीमीटर पाऊस होवूनही माझ्या पिकाला पुरेल एवढ पाणी माझ्याकड आहे ते पुरवून ठिबकनीच वापरतो .... हे सगळ सांगताना कधी असू तर कधी हसू रामचंद्ररावांच्या चेहऱ्यावर होते ... मी ते भाव टिपत होतो आणि कौतुकाचे हिमालय मनात बांधत होतो ... या माणसाच्या कष्टाच मोल त्याच्या हास्यात होते ... माझ्याकडून शब्दात केलेल कौतुक त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य गुलाबी करण्यापुरत होत ... पण हे सगळ शब्दाच्या पुढच काम आहे ... हे असे भगीरथवादी लोक कष्टाच्या व्याख्याला यशात बदलवतात त्यावेळी पुन्हा सुस्कारा घेवून इथे कष्टाला फळ लागतात गडे असे वाटूंन हायसे वाटते ... आणि दगडाची माती करुन ... मातीला पाणी पाजणा -या रामचंद्ररावांचा निरोप घेवून आम्ही आणखी एका अनुभवाच्या श्रीमंतीत भर पडल्याच समाधानानी परततो .... !! - युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ?सी-व्हिजिल? हे नवे मोबाईल ॲप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. कोणताही नागरिक निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटात कार्यवाही होणार आहे. त्यामुळे हे ॲप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरणार आहे. निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी या ?सी-व्हिजिल? ॲपची निर्मिती भारत निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे. पूर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून, त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे, तसेच सबळ पुराव्याअभावी संबंधितांवर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन ॲपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत. ?सी-व्हिजिल? हे ॲप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नाविन्यपूर्ण अस्त्र असणार आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. हे ॲप यूजर फ्रेंडली असून त्याचा वापर अत्यंत साधा आणि सोपा आहे. या ॲपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून ते मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. अॅपची विशिष्ट्ये म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हीडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि ?जीपीएस? प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही ॲड्रॉईड (जेलीबीन आणि वरील) स्मार्टफोनवरून या ॲपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येवू शकते. तीन टप्प्यात ही तक्रारीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांने त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जी.पी.एस.) स्वयंचलित स्थान मॅपिंगसह अॅपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्याच्यानंतर त्या तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशाप्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात, प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. अॅप वापरकर्त्यास ?सी-व्हिजिल? अॅपद्वारे आपली ओळख लपवून सुध्दा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाइल नंबर आणि इतर प्रोफाइल तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास पुढील स्थिती संदेश मिळणार नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई होणार आहे. दुसरा टप्पा नागरिकाने तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल. त्यानुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या 'जीव्हीआयजीआयएल अन्वेषक' नामक जीआयएस-आधारित मोबाइल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या 15 मिनिटाच्या आत पोहोचणे अपेक्षित आहे. संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास व तक्रारीतील तथ्यांची तपासणी करून त्या संबंधीचा अहवाल ॲपद्वारेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तातडीने पाठवतील. हा कालावधी 30 मिनीटापेक्षा अधिक नसेल. तिसरा टप्पा भरारी पथकाने तक्रारीवर कारवाई केल्यानंतर क्षेत्रीय अहवाल तपासकाने ॲपद्वारेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्यावर, त्या घटनेतील तथ्य, पुरावा आणि अहवालाच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकारी ती तक्रार ड्रॉप करावयाची, निकाली काढावयाची की पुढे पाठवायची याचा निर्णय घेतील. जर त्या तक्रारीत तथ्य आढळले तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटांच्या आत तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रार कर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होईल. ॲपचा दुरूपयोग होवू नये म्हणून... ?सी-व्हिजिल? चा उपयोग केवळ निवडणूक होत असलेल्या राज्यांच्या भौगोलिक सीमाअंतर्गतच करता येईल. फोटो अथवा व्हीडिओ क्लिक केल्यानंतर ?सी-व्हिजिल? वापरकर्त्यास केवळ पाच मिनिटांचा अवधी मिळेल. हे ॲप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंची अपलोड करण्याची परवानगी देणार नाही. अॅपवरून क्लिक केलेले फोटो अथवा व्हिडिओ थेट फोन गॅलरीमध्ये जतनही करता येणार नाहीत. एकसारख्या तक्रारीच्यादरम्यान किमान पाच मिनिटांचा विलंब करावा लागतो. जिल्हा नियंत्रण कक्ष भरारी पथकाला नेमण्याआधीही डुप्लिकेट, फ्रिवोलस आणि असंबंधित प्रकरणे ड्रॉप करण्याचा पर्याय आहे. ?सी-व्हिजिल?चा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जाणार. याशिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मुख्य वेबसाइटचा वापर करावा, अथवा 18001119 50 संपर्क साधावा. किंवा राज्य संपर्क केंद्रावर 1 9 50 मध्ये राष्ट्रीय संपर्क केंद्राला कॉल करा. यासाठी ?सी-व्हिजिल? करता येईल तक्रार मतदारांना पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचे वाटप. शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर. मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात. जमावाला चिथावणीखोर भाषण देणे. पेड न्यूज आणि फेक न्यूज संबंधी. मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर. मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे. उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी. ?सी-व्हिजिल?ची तक्रार योग्य असल्यास संबंधितांवर प्राथमिक माहिती अहवाल (एफआयर) नोंदविला जाईल. संबंधितांवर क्रिमीनल ॲक्शन होणार. कारवाईतील रोख रक्कम जप्त होणार. कारवाईतील मद्य अथवा अमली पदार्थ जप्त होणार. -संग्राम इंगळे, विभागीय माहिती कार्यालय, पुणे. (संदर्भ : भारत निवडणूक आयोग अधिकृत संकेतस्थळ)
