Breaking News

 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1


Related
पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

चालणे हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ फरेराच्या संशोधकर्त्यांनुसार, वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. या अभ्यासात 1,078 हाय ब्लड प्रेशर ग्रस्त लोकांना सहभागी करुन घेतले होते. हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. शोधकर्ते म्हणाले की, चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 0 0 0 0 वेगाने चालण्याचे फायदे - अमेरिकन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार चालण्याचे तुम्हाला खालील फायदे होतात = 1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते. 3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो. 4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते. 5) रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो. 6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. 7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. 8) चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. 9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. 10) चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत 11) चालण्यामुळे झोपही चांगली लागते. 12) मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. 13) वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम 14) चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते 15) चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते. 16) दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय. 17) चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. 18) झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो. 19) नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते. 20) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. 21) नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. 22) नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. 23) हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते. 24) नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात. 25) मोतीबिंदूची शक्यता कमी होते. 26) नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो. 27) नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग. 28) चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते 29) दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. 30) नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. 31) कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करु शकता. आपण आपल्या नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.

कोरेगाव नगरपंचायतीच्या गैरकाराभाराविषयी विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी; मुख्याधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश : नगरविकास राज्यमंत्री ना. योगेश सागर यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : कोरेगाव नगरपंचायतीत गेली दोन ते अडीच वर्षे सुरु असलेल्या गैरकारभाराविषयी पदाधिकारी व मुख्याधिकार्‍यांची चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणार्‍यांवर योग्य ती कारवाई करुन वसुली केली जाणार आहे. तोपर्यंत मुख्याधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री ना. योगेश सागर यांनी विधान परिषदेत दिली. कोरेगाव नगरपंचायतीच्या कारभारामध्ये आणि कामांमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून गैरव्यवहार होत आहेत, अशी लक्षवेधी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मांडली. मुंडे यांनी अत्यंत मुद्देसुदपणे हा विषय पटलावर घेतला. मुंडे पुढे म्हणाले, नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकार्‍यांनी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून शांतीनगर उपनगरात गटर्स बांधकाम करणे, संभाजीनगर येथे गटर्स बांधकाम करणे, बाबा घर येथील रस्त्याचे काम करणे आदींमध्ये गैरप्रकार केले आहेत. आझाद चौक ते बनसोडे घर गटर्स बांधकाम करणे आदी कामे पूर्वीची असून, डागडुजी करुन नवीन बिले काढलेली आहेत. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण योजनेंतर्गत केलेल्या रंगरंगोटी कामाचे 83 लाख रुपयांचे बील काढण्यात आले आहे. या कामामध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीमार्फत विविध कामांसाठी ठेके दिले जातात, त्यामध्ये कामासाठी घेण्यात येणारे कर्मचारी अणि प्रत्यक्ष कामाला असलेल्या कर्मचार्‍यांच्या संख्येमध्ये तफावत आढळून आली असल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणून दिली. मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, कोरेगाव नगरपंचायतीत मुख्याधिकारी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कामाची वाढीव बिले काढणे, न झालेल्या कामाांची बिले काढणे असे गैरव्यवहार करत आहेत. शांतीनगर गटर्स बांधकाम प्रकरणामध्ये जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये अनियमितता झाल्याचे नमूद केले आहे, असे स्पष्टपणे समोर आले आहे. याचाच अर्थ चुकीची कामे झालेली आहेत. शासनाने नियुक्त केलेल्या मुख्याधिकारी, अभियंता आणि काही प्रमुख पदाधिकार्‍यांचा या रॅकेटमध्ये समावेश आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. लक्षवेधीला उत्तर देताना ना. योगेश सागर यांनी मुख्याधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले. मुख्याधिकारी व संबंधित पदाधिकार्‍यांची शासना कडून चौकशी करण्यात येईल, त्या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करुन वसुली केली जाईल, असे मंत्रीमहोदयांनी उत्तरात स्पष्ट केले.

अजिंक्यतारा इथेनॉल निर्मीतीला प्राधान्य देवून कारखान्याचे उत्पन्न वाढवणार : शिवेंद्रसिंहराजे भोसले; साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांनी आपल्या सर्वांच्या साथीने या उजाड माळरानावर सहकाराचे रोपटे लावले. आज त्याचा वटवृक्ष झाला असून एक सक्षम कारखाना म्हणून अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे अभिमानाने पाहिले जाते. कारखान्याचे आणि पर्यायाने सभासदांचे हित व काळाची गरज लक्षात घेऊन उपपदार्थांचे उत्पादन वाढविण्याकडे संचालक मंडळाने लक्ष केंद्रीत केले आहे. इथेनॉलचे उत्पादन घेण्याबाबत सरकारचे सकारात्मक धोरण असून इथेनॉल निर्मीतीपासून कारखान्याच्या नफ्यात वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार बी हेव्ही मोलॅसेस पासून होणार्‍या इथेनॉलचा प्रती लिटर ५२.४३ वरून ५४.२७ रुपये दर केला आहे. याचा ङ्गायदा कारखान्यास होणार आहे. ऊस पुरवठादार शेतकरी, सभासदांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत कारखान्याच्या संचालक मंडळाने धोरणात्मक कामकाज केले आहे. उपपदार्थ, इथेनॉल निर्मीतीला प्राधान्य देवून कारखान्याचे उत्पन्न वाढवले जाणार आहे. जेणेकरुन सभासद, शेतकर्‍यांना अधिक चांगला दर देता येईल, असे आश्‍वासक प्रतिपादन अजिंक्यतारा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. अजिंक्यतारा सहकारी कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावरील स्व.आ.श्रीमंत.छ.अभयसिंहराजे भोंसले सांस्कृतिक भवन येथे सभासदांच्या उत्स्ङ्गुर्त प्रतिसादात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी शिवेंद्रसिंंहराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत होते. सभेच्या सुरूवातीला कारखान्याचे संस्थापक स्व. श्रीमंत. छ.अभयसिंहराजे भोंसले यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पाजंली अर्पण करून अभिवादन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विश्‍वास शेडगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. अहवाल सालात व तद्नतंरचे कालावधीमध्ये शहीद झालेले जवान,व दिवंगत झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सभेची नोटिस व अहवालाचे वाचन केले. विषय पत्रिकेतील सर्व विषयांचे वाचन करून ते सर्व विषय उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूर केले. तसेच सभासदांनी विचारलेल्या धोरणात्मक प्रश्‍नांना शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी समर्पक उत्तरे देऊन सभासदांचे समाधान केले. शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती प्रगती पथावर नेण्यास आपणा सर्वांचे भरीव सहकार्य मिळत आहे. कारखान्याचे उत्कृष्ट व काटेकोर आर्थिक नियोजन व खर्चात होत असलेली काटकसर यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यास मदत झाली आहे. कारखान्याची आर्थिकस्थिती मजबूत होण्यासाठी संचालक मंडळाने लक्ष केंद्रीत केले असून याबाबीची प्रचिती म्हणून आपण मागील गाळप हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला एङ्गआरपी नुसार प्र.मे.टन रू.२८१५/- प्रमाणे १००% पेमेंट वेळेत अदा केले. या संदर्भाने राज्याचे साखर आयुक्त यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन करून कौतूक केले आहे. कारखान्याकडे शासनाचे, वित्तिय संस्थेचे कोणतेही कर्ज देय बाकी नसून चालू आर्थिक वर्षात कारखान्याने एकूण १३२०.५१ लक्ष मुद्दलाची व्याजासह परङ्गेड केल्याचे सांगून ते म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी यापुढेही संचालक मंडळ विश्‍वस्त म्हणून सेवाभावी वृत्तीने काम करत राहील. शेतकर्‍यांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे, हे स्व.भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचे प्रयत्न संचालक मंडळ करीत आहे. यासाठी आम्ही सदैव कटिबध्द राहू, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिली. २०१९-२० चा गाळप हंगाम हा सर्व बाजुंनी आव्हानात्मक असून मागील उत्पादनामधील जवळ जवळ ५०% साखर साठा शिल्लक राहणार आहे व त्यात नविन होणारे साखरेचे उत्पादन एकंदरीत हा हंगाम खडतर जाणार आहे. साखरेचा जादा साखर साठा शिल्लक राहणार असल्यामुळे व साखर दरात वाढ होत नसल्यामुळे शासनाने बी हेव्ही मोलॅसेस तसेच शुगर केन ज्युस यापासून इथेनॉल काढण्याकरीता परवानगी दिली असून याच धोरणाचा भाग म्हणून आपण येत्या २०१९-२० चे गाळप हंगामात अंदाजे २०.०० लक्ष लिटर्स बी हेव्ही मोलॅसेस पासून निघणारे इथेनॉलचे टेंडर भरणार आहोत. यामुळे साखर उत्पादन कमी होऊन साखर साठा कमी होण्यास मदत होणार आहे. व पर्यायाने कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. कारखान्याने यंदाचे २०१९-२० च्या हंगामात ५.०० लक्ष मे.टन गाळपाचे उदिष्ट ठरविले असून यासाठी आवश्यक तेवढी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करार बध्द केलेली आहे. सदरचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणेसाठी संचालक मंडळाने तसे नियोजन केले आहे. भाऊसाहेब महाराजांच्या पाठीशी आपण जसे उभे राहिलात तसे माझ्याही पाठीशी कायम उभे राहून मला मोलाचे सहकार्य आपण करीत आहात, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचे आभार मानले. २०१८-१९ च्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाचे एङ्गआरपी प्रमाणे १००% पेमेंट वेळेत अदा केल्याबद्दल काशिळ विकास सेवा सहकारी सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे अभिनंदन करून सत्कार केला. तसेच कारखान्याच्या वतीने चेअरमन सर्जेराव सावंत यांचा आणि कार्यकारी संचालक संजीव देसाई यांना बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर ऍवॉर्ड मिळाल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मागील हंगामात ऊसाचे उच्चांकी हेक्टरी उत्पादन व जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणार्‍या ऊस उत्पादकांना शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशिस्तपत्र, शाल व श्रीङ्गळ देऊन तसेच रोख स्वरूपात बक्षिसाची रक्कम देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सर्व विभागातून जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे काशिळ येथील जयवंत रामचंद्र कुंभार (प्रथम क?मांक), अतित येथील राजेंद्रकुमार माधवराव जाधव (द्वितीय क?मांक), तर कोडोली येथील कमलाकर रघुनाथ ङ्गडतरे ़़़़(तृतीय क?मांक) तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील विभागवार जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे सातारा गटातून बाळकृष्ण मारूती शिंदे-लिंब (प्रथम क?मांक), अपशिंगे गटामधून नंदकुमार विश्‍वनाथ जगदाळे-नांदगाव (प्रथम क?मांक), शेंद्रे-परळी गटातून बापूसाहेब बाबासाहेब माने- शहापूर (प्रथम क?मांक), वडूथ गटामधून नितीन गजानन साबळे-आरङ्गळ (प्रथम), नागठाणे गटामधून नारायण शामराव साळुंखे आदींना गौरविण्यात आले. आडसाली मध्ये निलेश मधुकर शिंदे-सोनगांव (प्रथम), दिलीप दिनकर शेलार-म्हसवे (द्वितीय), अशोक गोपाळा मांडवे-निगडी-वंदन (तृतीय), पुर्व हंगामामध्ये शिवाजी मारूती जाधव-वर्णे (प्रथम), अविनाश लक्ष्मण यादव-नागठाणे (द्वितीय), ज्ञानदेव केशव माने-शेंद्रे (तृतीय) तसेच सुरू हंगामात अंकूश तूकाराम घाडगे-खोजेवाडी (प्रथम), अमोल शिवाजी खराडे-कोपर्डे (द्वितीय), संजय बापू दळवी-मालगांव (तृतीय), तसेच खोडवा पिकामध्ये दिपक विठ्‌ठल जाधव-खोडद (प्रथम), भिकू दिनकर साळुंखे-नागठाणे (द्वितीय), विलास माधवराव जाधव-अतित (तृतीय) आदींना गौरविण्यात आले. संचालक नितिन पाटील यांनी आभार मानले. सभेला जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी कृषी सभापती किरण साबळे, माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सतीश चव्हाण, माजी सदस्य राजू भोसले, पंचायत समिती सभापती मिलींद कदम, सदस्य राहूल शिंदे, दयानंद उघडे, माजी सभापती धर्मराज घोरपडे, नारायणराव कणसे, अरविंद चव्हाण, जिल्हा बँक माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, संचालिका सौ.कांचन साळुंखे, माजी सदस्य आण्णाबापू सावंत, तालुका खरेदी विक?ी संघाचे माजी अध्यक्ष गणपतराव शिंदे, उपाध्यक्ष नारायणराव साळुंखे, सदस्य सुनिल काटे, कृषीउत्पन्न सभापती विक?म पवार, उप.सभापती नितीन कणसे, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष धनाजी शेडगे, कारखान्याचे याजी संचालक सदस्य, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण ङ्गडतरे, सूत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, पंडीतराव सावंत, रामचंद्र जगताप, माजी उपाध्यक्ष देवरे, व संचालक सदस्य, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद, कारखान्याचे मुनियन सरचिटणीस सयाजी कदम, अध्यक्ष धनवे, अधिकारी-कामगार-कर्मचारी मोठ्या सं?येने उपस्थित होते.

चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचं अनावरण

मुंबई : देशातल्या दुसऱ्या अखंड प्रज्वलित राहणाऱ्या भीमज्योतीचं आज दादरच्या चैत्यभूमी परिसरात अनावरण करण्यात आलं. खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते आज सकाळी अखंड भीमज्योतीचं अनावरण झालं. दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत भारतीयांच्या नेहमी मनात तेवत राहावी यासाठी मुंबईत चैत्यभूमी परिसरात या अखंड ज्योत लावण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने अखंड प्रज्वलित राहणारी देशातील पहिली ज्योत मुंबईतल्या ओव्हल मैदान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर तीन महिन्यांपूर्वी बसवण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता दुसरी अखंड भीमज्योत ही दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात बसवण्यात आली आहे. ■ महापालिकेने उभारली भीमज्योत :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्र्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याबरोबर बैठका घेऊन हे काम महापालिकेच्या निधीतून करण्याचं ठरवलं. महापालिका वास्तुविशारदांकडून भीमज्योतीचा आराखडा करण्यात आला आणि त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. या भीमज्योतीसाठी महापालिकेला 21 लाख 54 हजार रुपये खर्च आला आहे. तर, चैत्यभूमी परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि अन्य बाबींसाठी 42 लाख 74 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. ■ सव्वा आठ फूट उंच साडेसात फूट रुंद भीमज्योत :- चैत्यभूमीवरील भीमज्योत सव्वा आठ फूट उंच आणि साडेसात फूट रुंद आहे. तेवणाऱ्या ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे. आठ मिमी काचेच्या आवरणाआड ही ज्योत सतत तेवत राहिल. या ज्योतीला महानगर गॅसतर्फे 24 तास अखंड गॅस पुरवठा केला जाईल. तथागत गौतम बुद्धांचा, 'अत्त दीप भव' म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्काराने गौरव

सातारा : कोल्हापूर यांचे माध्यमातून बँकींग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय व गौरवास्पद कामकाजाची दखल घेवून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उत्कृष्ट अध्यक्ष, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा बँकेस उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे तीन पुरस्कार कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे अध्यक्षतेखाली तसेच राज्य बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, रिझर्व्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक कांबळे आणि प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ. विजय काकडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये हे पुरस्कार बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, अधीक्षक संदीप शिंदे, महेश शिंदे व अनिल घाडगे यांनी स्वीकारले. महाव्यवस्थापक कांबळे यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकींग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून विशेष उल्लेख केला. तसेचकिरण कर्नाड म्हणाले, सर्वसामान्य ग्राहकांना बँकींग सेवा व सुविधा त्वरीत उपलब्ध व्हाव्यात, याकरिता सातारा जिल्हा बँक 304 शाखा व 15 विस्तारित कक्षांचे माध्यमातून कृषी सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतिमान करण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष व संचालक, सदस्य उच्चविद्याविभुषित व अभ्यासू आहेत. संपूर्ण बँकींग व्यवसाय हा बँकींग रेग्युलेशन अ‍ॅक्ट व महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार केला जातो. बँकेचे पीक कर्ज प्रकल्पांतर्गत तसेच बिगरशेती कर्जवाटप हे धोरणास अनुसरून व रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सहकार विभागाने कळविलेल्या निकषानुसार मंजूर केले जाते. याची नोंद घेऊनच बँकेचे अध्यक्ष आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ?उत्कृष्ट अध्यक्ष? या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. पुरस्काराबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच सर्व व्यवस्थापन प्रतिनिधी, सेवक वर्ग व गटसचिव यांनी अभिनंदन केले.

वाचन संस्कृती रूजविणारा व वाढविणारा सातार्‍याचा ग्रंथमहोत्सव : शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर