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे आणि निवडणूक दुस-या टप्प्याला येऊन भिडली आहे. यादरम्यानच्या काळात महाराष्ट्रात राज ठाकरे यांचे वादळ घोंघावू लागले आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सहा एप्रिलला त्यांनी आपण महाराष्ट्रात काही सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर नांदेड, सोलापूर आणि इचलकरंजी येथे त्यांच्या सभा झाल्या. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघ विदर्भातील होते, त्यामुळे राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेचा प्रभाव तिथपर्यंत पोहोचणं कठीण होतं. शिवाय नागपूरमधून नितीन गडकरी यांच्यासारखा भाजपचा हेवीवेट उमेदवार उभा होता आणि नागपूरसह बाकीच्या विदर्भातही वारे उलटे फिरू लागल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. निवडणूक जाहीर झाल्यानंतर बरेच दिवस ज्या विदर्भात युतीची एकतर्फी हवा होती, तिथे काही दिवसांतच वातावरण बदलल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि गडकरींची सीटही धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली. बाकी ठिकाणीही युतीच्या उमेदवारांपुढे कठिण आव्हान असल्याची चर्चा होऊ लागली. अशी हवा असते तेव्हा ती कुणी कृत्रिमरित्या निर्माण करतो म्हणता करता येत नाही. सोशल मीडियाच्यामार्फत जे वातावरण निर्माण केले जाते, ते वरवरचे असते. अर्थात त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली नाही तर पुढे परिस्थिती बिघडू शकते. त्याअर्थाने सोशल मीडिया महत्त्वाचा असतोच. परंतु सगळे काही तिथे दिसते तसे नसते. प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती वेगळी असू शकते. परंतु प्रत्यक्षात जे वातावरण असते, त्याचे वारे वाहू लागतेच. जसे २०१४च्या निवडणुकीत ते वाहू लागले होते. मतमोजणीच्या आधीच सोलापूर, भंडारा, सांगलीसारख्या जागांवरच्या निकालांचा अंदाज आधीच आला होता. तर मुद्दा आहे राज ठाकरे यांच्या सभांचा. मधल्या काळात नांदेड, सोलापूर, इचलकरंजी येथे त्यांच्या सभा झाल्या आणि त्या सभांचा जो काही परिणाम दिसू लागला आहे, त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या गोटातली हवा टाईट झाली आहे. उसने अवसान आणून त्याचा कुणी प्रतिकार करीत असतील तर ती त्यांची जबाबदारी म्हणून ठीक आहे. परंतु त्याला फारसा अर्थ नाही. राज ठाकरे यांचा कुणी उमेदवार नाही, मतदारांनी पाठ फिरवलेला पक्ष आहे, उमेदवार नसलेला पक्ष आहे, बारामतीची सुपारी घेऊन काम करताहे, काँग्रेसकडून पैसे घेऊन सभा घेताहेत असे एक ना अनेक आरोप राज ठाकरे यांच्यावर केले जात आहेत. हे सगळे भाजप स्टाइलने चालले आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षावर कुणी आरोप केले, तर त्याचे मुद्देसूद उत्तर देण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. उलट आरोप करणारावर प्रत्यारोप करून त्याच्यावर ट्रोल गँग सोडण्याचे प्रयत्न झाले. तेच इथेही केले जातेय. राज ठाकरे जी वस्तुस्थिती मांडताहेत, भाजपची जी पोलखोल करताहेत त्याचा मुद्देसूद प्रतिवाद करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. राज ठाकरे सुपारीबहाद्दर आहेत, असे क्षणभर गृहित धरले तरी ते नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचा जो खोटारडेपणा लोकांसमोर पुराव्यानिशी मांडताहेत त्याची वस्तुस्थिती तर बदलत नाही. राज ठाकरे यांची उमेदवार उभे करण्याची औकात नाही, असेही क्षणभर गृहित धरले म्हणून नरेंद्र मोदी यांचा दुटप्पीपणा खरेपणात परिवर्तीत होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या भाजपच्या देशातील शीर्षस्थ नेत्यांना आणि महाष्ट्रातील एकमेव नेते देवेंद्र फडणवीस यांना राज यांनी टार्गेट केले आहे. भाजपवाल्यांच्यादृष्टीने सुदैवाची बाब एवढीच की ते नाव घेऊन टीका करताहेत त्यामुळे प्रतिवाद करण्याची तरी संधी आहे. शिवसेनेची अवस्था त्याहून वाईट आहे. सध्या माध्यमांत आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या सभांमध्ये शिवसेनेचा नामोल्लेखसुद्धा येत नाही. अशा प्रकारे अनुल्लेखामुळे शिवसेनेवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची पाळी आली आहे. थोरल्या भावावर (नरेंद्रभाई) टीका होत असताना धाकट्या भावाला(उद्धवजी) त्याचा प्रतिवाद करता येत नाही, हे किती दुर्दैव म्हणायचे! तर मुद्दा आहे, राज ठाकरे यांच्या सभांमुळे नेमके काय साधते आहे हा. पहिली गोष्ट म्हणजे सत्तेची मग्रूरी आणि भाडोत्री ट्रोल्सच्या जिवावर कुणालाही सळो की पळो करून सोडणा-या भाजपला कुणीतरी त्यांच्यापेक्षा धटिंगण मैदानात भिडले आहे. संसदीय राजकारणात ज्याची ताकद शून्य आहे आजघडीला, परंतु रस्त्यावरच्या लढाईची मोठी ताकद आहे. त्यामुळे जसे सत्तेच्या आणि सरकारी एजन्सीजच्या बळावर इतर पक्षांच्या मोठमोठ्या नेत्यांना घाबरवता येते तसे राज ठाकरे यांना घाबरवणे भाजपला शक्य नाही. राहिला मुद्दा ट्रोल्सचा. तर राज ठाकरे यांच्याकडे ट्रोल्सची तशीच तगडी गँग आहे.(ती भविष्यात त्यांना अडचणीत आणणार आहेच.) शिवाय ही गँग भाजपच्या ट्रोल्सना घरी जाऊन फटकावते, हेही अलीकडे सोशल मीडियावर पाहण्यास मिळाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात अजूनही संशयास्पद म्हणता येईल अशा प्रकारचे वातावरण होते. त्यांनी निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांचा पार बो-या वाजला असला तरीसुद्धा खोट्या जाहिराती आणि राष्ट्रवादाचे भांडवल करून ते लोकांना पुन्हा संमोहित करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीमध्ये काहीसा कुंपणावर असलेला मोठा वर्ग आहे, जो नरेंद्र मोदी चांगले की वाईट हे ठरवू शकलेला नाही. काँग्रेसचा जो प्रचार आहे, तो अत्यंत सुमार दर्जाचा आहे. राफेलचा घोटाळा राहुल गांधी यांनी लावून धरला, ही प्रशंसनीय बाब आहे. परंतु तरीसुद्धा राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्याला अद्यापही नरेंद्र मोदी यांच्या विश्वासार्हतेवर निर्णायक घाव घालता आलेला नाही. त्यामुळे `पाच वर्षांत माणूस काय करणार, आणखी थोडा काळ द्यायला पाहिजे?