सातारा जिल्ह्यात दोन दशकांची परंपरा निर्माण करणार्‍या ग्रंथमहोत्सवाला या वर्षी देखील उत्साह व आनंदात आरंभ होत आहे. दोन दशकांचा आढावा घेतलातर सातारा जिल्हा परिषद मैदानावर विचारांच्या देवघेवीच्या कितीतरी उत्तुंग व संस्मरणीय घटना घडून गेल्या आहेत. ग्रंथमहोत्सवातील विचारवंत, साहित्यिक, कलावंत यांची शेकडो नावे गत वीस वर्षात वाचली तरी सातार्‍याच्या ग्रंथमहोत्सवाने वाचनसंस्कृतीला दिलेले पाठबळ व दिशा लक्षात येईल. ग्रंथउत्तेजना, ग्रंथविक्री व ग्रंथप्रदर्शन यातून वाचनसंस्कृती संवर्धन करणे हे खूप कठीणअसे काम, त्यास उत्सव व महोत्सवाचे स्वरूप दिल्यामुळे हे घडून आले. सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातून तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सध्याचे शिक्षण संचालक मा. दिनकरराव पाटील संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला व त्यासाठी सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती निर्माण करुन त्यामध्ये जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक व वाचनप्रेमी, त्यासाठी सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती निर्माण करुन त्यामध्ये जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक व वाचनप्रेमी, कलाप्रेमी व मंडळींनी मनोभावे सहभाग व योगदान देवून ग्रंथमहोत्सवाचे स्वरुप भव्य करुन ते सलग दोन दशके परंपरेत पुढे टिकवून ठेवले आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक ग्रंथपाल, कर्मचारी व पालक यांना ग्रंथमहोत्सवाचे आकर्षण निर्माण करुन समाजातील, साहित्यक्षेत्रातील कवी लेखकांच्या भेटीची अनोखी संधी या ग्रंथमहोत्सवामुळे उपलब्ध झाली. पुस्तकांचे शेकडो स्टॉल नजरेखाली घालत आपणास हवीहवीशी वाटणारी पुस्तके मिळण्यासाठी पालकांकडे विद्यार्थी हट्ट करु लागले, शाळेच्या ग्रंथालयात दरवर्षी ग्रंथोत्सवातून किती पुस्तके आणली याची चर्चा ग्रंथप्रेमी शिक्षक, संस्था व शाळा शामातून होत गेल्या, आपण घेतलेले पुस्तक एकमेकांना दाखवत हे वाचा! असे लोक एक दुसर्‍याला सांगू लागले. मला वाटते हे चित्र वाचनसंस्कृतीला पूरक व वाचन संस्कृती जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ठरले आहे.या निमित्ताने खेड्यापाड्यातील लेखक व प्रकाशकांच्या गाठीभेटी झाल्या.साहित्य निर्मिेती करणारे कवी, लेखक, वाचक यांच्यात सुसंवाद घडला. पुस्तकांची पाने चाळत चाळत ग्रंथमहोत्सवात आल्यामुळे, पेरफटका मारल्यामुळे लोकांना प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ.आ.ह.साळुंखे, विश्वास पाटील, इंद्रजीत देशमुख, श्रीपाल सबनीस, विठ्ठल वाघ, अमोल कोल्हे, आनंद यादव, फ.मु.शिंदे, विजय कुवळेकर, कुमार केतकर... असे महान कवी, लेखक, विचारवंत, पत्रकार व साहित्योपासक भेटले हेच या ग्रंथमहोत्सवाचे यश आहे. ज्यांनी कविता लिहली त्यांच्या आवाजात ती कविता ऐकायला मिळणे, ज्यांनी कथा लिहिली त्यांकडून ती कथा ऐकायला मिळणे व ज्यांनी पुस्तके लिहीली त्यांना त्याविषयी काय वाटते ते ऐकायला मिळणे ही दुर्मिळ पर्वणी सातारा जिल्ह्यात ग्रंथमहोत्सवामुळे अनुभवयास मिळत आहे. मान्यवर व स्थानिक वृत्तपत्रे व पत्रकार ग्रंथमहोत्सवाचे प्रत्येक सत्रानुसार स्वतंत्र वार्तांकन करुन त्यास विपुल प्रसिध्दी देत असतात त्यामुळे ग्रंथमहोत्सवाची चर्चा सर्वदूर होत असते. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागातील विद्यार्थी शिक्षक येथे येतात नवे ज्ञान, नव सृजन व नवा विचार घेवून शाळेत जातात. त्यामुमे उमलत्या पिढीला वाचनसंस्कार देण्यात हातभार लागतो. मला वाटते सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवात समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या मार्फत होत असलेल्या ग्रंथमहोत्सवात आता जिल्ह्यातील आबालवृध्द, युवक, युवती या सर्वांनी सहभागी व्हावे. आपली सातारा जिल्ह्याची भूमी जशी क्रांतीकारकांची तशीच ती साहित्यिकांची, विचारवंताची आहे. या वर्षी ग्रंथमहोत्सवात शेतकरी बापावर कविता लिहिणारे परभणीचे कवी इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, श्रीपाल सबनीस, कवी उध्दव कानडे, रेणू गावस्कर, एकनाथ आव्हाड, सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील नगरी असे ग्रंथोत्सवाच्या ठिकाणास नाव दिले असून दि. 03 जानेवारी ते 06 जानेवारी असा चार दिवस अनेक कार्यक्रमांचा वैचारीक समृध्दी देणारा असा हा ग्रंथमहोत्सवा होत आहे. मला वाटते अशा वाचनसंस्कृतीत अधिक उत्तेजना देणार्‍या उपक्रमात सहभागाला अधिक महत्त्व आहे. आता काळ बदलला आहे. गावोगाव, घरोघर वाहने उपलब्ध आहेत. संपर्क माध्यमे आहेत. शेतकरी श्रमिक व सर्वसामान्य जनतेचा सहभाग ग्रंथमहोत्सवात दिसला, त्याचे कष्टलेले पाय व मन ग्रंथाच्या दिशेने वळले तर तो आनंद शब्दात मांडता येणार नाही. ?खरंच कशाला झाली पुस्तकांची ओळख गावची गुरे (ओळली) राखली असती बरे झाले असते? असे दया पवार कोंडवाडा कविता संग्रहात म्हणतात, त्यामागे कष्टलेल्या जीवाला असलेले अनिवार दुःख आहे. पण हे आपले जगणे समजून घेण्यासाठी पुन्हा पुस्तकांची वाट धरावी लागते. असे जीवन प्रतिबिंबित करणारे काव्य, लेखन यांचे दर्शन ग्रंथमहोत्सवातून घडते. यासाठी आपण आवर्जून वेळ काढायला हवा. अगदी सहज फेरफटका मारला तरी पाय सहजासहजी बाहेर पडणार नाहीत. ग्रंथमहोत्सवाचे अनोखे रुप,विचारमंथन बघून आपण तसेच रमून जाल. प्रत्येक माणसाला विचार असतो व विचारांची भूक असते. पुस्तकांच्या जगात आल्याशिवाय विचाराचे धन मिळत नाही. ?शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका।? असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात ते खरे आहे, सत्य आहे. आपण देशातील पुस्तकांचे पहिले गाव म्हणून भिलारला जातो. सातारा जिल्ह्यातच हे पुस्तकांचे गांव व्हायला जी अनेक कारणे असतील त्यात सातार्‍याचा सुप्रसिध्द ?ग्रंथमहोत्सव? हे एक कारण आहे.असे मला वाटते. आपल्या जिल्ह्यात साहित्यप्रेम व वाचन संस्कृती याविषयी अधिक प्रेम आहे. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या साहित्यिक प्रतिभेच्या कृष्णकाठावर सतत तेवणारा विचारांचा दीप म्हणजे हा ?ग्रंथमहोत्सव? असे आपण म्हटले तर ते योग्य होईल. शासनाच्या वतीने साजरा करण्यात येणार्‍या ग्रंथमहोत्सवाचे बीज सातारच्या ग्रंथमहोत्सवात आहे. असे मानले जाते. माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षणाधिकारी म्हणूनच नव्हे एक वाचनप्रेमी माणूस म्हणून सर्वांनी ग्रंथमहोत्सवास अगत्याने यावे, पुस्तके घ्यावीत, वाचावीत असे आवाहन आहे.

उदय कबुले व प्रदीप विधाते यांच्या निवडीने दिग्गजांना धक्का; हुकलेले मंत्रीपद व विधानसभेतील पराभवाला उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन

■ गणेश बोतालजी : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वाई विधानसभा मतदारसंघातील शिरवळ गटाचे उदय कबुले व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील खटाव गटाचे प्रदीप विधाते यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असणारी दिग्गजांची नावे अचानक मागे पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या आदर्श कार्यपध्दतीने सातारा जिल्हा परिषदेस एक आदर्श पायंडा घालून दिला. सर्व ठिकाणी समतोल साधत संजीवराजे यांनी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. संजीवराजेंची फेरनिवड पुन्हा अध्यक्षपदी होईल अशी इच्छा राष्ट्रवादीच्या बर्‍याच सदस्यांची व सातारा जिल्हावासियांचीही होती, परंतु त्यांची निवड न झाल्याने संजीवराजे प्रेमी यांची नाराजी वाढली आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याने त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे मसूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य मानसिंगराव जगदाळे यांचे नाव अचानक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या रेसमधून मागे पडले. कराड उत्तरला मंत्रीपद गेल्याने मानसिंगराव जगदाळे यांचा विचार झाला नसावा अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यातून ऐकू येत आहे. परंतु अशा कर्तबगार नेतृत्वाचा योग्य सन्मान भविष्यात व्हावा ही भावना कार्यकर्त्यामध्ये द़ृढ आहे. वाई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची मंत्रीपदाची संधी हुकल्याने त्यांचे अनेक समर्थक नाराज होते. अनेकांनी राजीनामास्त्रही काढले. ही नाराजी दूर करण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक समजले जाणारे उदय कबुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीने सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी खासदार कै.लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांनी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी भक्कमपणे उभी केली. त्यांचे सुपुत्र जननायक आमदार मकरंद पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळणारच हीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दृढ इच्छा होती. उदय कबुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन मंत्रीपदाबाबत झालेली नाराजी भरुन निघेल का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांंचा पराभव झाला. शशिकांत शिंदे यांचे समर्थक समजले जाणारे प्रदीप विधाते यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करुन झालेल्या पराभवाची पोकळी भरुन काढत राष्ट्रवादी पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्वाकडून करण्यात आलेला आहे. मायणी गटातील जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे हे ही अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये प्रमुख दावेदार होते. परंतु राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्नात गुदगेंचेही नाव मागे राहिल्याची चर्चा होत आहे. एकंदरीत सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य कसा राहील? यावर पक्षनेतृत्वाने भर दिलेला आहे. परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असणारे प्रमुख दावेदार अचानक मागे पडल्याने त्यांची नाराजी दूर करण्याचे व समतोल राखण्याचे आव्हान यापुढे राष्ट्रवादीपुढे असणार हे मात्र निश्चित!

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सातारा : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी डॉ. विनोद खाडे तर विनोद कुलकर्णी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी दै प्रभात चे प्रकाश राजेघाटगे, कोषाध्यक्षपदी सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची निवड झाली आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र च्या सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बैठक खटाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाली. प्रारंभी येथील संत सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व एन यु जे एम जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचे वतीने नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प पू सुंदर गिरी महाराज यांचे हस्ते राज्य अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचा देवस्थानचे महावस्त्र, पुष्पहार, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थानचे चेअरमन मोहन जाधव,विश्वस्त व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त सुरेशशेठ जाधव , विशाल माने,आदींची उपस्थिती होती. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र ही संघटना नॅशनल जर्नालिस्ट ऑफ इंडिया, दिल्ली या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट, ब्रुसेल्स ची सदस्य आहे. असं सांगून शीतल करदेकर यांनी ही संघटना केवळ पत्रकार संघटना नसून, समाजातील प्रत्येक पत्रकारासाठी संरक्षण, आरोग्य विषयक अडचणी, कौटुंबिक प्रश्न, कार्यालयीन प्रश्न आदी बाबीवर काम करणारी संघटना आहे. प्रत्येक पत्रकार हा सुरक्षित व भयमुक्त आणि सन्मान्य जीवन जगला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी ही संघटना आहे. असं ही शीतल करदेकर यांनी या वेळी सांगितले. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून पत्रकारांसाठी मेडिक्लेम, वैद्यकीय उपचार मदती विषयी काही सुविधा दिल्या जाव्यात, असंही शीतल करदेकर म्हणाल्या. यावर देवस्थान चे मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज व विश्वस्त डॉ सुरेश जाधव आदींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. दै सोलापूर तरुण भारत चे विशेष प्रतिनिधी व एन टी व्ही न्युज मराठी चे सातारा प्रतिनिधी डॉ विनोद खाडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर दै सोलापूर तरुण भारत चे सातारा आवृत्ती संपादक विनोद कुलकर्णी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दै प्रभात बुध चे प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांची जिल्हा सचिवपदी तर सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून साप्ताहिक माणदेशी न्यूज चे संपादक विजय टाकणे, दै लोकमत चे लोणंद प्रतिनिधी संतोष खरात, दै लोकमत चे म्हसवड प्रतिनिधी सचिन मंगरुळे, दै सोलापूर तरुण भारत,पाटण प्रतिनिधी अरविंद जाधव,दै सत्यसह्याद्री चे फलटण प्रतिनिधी विक्रम चोरमले यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडी राज्य अध्यक्षा शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून यावेळी एनयुजेएम सातारा जिल्हा अध्यक्ष रूपेश कदम(दै सकाळ), लालासाहेब दडस( तरुण भारत),प्रकाश सुरमुख,(दै पुण्यनगरी) महेश तांबवेकर,(लोकप्रवाह न्यूज) संदीप कुंभार,(दै लोकमत) किरण देशमुख(दै प्रभात) मुन्ना मुल्ला(ऐक्य) जे के काळे ( दै सत्यसह्याद्री) संतोष सुतार(महाराष्ट्र न्यूज) दिलीप वाघमारे (टी व्ही 1) सुनील पाटे (सह्याद्री वेध) आदींची उपस्थिती होती. एनयुजेएम चे मार्गदर्शक मा शिवेंद्रकुमारजी यांनी कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या आहेत