` असं वाटणारा मोठा वर्ग आहे किंवा होता. आणि तोच नरेंद्र मोदी यांचा मोठा आधार होता. त्यालाच राष्ट्रवादाची गोळी देऊन अंकित करण्याचे मोदींचे डावपेच होते. परंतु अनपेक्षितपणे महाराष्ट्राच्या प्रचार मैदानात उतरलेल्या राज ठाकरे यांनी भाजपची बाजी उलटवली आहे. मोदी-शहा यांची राजवट अनेक अर्थांनी वाईट आहे, हे लोकांना पटवून देण्यात राज ठाकरे यशस्वी होताना दिसताहेत. मोदी यांचा दुटप्पीपणा त्यांच्या जुन्या-नव्या क्लिपसह ते लोकांसमोर मांडत आहेत. त्यामुळे त्यावर जास्ती बोलावे लागत नाही. डिजिटल गाव हरिसालची स्टोरी त्यांनी गुढी पाडवा मेळाव्यातही दाखवली होती. परंतु सोलापूरच्या सभेत त्यांनी त्या स्टोरीतील मॉडेलला स्टेजवर आणून धक्कातंत्राचा अवलंब केला. त्यांची प्रत्येक सभा हा स्वतंत्र शो असे मानले तर त्यांना प्रत्येक सभेत, किमान एकाआड एका सभेत काही नवे मुद्दे मांडावे लागतील. तरच अखेरपर्यंत त्यांच्या सभांचे कुतूहल संपूर्ण महाराष्ट्रभर टिकून राहील. काही नवे मांडले नाही तरी ज्या भागात सभा होईल, तिथे तिचा प्रभाव जाणवेलच. परंतु राज्यभर कुतूहल टिकवून ठेवायचे तर नवनवे मुद्दे आणावे लागती, काही सरप्राइज इलेमेंटही असावे लागेल. काहीही असले तरी राज ठाकरे यांच्या सभांची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. आठ नोव्हेंबर २०१६ नंतर भारतीयांनी `मित्रों....` आणि `भाईयों और बहनो.....` या दोन संबोधनांचा धसका घेतला होता. आता भाजपच्या लोकांनी अशाच एका वाक्याचा धसका घेतलाय. भाजपच्या नेत्यांना म्हणे रात्री, अपरात्री स्वप्नातही तोच आवाज ऐकू आल्याचा भास होतो, `एsss लाव रे.....` - फेसबुकवरुन साभार
पदवीच्या पहिल्या वर्षाला शिकत असताना मोठ्या उत्साहाने पुस्तके वाचायचो एकदा नाहीतर अनेकदा. त्यापैकी बाबुराव बागुल यांची 'मरण स्वस्त होत आहे' ही कथा वाचून जवळपास पाठ झाली होती. कथा वाचताना त्यातील पात्रं व त्यांच्या वाट्याला आलेल दु:ख यामुळे मन सून्न व्हायच. त्यावेळी पदवीचा विद्यार्थी म्हणून जीवन जगताना आणि आता दैनंदिन जीवन जगताना ही कथा माझी पाठ सोडत नाही. आजही मानवी जीवनाच्या पदवीने ही कथा पुन्हा आल्याची जाणीव होते. वर्तमानपत्र वाचताना विनाअनुदानित शाळेतील शिक्षकाने आत्महत्या केल्याचे वाचनात आले. सुसाइड नोट वाचून मन उद्विग्न झाले. मला माफ करा, पिल्लूला खुप शिकवा, संस्थेत भरलेले पैसे परत घ्या पिल्लूला उपयोगी येतील, पत्नीला तु स्पर्धा परीक्षा देत रहा ज्यज हो हिंमत हारू नको, मला हा त्रास आता सहन होत नाही. अस काय काय लिहिल होत. स्वतः खचलेला हा शिक्षक जग सोडून जातानाही कुटुंबाला प्रेरणा देऊन शिक्षक धर्माच पालन तंतोतंत करत होता. पुरोगामी महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये अौषधे न मिळाल्याने नवबाळंत महिलेने विष प्राशन करून मानवी जीवनातील सर्व प्रश्नांनाच तिलांजली दिली. कदाचित प्रधानसेवकांची म्हणजे आत्ताच्या चौकीदारांची 'आयुष्यमान भारत' ही योजना तिच्या पर्यंत पोहचली नसावी. जेवणाला मटण केले नाही म्हणून पतीने पत्नीला ठार मारल्याचे मध्यंतरी वाचनात आले. पत्नीच्या जीवाचे मोल एक वेळच्या मांसाहारी जेवणा इतके असू शकते याची कल्पना कोणी केली नसावी. आपल्या पेक्षा मोठी इयत्ता बारावीत शिकणारी बहिण तिच्या मित्रासोबत फोनवर बोलते हा आपल्या अस्मितेचा प्रश्न करून तिच्या पेक्षा लहान इयत्ता दहावीत शिकणाऱ्या भावाने तिचा गळा चिरून खून केला. कदाचित बहिणी पेक्षा आपली इज्जत अन् प्रतिष्ठा खूप मोलाची आहे असे संस्कार समाजाकडून अप्रत्यक्षपणे त्याच्यावर झाले असावेत. मोबाईल मुळे समाजात मोठी क्रांती झाली. या क्रांतीचा परीणाम मुलांवरही होणे सहाजिकच. एकेकाळी मैदानावर रमणारी मुलं आता मोबाईलवर रमतात. मध्यंतरी ब्लू व्हेल गेम खेळून मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या एेकल्या होत्या. आता ब्लू व्हेलची जागा पबजीने घेतली आहे. या गेम साठी मुले आता सख्या दाजीचा खून करू शकतात प्रसंगी आत्महत्याही करू लागली आहेत. खेळासाठी जीव द्यायचा व प्रसंगी घ्यायचा ही आजच्या देवा घरच्या फुलांची निरागसता आहे. का ? मुलांच्या मनात निरागसता राहू नये म्हणून असे गेम तयार केले जातात असा प्रश्न निर्माण होतो. रेल्वेतून पडून मृत्यू, शेजारच्याने कचरा दारात टाकला म्हणून भोकसले, तुमची शेळी आमच्या दारात का बांधता याचा जाब विचारला म्हणून खून, पावाचा हिशोब लागेना म्हणून तुरूंगात पोलीस कैद्याला ठेचून मारतात. अशा अनेक घटना मनाला प्रश्न विचारतात की माणसाच्या जीवाचे मोल नक्की किती ? कचर्या इतके की पावा इतके, गेम्स इतके की विनाअनुदानित शाळेतील पगारा इतके का खोट्या सामाजिक प्रतिष्ठे इतके. खरं इतकेच की मरण आजही पदवीच्या कथे इतके स्वस्त नक्कीच आहे. # (राजू सोनावणे, मुंबई, लेखक शिक्षक असून मुक्त पत्रकार आहेत) #
चेन्नईहून अंदमानला जाणारे भारतीय वायूसेनेचे एएन ३२ विमान २२ जुलै २०१६ रोजी बेपत्ता झाले. त्यात संरक्षण दलाचे २९ अधिकारी आणि कर्मचारी होते. त्यांचे काय झाले पुढे कधी कळालेच नाही. तत्कालीन किंवा विद्यमान संरक्षणमंत्री, पंतप्रधान यांनीही कधी त्या घटनेचा आणि त्यात गायब झालेल्या जवानांचा उल्लेख केला नाही. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २० जवान शहीद झाले. दहशतवादी हल्ल्यात एवढ्या मोठ्या संख्येनं जवान शहीद होण्याची ही सर्वात मोठी घटना होती. सर्जिकल स्टाईक ही या घटनेनंतरची प्रतिक्रिया होती. उरीपेक्षा मोठी घटना पुलवामा येथे घडली. दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतरची प्रतिक्रिया एअर स्ट्राईक होती. एवढ्या मोठ्या दुर्घटना घडूनही सरकारमधील कुणाला यत्किंचितही लाज वाटत नाही, उलट सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या बढाया मारल्या जात आहेत. ते श्रेय सरकार म्हणून मिरवायचे असेल तर गमावलेल्या ९० जवानांच्या मृत्यूची जबाबदारीही घ्यावी लागेल. याशिवाय पठाणकोठ हल्ला आणि सीमेवर छोट्या मोठ्या चकमकीत शहीद झालेले जवान वेगळेच. या सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्यात जेवढे जवान शहीद झाले आहेत, तेवढे यापूर्वी कधीही झालेले नाहीत, त्याबद्दल यांना जराही लाज वाटत नाही आणि वर तोंड करून फुशारक्याच मारताहेत. दहशतवादाविरुद्ध लढत असल्याचे सांगत आहेत. आणि दहशतवादाच्या कटातील आरोपींना उमेदवारी देऊन धार्मिक विभाजनाचा प्रयत्न करीत आहेत. अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होता तेव्हा पंतप्रधान मोदींसह सगळ्यांची हवा टाईट झाली होती, हा इतिहास फार जुना नाही. देश अभिनंदनच्या सुखरूप सुटकेसाठी प्रार्थना करीत होता तेव्हा सरकार आणि त्यांचे पाठीराखे स्वतःची इभ्रत कशी राखायची याच्या चिंतेत होते. रविवारी गुजरात, राजस्थानमध्ये झालेल्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान मोदी नुसत्या बढाया मारत होते. अभिनंदनला सोडलं नसतं तर ती रात्र कत्तलरात्र ठरली असती, असं सांगत होते. निवडणूक प्रचारात शेजारी राष्ट्राला अणुबॉम्बची धमकी देणारे मोदी हे जगाच्या पाठीवरचे पहिले पंतप्रधान असावेत. त्यांनी कितीही आकांडतांडव केलं तरी त्यांची नाटकं भारतीय जनतेनं ओळखली आहेत. त्यांनी कितीही थयथयाट केला,दंडाच्या बेटकुळ्या दाखवल्या तरी लोक भुलणार नाहीत. त्यांनाही त्याची कल्पना आहे. परंतु तीन टप्प्यानंतर मोदींचं लक्ष वेगळ्याच मुद्यावर आहे. त्यांची सगळी अस्त्रं संपली आहेत आणि त्यांना आता पाकिस्तानकडून थोडीफार आशा आहे. आपल्याला फक्त पाकिस्तानच वाचवू शकतो याची खात्री पटल्यानं त्यांनी पाकिस्तानच्या नावाने आकांडतांडव सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान यानं भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यायला पाहिजेत, अशी सदिच्छा व्यक्त करून मोदी-शहा यांची गोची केली आहे. त्यामुळे मोदी हरले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील हा अमित शहा यांचा फेवरिट डायलॉग मारायला संधीच राहिली नाही. हाच इम्रान खान जर भारतात काँग्रेसचं सरकार यायला हवं असं म्हणाला असता तर मोदी-शहांसह सगळ्या भाजपवाल्यांनी देश डोक्यावर घेऊन काँग्रेस पक्षालाच देशद्रोही ठरवलं असतं. काँग्रेस आणि पाकिस्तानची हातमिळवणी झाली असल्याचा कांगावा केला असता. म्हणूनच आता तिसरा टप्पा संपताना मोदींनी पाकिस्तानला शिव्या घातल्या. धमकावलं. हिणवलं. त्याची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानातून कुणीही काही बोललं तरी तेवढंच धरून यांना पुढचा प्रचार गाजवता येईल. साध्वी प्रज्ञाचा पाकिस्तानातील भाऊ हाफिज सईद काही बरळला तरी मोदी-शहांना आयतं कोलीत मिळेल. त्याचसाठी मोदींनी पाकिस्तानला धारेवर धरलं आहे. बुडताना माणूस अखेरच्याअ क्षणी जिवाच्या आकांताने हातपाय मारतो तसे मोदी कत्ल की रात, आम्ही अणुबॉम्ब काही दिवाळीसाठी ठेवलेला नाही असे इशारे देत आहेत. पाकिस्तानला निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुदैवाने इम्रान खानने आपली पसंती मोदीच असल्याचे सांगून त्यांची गोची केली आहे. पण तरीसुद्धा त्यांना हाफिज सईद किंवा तत्सम कुणाकडून तरी अपेक्षा असाव्यात असं दिसतंय. त्याच उद्देशानं सगळं सुरू केलं आहे. @@@@(विजय चोरमारे, जेष्ठ पत्रकार, कोल्हापूर)@@@@ फेसबुकवरुन साभार...
झटपट म्यागीचा काळ? चार ओळीत संदेशाच्या देवाण घेवाणीचा काळ? एकेकाळी हजार शब्दांचे संपादकीय पाचशे शब्दात बसवण्याचा काळ? लोकांच्या अभिरुचीच्या संक्रमणाचा काळ? प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करुन आनंद घेण्याचा काळ? अशा काळात महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन जगप्रसिद्ध थंड हेवच्या ठिकाणाच्या मधोमध स्ट्रोबेरीच आगार अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतीम सौंदर्याने नटलेल्या? सह्याद्रीच्या रांगानी खास या गावासाठीच जणू जागा सोडली असावी अस वाटणार भिलार गाव? दोन वर्षापूर्वी पुस्तकाच गाव झालं?. त्याला उद्य दि.4 मे रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत? या दोन वर्षात या गावाने कात टाकली? मराठी साहित्याला सोनेरी झळाळी देणारा हा प्रकल्प हां? हां? म्हणता देशभर गाजला? रोजचे पर्यटक तर येतातच पण आजपर्यंत पाचशे शालेय सहली इथे आल्या? एका सहलीला सरासरी 250 विद्यार्थी धरले तर 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या गावाने मोहून टाकले? काहींना सहज चाळता चाळता त्या पुस्तकाची गोडी लागली? काहींना आयुष्यातील एक सुंदर सेल्फी पुस्तकाच्या गावातल्या बोर्डाबरोबर, चित्रांबरोबर काढून आयुष्याच्या पटावरच सुंदर चित्र म्हणून मनावर कोरुन ठेवलं? स्ट्रॉबेरीची गोडी आणि प्रत्येक पुस्तकाच्या घरात जावून फोटो काढण्याचा मोह? यातून भिलार गावाच व्याप वाढला? काही महिन्यापूर्वी आम्ही ज्या प्रतिक्रीया घेतल्या त्या वाचल्यास अधिक बोलक्या वाटतील? पुस्तकाच भारतातल पहिल गाव महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनाही भुरळ घालत आहे. तुम्ही अजून गेला नसाल तर नक्की जा. दगदगीच्या आयुष्यातून आनंदासाठी काही क्षण हल्ली माणूस वेचतो? त्यातला आनंद पुस्तकाच्या गावात पुस्तकाच्या पानासोबत शेअर करा? आयुष्यातली संस्मरणीय इव्हेंट म्हणून भिलार भेट नेहमीच काळजात कोरुन राहील? अशा भिलार विषयी दोन वर्ष पूर्तीनिमित्त घेतलेला हा आढावा खास तुमच्यासाठी? भिलार या गावात 4 मे 2017 या दिवसापासून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोख पुस्तकाच गाव भिलार साकारण्यात आलं ... आज या पुस्तकाच्या गावामध्ये 25 घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास याचे प्रत्येक