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सातारा : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी डॉ. विनोद खाडे तर विनोद कुलकर्णी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी दै प्रभात चे प्रकाश राजेघाटगे, कोषाध्यक्षपदी सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची निवड झाली आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र च्या सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बैठक खटाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाली. प्रारंभी येथील संत सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व एन यु जे एम जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचे वतीने नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प पू सुंदर गिरी महाराज यांचे हस्ते राज्य अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचा देवस्थानचे महावस्त्र, पुष्पहार, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थानचे चेअरमन मोहन जाधव,विश्वस्त व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त सुरेशशेठ जाधव , विशाल माने,आदींची उपस्थिती होती. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र ही संघटना नॅशनल जर्नालिस्ट ऑफ इंडिया, दिल्ली या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट, ब्रुसेल्स ची सदस्य आहे. असं सांगून शीतल करदेकर यांनी ही संघटना केवळ पत्रकार संघटना नसून, समाजातील प्रत्येक पत्रकारासाठी संरक्षण, आरोग्य विषयक अडचणी, कौटुंबिक प्रश्न, कार्यालयीन प्रश्न आदी बाबीवर काम करणारी संघटना आहे. प्रत्येक पत्रकार हा सुरक्षित व भयमुक्त आणि सन्मान्य जीवन जगला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी ही संघटना आहे. असं ही शीतल करदेकर यांनी या वेळी सांगितले. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून पत्रकारांसाठी मेडिक्लेम, वैद्यकीय उपचार मदती विषयी काही सुविधा दिल्या जाव्यात, असंही शीतल करदेकर म्हणाल्या. यावर देवस्थान चे मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज व विश्वस्त डॉ सुरेश जाधव आदींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. दै सोलापूर तरुण भारत चे विशेष प्रतिनिधी व एन टी व्ही न्युज मराठी चे सातारा प्रतिनिधी डॉ विनोद खाडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर दै सोलापूर तरुण भारत चे सातारा आवृत्ती संपादक विनोद कुलकर्णी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दै प्रभात बुध चे प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांची जिल्हा सचिवपदी तर सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून साप्ताहिक माणदेशी न्यूज चे संपादक विजय टाकणे, दै लोकमत चे लोणंद प्रतिनिधी संतोष खरात, दै लोकमत चे म्हसवड प्रतिनिधी सचिन मंगरुळे, दै सोलापूर तरुण भारत,पाटण प्रतिनिधी अरविंद जाधव,दै सत्यसह्याद्री चे फलटण प्रतिनिधी विक्रम चोरमले यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडी राज्य अध्यक्षा शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून यावेळी एनयुजेएम सातारा जिल्हा अध्यक्ष रूपेश कदम(दै सकाळ), लालासाहेब दडस( तरुण भारत),प्रकाश सुरमुख,(दै पुण्यनगरी) महेश तांबवेकर,(लोकप्रवाह न्यूज) संदीप कुंभार,(दै लोकमत) किरण देशमुख(दै प्रभात) मुन्ना मुल्ला(ऐक्य) जे के काळे ( दै सत्यसह्याद्री) संतोष सुतार(महाराष्ट्र न्यूज) दिलीप वाघमारे (टी व्ही 1) सुनील पाटे (सह्याद्री वेध) आदींची उपस्थिती होती. एनयुजेएम चे मार्गदर्शक मा शिवेंद्रकुमारजी यांनी कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या आहेत

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र संघटनेच्या सातारा जिल्हा कोषाध्यक्षपदी सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची निवड

सातारा : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र संघटनेच्या सातारा जिल्हा कोषाध्यक्षपदी सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची निवड झाली आहे. तर कार्याध्यक्ष पदी डॉ. विनोद खाडे, उपाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी व सचिवपदी दै प्रभात चे प्रकाश राजेघाटगे यांची निवड झाली आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र च्या सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बैठक खटाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाली. प्रारंभी येथील संत सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व एन यु जे एम जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचे वतीने नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प पू सुंदर गिरी महाराज यांचे हस्ते राज्य अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचा देवस्थानचे महावस्त्र, पुष्पहार, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थानचे चेअरमन मोहन जाधव,विश्वस्त व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त सुरेशशेठ जाधव , विशाल माने,आदींची उपस्थिती होती नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र ही संघटना नॅशनल जर्नालिस्ट ऑफ इंडिया, दिल्ली या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट, ब्रुसेल्स ची सदस्य आहे. असं सांगून शीतल करदेकर यांनी ही संघटना केवळ पत्रकार संघटना नसून, समाजातील प्रत्येक पत्रकारासाठी संरक्षण, आरोग्य विषयक अडचणी, कौटुंबिक प्रश्न, कार्यालयीन प्रश्न आदी बाबीवर काम करणारी संघटना आहे. प्रत्येक पत्रकार हा सुरक्षित व भयमुक्त आणि सन्मान्य जीवन जगला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी ही संघटना आहे. असं ही शीतल करदेकर यांनी या वेळी सांगितले. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून पत्रकारांसाठी मेडिक्लेम, वैद्यकीय उपचार मदती विषयी काही सुविधा दिल्या जाव्यात, असंही शीतल करदेकर म्हणाल्या. यावर देवस्थान चे मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज व विश्वस्त डॉ सुरेश जाधव आदींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. दै सोलापूर तरुण भारत चे विशेष प्रतिनिधी व एन टी व्ही न्युज मराठी चे सातारा प्रतिनिधी डॉ विनोद खाडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर दै सोलापूर तरुण भारत चे सातारा आवृत्ती संपादक विनोद कुलकर्णी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दै प्रभात बुध चे प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांची जिल्हा सचिवपदी तर सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून साप्ताहिक माणदेशी न्यूज चे संपादक विजय टाकणे, दै लोकमत चे लोणंद प्रतिनिधी संतोष खरात, दै लोकमत चे म्हसवड प्रतिनिधी सचिन मंगरुळे, दै सोलापूर तरुण भारत,पाटण प्रतिनिधी अरविंद जाधव,दै सत्यसह्याद्री चे फलटण प्रतिनिधी विक्रम चोरमले यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडी राज्य अध्यक्षा शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून यावेळी एनयुजेएम सातारा जिल्हा अध्यक्ष रूपेश कदम(दै सकाळ), लालासाहेब दडस( तरुण भारत),प्रकाश सुरमुख,(दै पुण्यनगरी) महेश तांबवेकर,(लोकप्रवाह न्यूज) संदीप कुंभार,(दै लोकमत) किरण देशमुख(दै प्रभात) मुन्ना मुल्ला(ऐक्य) जे के काळे ( दै सत्यसह्याद्री) संतोष सुतार(महाराष्ट्र न्यूज) दिलीप वाघमारे (टी व्ही 1) सुनील पाटे (सह्याद्री वेध) आदींची उपस्थिती होती. एनयुजेएम चे मार्गदर्शक मा शिवेंद्रकुमारजी यांनी कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या आहेत

साताऱ्यात पत्रकार मारहाणप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील १ ला गुन्हा दाखल; एनयुजे महाराष्ट्रची कठोर कारवाईची मागणी

सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुध येथील पत्रकार प्रकाश राजेघाडगे यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीत टाळेबंदीमध्ये बाहेर गावावरून कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता गावात प्रवेश केलेल्या व्यक्तीवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती.त्या बातमीचा राग मनात धरून त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पत्रकार प्रकाश राजे घाडगे यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली होती. सदर गुन्हा घडलेल्या दिवशी पुसेगाव पोलीस ठाण्यात भा द वि कलम ४५२,३२३,५०४,५०६,३४ नुसार दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम लावण्यात आले नव्हते.ही बाब लक्षात आल्यानंतर एन यु जे एम चे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ विनोद खाडे व सचिव प्रकाश राजेघाडगे यांनी राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या सूचनेवरून कोरेगावचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी बी बी महामुनी यांचे बरोबर संपर्क साधला असता त्यांनी संचारबंदी कायदा असल्याने मा न्यायालयाची परवानगी घेवून पत्रकार संरक्षण कायद्या ची अंमलबजावणी करू असे सांगितले....आणि तीन दिवसांतच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार दोषींवर पत्रकार संरक्षण कायदा कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला गेला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील हा पत्रकार संरक्षण कायद्यानुसार १ला गुन्हा दाखल झाला असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे अशी मागणी सातारा जिल्हा एनयुजेएम ने केली आहे.

कोरोनाच्या संकटातही अपंग, दिव्यांगांना मदत करा : रमेश उबाळे, बालाजीतर्फे धगधगत्या उन्हात मुलांना कलिंगडचे वाटप

कोरेगाव : कोरोनाशी दोन हात करून समाजातील अपंग, दिव्यांग घटकांना न विसरता मदत केली पाहिजे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी केले आहे. जिल्ह्यात बांधकाम व्यवसायात कार्यरत असणाऱ्या बालाजी कन्स्ट्रक्शन व कृषी तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे धनंजय पाटील यांचे सौजन्याने वाघजाईवाडी ता. कोरेगाव येथील आशाग्राम दिव्यांग मुलांचे शासकीय संमत केंद्र तसेच सातारा येथील अशाग्राम येथील दिव्यांग व अपंग मुलांना कलिंगड वाटप करण्यात आले. त्यावेळी रमेश उबाळे बोलत होते. रमेश उबाळे पुढे म्हणाले, दोन हात कोरोनाशी एक पाऊल मदतीचे हा मंत्र जपत कोरोनाच्या संकटात काम केले पाहिजे. कोरोनाचे संकट मोठे जरूर आहे परंतु या काळातही माणुसकी जपत कोरोनला आपणास हरवायचे आहे. समाजातील सक्षम लोकांना अपंग, दिव्यांगासाठी मदतीचा हात दिला पाहिजे. कोरोनाची साथ सुरू आहे. घराबाहेर पडणेही सध्या मुश्किल झाले आहे. परंतु मी घरामध्ये जरी असलोतरी मला या मुलांची आठवण कायम येत होती. सध्या उन्हाळा सुरू आहे. धगधगते उन्ह आहे.आमचे सहकारी मित्र धनंजय पाटील, गणपत घाडगे विक्रम माने यांचेकडे मी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर त्यांनी होकार दर्शविला आम्ही या ठिकाणी येऊन या मुलांना कलिंगड दिल्यानंतर आज मानसिक समाधान मिळाल्याचेही यावेळी नमूद करत रमेश उबाळे म्हणाले, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा वाढदिवस या मुलांसोबत साजरा करतो. मी देवाला जरूर मानतो परंतु प्रत्यक्ष देव मला अंध, अपंग,दिव्यांगामध्ये दिसतो म्हणून आज या बोरजाईवाडी, सातारा येथील या मुलांमध्ये आल्यानंतर मंदिरात आल्यासारखे वाटत आहे.कोरोनाचे संकट जरी आले असले तरी या घटकांकडेही शासनाने, समाजाने लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. यावेळी रमेश उबाळे, धनंजय पाटील, गणपत घाडगे, विक्रम माने यांचे हस्ते कलिंगड देण्यात आले.दरम्यान सर्वच मुलांनी कलिंगडचा आस्वाद घेत रमेश उबाळे, धनंजय पाटील यांचे धन्यवाद व्यक्त करत आशीर्वाद देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ■ चौकट ■ परंतु राजकारण, समाजकारणात नव्हतो तेव्हापासून समाजातील दुरबल घटकांविषयी आस्था आहे. काही माझे हितचिंतक माझ्यावर प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप करतात परंतु आजोबा-पणजोबापासून आम्ही हे पुण्य करतआहे परंतु माझ्यावर आरोप करणारानी कधीतरी आपल्या खिशात हात घालावा असे आवाहनही उबाळे यांनी त्यांचे राजकीय हितशत्रूंना यावेळी बोलताना केले.

परप्रांतीयांच्या जाण्याने भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध : आ. शिवेंद्रसिंहराजे; स्थानिक बेरोजगारांनी संधीचे सोने करण्याचे आवाहन

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु असून महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूर आणि कामगार त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. सध्यस्थितीला प्रशासनाने औद्योगिक कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली असून सातारा एमआयडीसीतील कंपन्या सुरु झाल्या आहेत. परप्रांतीयांच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्द्ध झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी या संधीचे सोने करून विविध कंपन्यांमध्ये आपल्या शैक्षणिक अहर्तेनुसार नोकरी मिळवावी आणि बेरोजगारीला आळा घालावा, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. रोजगार उपलब्ध नाही, नोकरी मिळत नाही. परप्रांतीयांमुळे एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी नाही. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईवर अवलंबून रहावे लागते, असे आपण नेहमीच ऐकत असतो. आज परिस्थिती वेगळी आहे. कोरोना महामारीमुळे देशभरात लॉक डाऊन सुरु आहे. लॉक डाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जे ते आपापल्या राज्यात, घरी परत जात आहेत. साताऱ्यातूनही हजारो परप्रांतीय त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यामुळे सातारा एमआयडिसीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशीन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्याअसंख्य जागा रिक्त झाल्या आहेत. विविध ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये वाहन चालकांची असंख्य पदे रिक्त झालेली आहेत. कोरोनासारखी महाभयंकर साथ ही वाईट आहेच पण, यामुळे का होईना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. ही चालून आलेली संधी स्थानिक भूमिपुत्रांनी कॅच केली पाहिजे. सातारा एमआयडीसीमध्ये विविध कंपन्या असून या कंपन्या आता सुरु झाल्या आहेत. परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात परत गेल्याने सर्वच कंपन्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. या रिक्त जागेवर नोकरीची संधी स्थानिकांसाठी चालून आली आहे. त्यामुळे या संधीचे सोने करणे आणि बेरोजगारीला आळा घालणे यासाठी तरुणांनी सर्वोतोपरी प्राधान्य दिले पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळत नाही, बेरोजगारी वाढली असे म्हणण्यापेक्षा आता बेरोजगारी संपुष्टात आणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांनी, कामगारांनी एमआयडीसीमध्ये उपलब्ध नोकरीच्या संधी शोधून त्या मिळवल्या पाहिजेत. कंपन्यांनाही कामगारांची गरज आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संधीचा फायदा घ्यावा आणि स्थानिक बेरोजगारीला आळा घालण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