घरात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालन उभी केली आहेत. निवडलेल्या 25 घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड;मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते. केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. पंचवीस घरात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्याच्या आवडीप्रमाणे वाचन करता येते. जवळपास पंधरा हजार मराठी पुस्तके या गावात ठेवण्यात आली आहेत. आणि त्यात दिवसेंदिवस भर पडते आहे. प्रकल्पासाठी निवडलेल्या घरांची व ठिकाणांची नावे :हिलरेंज हायस्कूल-बालसाहित्य, बाळासाहेब भिलारे- कादंबरी, अनमोल्स ईन, राहूल भिलारे- महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती, शिवसागर, सुभाष भिलारे- विज्ञान, श्री हनुमान मंदिर-नियतकालिके व साहित्यिक माहिती फलक (प्रदर्शन), साई व्हॅली पॅलेस, विजय भिलारे- इतिहास, साई, मंदा भिलारे क्रीडा व विविध लोकप्रिय, गणपत भिलारे- दिवाळी अंक, कृषी कांचन, शशिकांत भिलारे-चरित्रे व आत्मचरित्रे, बोलकी पुस्तके, विशाल भिलारे- वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मंगलतारा, प्रशांत भिलारे- छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले, दत्तात्रय भिलारे- परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, प्रवीण भिलारे-कथा, अनिल भिलारे-स्त्री साहित्य, नारायण वाडकर- लोकसाहित्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-बालसाहित्य, सुहास काळे-ललित गद्य व वैचारिक, श्रीराम मंदिर साहित्यिक (प्रदर्शन) आणि भाषीक व साहित्यिक खेळ, संतोष सावंत- विनोदी, जिव्हाळा, आकाश भिलारे-विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते, गणपत पारठे-विविध कलांविषयक, मयूर रिसॉर्ट, अजय मोरे-निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण, श्री जननीमाता मंदिर, संत साहित्य, श्री जननीमाता मंदिर (श्री गणपती मंदिरा जवळ)- साहित्यिक माहितीफलक (प्रदर्शन) आणि गिरीजा रिसॉर्ट- कविता. पुस्तकाचं गावं नेमक आहे तरी कसं?! 25 घरात 15 हजार पुस्तकांचा खजिना. पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध. चित्रांच्या संगतीनुसार पुस्तकांची मांडणी. गावात कथाकथन अन् कविता वाचनाचे आयोजन. पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक. अंधांसाठी इ-बुकची उपलब्धता. पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे शैलेंद्र तिवारी, पर्यटक, मुंबई : देशात पुस्तकाचं गाव होण्याचा बहुमान भिलारला मिळाला हे मला समजलं. मी येथे आलो अनेक घरांना भेटी देवून पुस्तके वाचली. पर्यटकांनी जास्तीत जास्त या गावाला भेट देवून पुस्तक वाचनाचा आनंद घ्यावा. सुप्रिया रांजणे, पयर्टक, सातारा : मी भिलार या गावाला भेट देण्यासाठी सातारहून आली आहे. शासनाने राबविलेला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. येथे आल्यानंतर चांगल्या पद्धतीची पुस्तके वाचयला मिळाली. मोबाईल, टीव्हीच्या विश्वात हा एक चांगला उपक्रम आहे. पुढच्या वेळेस कुटुंबासह या गावाला भेट देईन. हेमलता वाघ, पर्यटक, इंदोर, मध्य प्रदेश : शासनाने हा राबविलेला उपक्रम छान आहे. येथे वेगवेगळे पुस्तके वाचून मला आनंद मिळत आहे. या गावामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटक येत आहेत, मी शासनाची आभारी आहे. अश्विनी, मुंबई पर्यटक: मी पर्यटनासाठी विविध ठिकाणी गेले, असे पुस्तकावे गाव कुठेही पाहिले नाही. येथील पुस्तके पाहुन वेगळाच आनंद झाला. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आणि आगळा वेगळा आहे. स्वाती बर्गे, शिक्षक, हिलरेंज हायस्कूल, भिलार : भिलार हे पुस्तकाचं गाव झाल्यापासून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच शैक्षणिक सहलीही येत आहेत. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मुलांना खुप पुस्तके वाचायला मिळत आहे.त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. यश धनवडे, विद्यार्थी : रेग्युलर अभ्यासाव्यतिरिक्त मला येथे कथा, बाल साहित्य, इतिहास असे अनेक पुस्तके वाचायला मिळाली. या वाचनातून मला शिकायला मिळाले. शासनाने येथे चांगली पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. राहूल भिलारे, हॉटेल व्यावसायीक : माझ्या हॉटेलमध्ये महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती विषयक पुस्तके ठेवण्यात आली आहेत. भिलार पुस्तकाच गाव झाल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. या गावाचे परिवर्तन झाले. स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आता पुस्तकाचं गाव म्हणून नावा रुपाला येत आहेत. गावात 25 ठिकाणी विविध प्रकारची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. पर्यटक येतात पुस्तके वाचून जातात याचा आनंद वाटतो. हे गाव जगाच्या नकाशावर आले. पर्यटनाला चालना मिळेल व भविष्यात याचा फायदा होईल. शशिकांत भिलारे ग्रामस्थ : माझ्या घरात चरित्र आणि आत्मचिरत्र या विषयांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या पुस्तकाच्या गावातील मी एक घटक आहे. दर आठवड्याला 300 ते 400 पर्यटकांबरोबर शैक्षणिक सहलीही या गावाला भेट देत आहेत. आत्तापर्यंत 20 हजार पर्यटकांनी या पुस्तकाच्या गावात येवून पुस्तक वाचणाचा आनंद घेतला आहे. सरस्वती भिलार : माझ्या घरामध्ये शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले या विषांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आमच्याकडे भरपूर पर्यटक येतात. बरेच पुस्तके वाचतात. भिकु भिलारे : माझ्या घरामध्ये परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास या विषयावर पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आमच्या गावामध्ये ज्ञानाची गंगा आली आहे. गावामध्ये पुस्तक प्रेमी, पीएचडी करणारे विद्यार्थी येत आहेत. त्यांना दुर्मिळ पुस्तके वाचायला मिळत आहेत. आमच गाव पुस्तकाचं गाव झालं याचा अभिमान वाटतो. प्रविण भिलारे : माझ्या घरामध्ये कथा साहित्य ठेवण्यात आले आहे. शनिशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत तसेच माझ्या घरालाही दरवाजा नाही. पुस्तक वाचण्यासाठी माझे घर पर्यटकांसाठी 24 तास खुले केले आहे. या गावाची स्ट्रोबेरी बरोबर पुस्तकाच गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. कृपया वाचकांनी गरजेनुसार पंखा व दिव्यांचा वापर करावा हे घर आपलेच आहे, अशा प्रकारची सूचनाही माझ्या घरात लिहली आहे. पुस्तकं आयुष्याला वळण देतात?. अनुभव, विचार, ज्ञान बळकट करतात?. पुस्तकाची गोडी लागण्यासाठी पुस्तकांचा सहवासही महत्वाचा असतो त्यासाठी पुस्तकाचं गाव भिलार हा एक अभिनव उपक्रम आहे आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणार पुस्तकाचं गाव भिलार हा अभिवन उपक्रम आहे. @ युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी,सातारा 00000
झटपट म्यागीचा काळ, चार ओळीत संदेशाच्या देवाण घेवाणीचा काळ, एकेकाळी हजार शब्दांचे संपादकीय पाचशे शब्दात बसवण्याचा काळ, लोकांच्या अभिरुचीच्या संक्रमणाचा काळ, प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करुन आनंद घेण्याचा काळ, अशा काळात महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन जगप्रसिद्ध थंड हेवच्या ठिकाणाच्या मधोमध स्ट्रोबेरीच आगार अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतीम सौंदर्याने नटलेल्या, सह्याद्रीच्या रांगानी खास या गावासाठीच जणू जागा सोडली असावी अस वाटणार भिलार गाव, दोन वर्षापूर्वी पुस्तकाच गाव झालं, त्याला उद्य दि.4 मे रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत, या दोन वर्षात या गावाने कात टाकली, मराठी साहित्याला सोनेरी झळाळी देणारा हा प्रकल्प हां हां म्हणता देशभर गाजला, रोजचे पर्यटक तर येतातच पण आजपर्यंत पाचशे शालेय सहली इथे आल्या, एका सहलीला सरासरी 250 विद्यार्थी धरले तर 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या गावाने मोहून टाकले, काहींना सहज चाळता चाळता त्या पुस्तकाची गोडी लागली? काहींना आयुष्यातील एक सुंदर सेल्फी पुस्तकाच्या गावातल्या बोर्डाबरोबर, चित्रांबरोबर काढून आयुष्याच्या पटावरच सुंदर चित्र म्हणून मनावर कोरुन ठेवलं? स्ट्रॉबेरीची गोडी आणि प्रत्येक पुस्तकाच्या घरात जावून फोटो काढण्याचा मोह? यातून भिलार गावाच व्याप वाढला? काही महिन्यापूर्वी आम्ही ज्या प्रतिक्रीया घेतल्या त्या वाचल्यास अधिक बोलक्या वाटतील? पुस्तकाच भारतातल पहिल गाव महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनाही भुरळ घालत आहे. तुम्ही अजून गेला नसाल तर नक्की जा. दगदगीच्या आयुष्यातून आनंदासाठी काही क्षण हल्ली माणूस वेचतो? त्यातला आनंद पुस्तकाच्या गावात पुस्तकाच्या पानासोबत शेअर करा? आयुष्यातली संस्मरणीय इव्हेंट म्हणून भिलार भेट नेहमीच काळजात कोरुन राहील? अशा भिलार विषयी दोन वर्ष पूर्तीनिमित्त घेतलेला हा आढावा खास तुमच्यासाठी? भिलार या गावात 4 मे 2017 या दिवसापासून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोख पुस्तकाच गाव भिलार साकारण्यात आलं ... आज या पुस्तकाच्या गावामध्ये 25 घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास याचे प्रत्येक घरात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालन उभी केली आहेत. निवडलेल्या 25 घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड;मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते. केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. पंचवीस घरात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्याच्या आवडीप्रमाणे वाचन करता येते. जवळपास पंधरा हजार मराठी पुस्तके या गावात ठेवण्यात आली आहेत. आणि त्यात दिवसेंदिवस भर पडते आहे. प्रकल्पासाठी निवडलेल्या घरांची व ठिकाणांची नावे :हिलरेंज हायस्कूल-बालसाहित्य, बाळासाहेब भिलारे- कादंबरी, अनमोल्स ईन, राहूल भिलारे- महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती, शिवसागर, सुभाष भिलारे- विज्ञान, श्री हनुमान मंदिर-नियतकालिके व साहित्यिक माहिती फलक (प्रदर्शन), साई व्हॅली पॅलेस, विजय भिलारे- इतिहास, साई, मंदा भिलारे क्रीडा व विविध लोकप्रिय, गणपत भिलारे- दिवाळी अंक, कृषी कांचन, शशिकांत भिलारे-चरित्रे व आत्मचरित्रे, बोलकी पुस्तके, विशाल भिलारे- वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मंगलतारा, प्रशांत भिलारे- छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले, दत्तात्रय भिलारे- परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, प्रवीण भिलारे-कथा, अनिल भिलारे-स्त्री साहित्य, नारायण वाडकर- लोकसाहित्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-बालसाहित्य, सुहास काळे-ललित गद्य व वैचारिक, श्रीराम मंदिर साहित्यिक (प्रदर्शन) आणि भाषीक व साहित्यिक खेळ, संतोष सावंत- विनोदी, जिव्हाळा, आकाश भिलारे-विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते, गणपत पारठे-विविध कलांविषयक, मयूर रिसॉर्ट, अजय मोरे-निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण, श्री जननीमाता मंदिर, संत साहित्य, श्री जननीमाता मंदिर (श्री गणपती मंदिरा जवळ)- साहित्यिक माहितीफलक (प्रदर्शन) आणि गिरीजा रिसॉर्ट- कविता. पुस्तकाचं गावं नेमक आहे तरी कसं?! 25 घरात 15 हजार पुस्तकांचा खजिना. पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध. चित्रांच्या संगतीनुसार पुस्तकांची मांडणी. गावात कथाकथन अन् कविता वाचनाचे आयोजन. पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक. अंधांसाठी इ-बुकची उपलब्धता. पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे शैलेंद्र तिवारी, पर्यटक, मुंबई : देशात पुस्तकाचं गाव होण्याचा बहुमान भिलारला मिळाला हे मला समजलं. मी येथे आलो अनेक घरांना भेटी देवून पुस्तके वाचली. पर्यटकांनी जास्तीत जास्त या गावाला भेट देवून पुस्तक वाचनाचा आनंद घ्यावा. सुप्रिया रांजणे, पयर्टक, सातारा : मी भिलार या गावाला भेट देण्यासाठी सातारहून आली आहे. शासनाने राबविलेला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. येथे आल्यानंतर चांगल्या पद्धतीची पुस्तके वाचयला मिळाली. मोबाईल, टीव्हीच्या विश्वात हा एक चांगला उपक्रम आहे. पुढच्या वेळेस कुटुंबासह या गावाला भेट देईन. हेमलता वाघ, पर्यटक, इंदोर, मध्य प्रदेश : शासनाने हा राबविलेला उपक्रम छान आहे. येथे वेगवेगळे पुस्तके वाचून मला आनंद मिळत आहे. या गावामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटक येत आहेत, मी शासनाची आभारी आहे. अश्विनी, मुंबई पर्यटक: मी पर्यटनासाठी विविध ठिकाणी गेले, असे पुस्तकावे गाव कुठेही पाहिले नाही. येथील पुस्तके पाहुन वेगळाच आनंद झाला. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आणि आगळा वेगळा आहे. स्वाती बर्गे, शिक्षक, हिलरेंज हायस्कूल, भिलार : भिलार हे पुस्तकाचं गाव झाल्यापासून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच शैक्षणिक सहलीही येत आहेत. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मुलांना खुप पुस्तके वाचायला मिळत आहे.त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. यश धनवडे, विद्यार्थी : रेग्युलर अभ्यासाव्यतिरिक्त मला येथे कथा, बाल साहित्य, इतिहास असे अनेक पुस्तके वाचायला मिळाली. या वाचनातून मला शिकायला मिळाले. शासनाने येथे चांगली पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. राहूल भिलारे, हॉटेल व्यावसायीक : माझ्या हॉटेलमध्ये महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती विषयक पुस्तके ठेवण्यात आली आहेत. भिलार पुस्तकाच गाव झाल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. या गावाचे परिवर्तन झाले. स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आता पुस्तकाचं गाव म्हणून नावा रुपाला येत आहेत. गावात 25 ठिकाणी विविध प्रकारची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. पर्यटक येतात पुस्तके वाचून जातात याचा आनंद वाटतो. हे गाव जगाच्या नकाशावर आले. पर्यटनाला चालना मिळेल व भविष्यात याचा फायदा होईल. शशिकांत भिलारे ग्रामस्थ : माझ्या घरात चरित्र आणि आत्मचिरत्र या विषयांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या पुस्तकाच्या गावातील मी एक घटक आहे. दर आठवड्याला 300 ते 400 पर्यटकांबरोबर शैक्षणिक सहलीही या गावाला भेट देत आहेत. आत्तापर्यंत 20 हजार पर्यटकांनी या पुस्तकाच्या गावात येवून पुस्तक वाचणाचा आनंद घेतला आहे. सरस्वती भिलार : माझ्या घरामध्ये शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले या विषांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आमच्याकडे भरपूर पर्यटक येतात. बरेच पुस्तके वाचतात. भिकु भिलारे : माझ्या घरामध्ये परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास या विषयावर पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आमच्या गावामध्ये ज्ञानाची गंगा आली आहे. गावामध्ये पुस्तक प्रेमी, पीएचडी करणारे विद्यार्थी येत आहेत. त्यांना दुर्मिळ पुस्तके वाचायला मिळत आहेत. आमच गाव पुस्तकाचं गाव झालं याचा अभिमान वाटतो. प्रविण भिलारे : माझ्या घरामध्ये कथा साहित्य ठेवण्यात आले आहे. शनिशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत तसेच माझ्या घरालाही दरवाजा नाही. पुस्तक वाचण्यासाठी माझे घर पर्यटकांसाठी 24 तास खुले केले आहे. या गावाची स्ट्रोबेरी बरोबर पुस्तकाच गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. कृपया वाचकांनी गरजेनुसार पंखा व दिव्यांचा वापर करावा हे घर आपलेच आहे, अशा प्रकारची सूचनाही माझ्या घरात लिहली आहे. पुस्तकं आयुष्याला वळण देतात?. अनुभव, विचार, ज्ञान बळकट करतात?. पुस्तकाची गोडी लागण्यासाठी पुस्तकांचा सहवासही महत्वाचा असतो त्यासाठी पुस्तकाचं गाव भिलार हा एक अभिनव उपक्रम आहे आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणार पुस्तकाचं गाव भिलार हा अभिवन उपक्रम आहे. @ युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी,सातारा 00000
शाळकरी पोरांच्या खेळामध्ये एखाद्याला कुणी चोर चोर म्हणून चिडवत असतील तर सततच्या चिडवण्याने वैतागून तो पोरगा कधीतरी चिडवणाराच्या अंगावर जातो आणि तुझा बाप चोर, तुझी आई चोर, तुझं खानदान चोर.... असं म्हणतो. पोरांच्या खेळात ते चिडवणं आणि चिडणं दोन्ही गोष्टी गांभीर्यानं घेण्यासारख्या नसतात. कारण ते सगळंच पोरवयीन असतं. परंतु मोठ्यांमध्ये तसं नसतं. म्हणून तर मोठी माणसं छोट्यांसारखी वागायला लागली की, काय पोरखेळ चालवलवाय, असं म्हटलं जातं. भारतीय राजकारणाच्या सध्याच्या अवस्थेकडं बघितलं तर मोठ्यामोठ्या नेत्यांनी पोरखेळ बरा वाटावा असा खेळ मांडलेला दिसून येतं. त्याची पातळी इतकी घसरलीय की, त्याबद्दल दोष त्या नेत्यांन द्यावा, त्यांचे तुणतुणे वाजवणा-या वृत्तवाहिन्यांना द्यावा, की या पोरखेळाला संरक्षण देणा-या निवडणूक आयोगाला द्यावा हे समजत नाही. सगळीकडच्या सगळ्यांनी घसरत घसरत नीचतमहून नीचतम पातळी गाठली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या विधानाने अगदी तळ गाठला आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. टीका करता करता ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर घसरले. देशाच्या राजकारणातल्या उच्च पदावरील व्यक्तिची आजवरची ही सर्वाधिक घसरण असावी. मोदी म्हणाले, "आपके पिताजी को आपके राग दरबारियों ने मिस्टर क्लीन बना दिया था. गाजे-बाजे के साथ मिस्टर क्लीन मिस्टर क्लीन चला था. लेकिन देखते ही देखते भ्रष्टाचारी नंबर वन के रूप में उनका जीवनकाल समाप्त हो गया." नरेंद्र मोदी घराणेशाहीवर टीका करतात. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात. इंदिरा गांधींसारखं दबंग नेता होण्याचं त्यांचं स्वप्नं असल्यामुळं इंदिराजींच्या वाटेला ते फारसे जात नाहीत. परंतु (सर्वोच्च न्यायालयानं खरोखर क्लीनचिट दिलेल्या) बोफोर्स प्रकरणाचा संदर्भ घेऊन राजीव गांधींवर टीका करतात. सोनिया गांधींवर टीका करतात. राहुल गांधी तर त्यांच्यासमोर मैदानातच असल्यामुळं त्यांच्यावर टीका स्वाभाविक आहे. परंतु राहुल गांधी यांचा राग येतो म्हणून त्यांच्या वडिलांना शिव्या देणं हे पोरखेळातही सभ्यतेचं मानलं जात नाही, स्वाभावकच देशाच्या राजकारणात ते कुणी सभ्य मानण्याचं कारण नाही. एक शक्यता आहे. मोदीजी ज्या संस्कारशाळेत घडले तिथली शिकवण कदाचित असू शकते. दिवंगत व्यक्तिंबद्दलही अश्लाघ्य बोलण्याची तिथली परंपरा असावी. आमच्या परिचयाचे एक जोशीकाका आहेत. गेल्याच आठवड्यात भेटले तेव्हा ते सांगत होते. माणसाचं कर्म असेल तसा त्याला मृत्यू येतो. उदाहरणार्थ इंदिरा गांधी, राजीव गांधी चिंधड्या चिंधड्या होऊन मेले. वाजपेयींना कसं शांत, नैसर्गिक मरण आलं वगैरे वगैरे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजीव गांधी यांच्यासंदर्भातील भाषा ऐकल्यानंतर जोशीकाकांची आणि मोदींची शाळा एकच असल्याची खात्री पटते. मरण पावलेल्या माणसांबद्दलही किती विकृतपणे विचार केला जातो हे पाहून त्यांचा राग येत नाही, तर त्यांच्याबदद्ल करुणा वाटू लागते. जोशीकाकांसारखे हजारो लोक असतील त्यांनी कसा विचार करावा आणि तो कुठं कसा मांडावा हा त्यांचा त्यांचा प्रश्न. कारण घटनेनं त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. तेच स्वातंत्र्य नरेंद्र मोदी यांनासुद्धा आहे. परंतु नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. पाच वर्षांची टर्म पूर्ण करून पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या पदासाठी आपल्याशिवाय कुणीही पात्र नाही, असं त्यांचं स्वतःचं मत आहे. त्याचमुळं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहणारे बाकीचे नेते त्यांना सत्तालोभी, मिलावटी वाटतात. केवळ आपल्या हातात देश सुरक्षित राहू शकतो, हे ओरडून ओरडून सांगण्याचा ते प्रयत्न करताहेत. गंमत म्हणजे एकीकडे सांगताहेत की देश माझ्या हातात सुरक्षित आहे. त्याचवेळी काहीलोक मला मारायला टपले असल्याचा प्रचार करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवज्योत सिद्धूसारखा वाचाळ उपटसुंभ काहीतरी भंपकासारखे बोलतो की, त्यांना तेवढेच निमित्त मिळते आणि काँग्रेसवाले माझ्या मरणाचं स्वप्नं पाहताहेत, असा कांगावा करायला लागतात. मोदीजी आणखी दोन फे-यांपर्यंत किती आणि कुठवर घसरतात, हे पाहावं लागणार आहे. कारण पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या नावानं आनंद आहे. नवी आश्वासनं द्यावीत तर आधीचं काहीच झालेलं नाही. त्यामुळं पाकिस्तानचं नाव घेऊन सतत पाकिस्तानची भीती घालून स्वतःच्या शौर्याचे पोवाडे स्वतःच गात आहेत. सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केला, आत घुसून मारले म्हणत म्हणत आता, मी आत घुसून मारले, असं म्हणण्यापर्यंत त्यांची प्रगती झालीय. सुरुवातीला निवडणूक आयोग आणि वृत्तवाहिन्यांचा उल्लेख केलाय. निवडणूक आयोगाच्या क्लीनचिट आपल्या समोरच आहेत. वृत्तवाहिन्यांच्या पक्षपातीपणाबद्दल लिहायचं तर खूप लिहावं लागेल. परंतु वानगीदाखल एक उदाहरण देतो. चौकीदार चोर आहे, हे सुप्रीम कोर्टानंही मान्य केलंय... असं विधान राहुल गांधी यांनी केलं. त्याविरोधात भाजपचे लोक सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टानं त्यांना नोटीस काढली आणि त्यांना माफी मागावी लागली. एखादा-दुसरा अपवाद वगळता बहुतांश वृत्तवाहिन्यांनी त्याची बातमी अशी चालवली की, चौकीदार चोर है बद्दल राहुल गांधी यांची सुप्रीम कोर्टात माफी. हा सरळसरळ बुद्धीभेद आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. तो जाणूनबुजून करण्यात येत होता. चौकीदार चोर है या घोषणेशी सुप्रीम कोर्टाचं नाव जोडल्याबद्दल माफी मागितली, ही वस्तुस्थिती असताना वृत्तवाहिन्यांनी खोटी बातमी चालवली. राहुल गांधी यांना स्वतः खुलासा करावा लागला, की चौकीदार चौर है..ही आमची प्रचाराची मोहीम आहे. ती मागे घेण्याचा प्रश्नच नाही. त्या घोषणेशी सुप्रीम कोर्टाचे नाव जोडल्याबद्दल मी माफी मागितलीय. अर्थात असा खुलासा करावा लागण्याची गरज नव्हती. परंतु वृत्तवाहिन्यांकडून दिल्या गेलेल्या हेतूपुरस्पर चुकीच्या बातमीमुळे त्यांना तो करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त राष्ट्रवादाचा एवढा टेंभा मिरवताहेत. त्यांच्या हिंदुत्ववादी टोळ्या इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा अशा घोषणा देत अल्पसंख्यांकांना त्रास देत आहेत. परंतु नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या वंदे मातरमच्या घोषणेला बिहारमध्ये नीतिश कुमार यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यांचे ते काही वाकडे करू शकत नाहीत. परिणाम असा झाला की नीतिश कुमार यांच्यासोबत झालेल्या पुढच्या सभेत मोदी यांनी वंदे मातरमची घोषणाच वगळून टाकली. गरीब घावले की चेपायचे, चिरडायचे आणि नीतिश कुमार यांच्यासारख्या दबंगासमोर नांगी टाकायची, यावरून छप्पन इंचाच्या छातीचे खरे माप समोर येते आहे. निवडणुकीच्या निकालाला दोन आठवडे आणि वरती काही दिवस राहिले आहेत. निवडणुकीचा निकाल काहीही लागेल. परंतु प्रचारकाळातले नरेंद्र मोदींचे एकूण वर्तन पाहिल्यानंतर काळजी वाटायला लागते. गुजरात विधानसभा निवडणुकीतही मोदी-शहा असेच अस्वस्थ, आक्रमक बनले होते. तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते, मोदीजी, हम तुम्हे प्यार से हराना आये है... आताही मोदींनी राजीव गांधी यांच्यासंदर्भात अश्लाघ्य विधान केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांना दिलेले उत्तर दोन संस्कृतींमधला फरक दर्शवणारे आहे. राहुलनी म्हटलंय, "मोदी जी, युद्ध समाप्त हो चुका है. आपके कर्म आपका इंतज़ार कर रहे हैं. खुद को लेकर अपनी सोच को मेरे पिता पर डालने से आप बच नहीं पाएंगे. प्यार और जोरदार झप्पी. राहुल." राहुलना म्हणायचे ते त्यांनी म्हटले. आपण फारतर एवढेच म्हणू शकतो, मोदीजी, गेट वेल सून... लवकर बरे व्हा! @@@ (विजय चोरमारे, जेष्ठ पत्रकार, कोल्हापूर) @@@
10:05PM, 13 Jun
3:22PM, 12 Feb
अधिक माहितीसाठी आपले नाव आणि इमेल रजिस्टर करा ......