घरीच करा सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी : तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ; वाई तालुक्यात सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी अभियान

वाई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या खरीप हंगामात स्वतःचे सोयाबीन बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांनी घरीच उगवणक्षमता चाचणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी कमी करून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणे.तसेचउत्पादन खर्चात बचत करणे या दुहेरी उद्देशाने उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांच्या मार्गदर्शनातून सोयाबीन उगवणक्षमता चाचणी प्रत्येक गावात आयोजित करणेत आलेली आहे. वाई तालुक्यात खरीप हंगामामध्ये सोयाबिन पिकाची अंदाजे ४७०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या हे पिक फायदेशीर आहे.बरेचसे शेतकरी हे सोयाबीन पिकाची पेरणी करणेसाठी स्वतःजवळचे बियाणे वापरत असतात.परंतु असे बियाणे वापरण्यापूर्वी बियाण्याची उगवणक्षमता चाचणी घेणे आवश्यक आहे.जेणेकरून बियाण्याची उगवणक्षमता तपासली जाईल आणि परिणामी पुढे होणारे पिकाचे नुकसान टाळता येईल. हि चाचणी घेताना शेतकऱ्यांनी आपल्या घरी उपलब्ध असलेले बियाणे स्वच्छ निवडून पोत्यात भरून ठेवावे.त्या सर्व पोत्यातील मुठभर बियाणे घ्यावे आणि सर्व बियाणे एकत्रित करून त्यामधील १०० दाणे मोजून घ्यावेत.हे दाणे स्वच्छ धुतलेल्या गोणपाटाच्या अर्ध्या भागावर दहाच्या संख्येने दहा ओळीत पसरावे.प्रत्येक दाणा व ओळीमध्ये १ इंच अंतर ठेवावे.नंतर गोणपाटावर हलकेसे पाणी शिंपडून ओले करावे.उरलेला अर्धा गोणपाटाचा भाग बियाण्यावर झाकून ठेवावा किंवा अर्धा भाग कापून बियाणे असलेल्या अर्ध्या भागाची गुंडाळी करून स्वच्छ आणि थंड कोरड्या जागेत ५ ते ६ दिवस ठेवावा.गोणपाट किंचित ओले राहील, एवढेच आवश्यक असेल तेव्हा शिंपडावे.५ ते ६ दिवसानंतर गोणपाट उघडून निरीक्षण करावे.शंभर दाण्यापैकी जर ७० ते ८० पेक्षा जास्त दाणे अंकुरित झाले असतील तर ते बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असे समजावे.असे बियाणे पेरणीसाठी एकरी ३० किलोप्रमाणे वापरावे. जर ६० ते ७० दाणे अंकुरित झाले असतील तर पेरणीसाठी एकरी ३५ ते ४० किलो बियाणे वापरावे.जर ६० पेक्षा कमी बियाणे अंकुरित झाले असतील तर असे बियाणे पेरणीसाठी वापरू नये. उगवणक्षमता चाचणीतून तपासणी केलेले योग्य बियाणे पेरणी होईपर्यंत थंड व कोरड्या हवेशीर जागेत फळी टाकून त्यावर फक्त ४ ते ५ पोत्यांचीच थप्पी लावून बियाणे साठवण करावी.तसेच असे बियाणे स्वतःसाठी तसेच गटातील इतर सर्व शेतकऱ्यांसाठी वापरावे.पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम, पी.एस.बी. ची बीजप्रक्रिया करून बियाणे पेरणी करावी.- हरिश्चंद्र धुमाळ,तालुका कृषी अधिकारी.

आमदार महेशदादा शिंदे विचार मंचतर्फे कोरोना फायटर्सना आरोग्य किटचे वितरण

कोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गेली दीड महिने अहोरात्र कार्यरत असलेल्या नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांना आमदार महेशदादा शिंदे विचार मंचतर्फे आरोग्य किटचे शुक्रवारी वितरण करण्यात आले. आ. शिंदे हे व्यक्तीगतरित्या नगरपंचायत कर्मचार्‍यांची काळजी घेत असल्याने कर्मचार्‍यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, कोरेगाव शहरात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा शिरकाव होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली. कोरेगाव शहर आणि परिसराची लोकसंख्या २५ हजारांहून अधिक असून, नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र स्वच्छता मोहीम राबवून शहराचा कोरोनाचा प्रार्दुभाव होणार नाही, याची दक्षता घेत आहेत. संपूर्ण शहराचे र्निजंतुकीकरण, कचरा निर्मुलन यासह शासनाकडून दररोज येणार्‍या आदेशांची अंमलबजावणी केली जात आहे. शहरात होणारी वाढती गर्दी टाळण्यासाठी तीन ठिकाणी भाजी मंडई भरविण्यात आली असून, नगरपंचायतीचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. नगरपंचायतीचे कर्मचारी हे देखील सामान्य माणसे आहेत, त्यांच्याप्रमाणे कुटुंबियांना देखील कोरोनाची भीती आहे, मात्र कोरोना फायटर्स असल्याने नगरपंचायतीचे कर्मचारी धोका पत्कारुन काम करत आहेत. आमदार महेश शिंदे यांनी नगरपंचायत कर्मचार्‍यांची विशेष काळजी असल्याने त्यांना आरोग्य किट पुरविण्याचा विचार बोलून दाखविला होता. त्यानुसार आमदार महेशदादा शिंदे विचार मंचतर्फे आरोग्य किट तयार केले होते. शुक्रवारी कोरेगाव पंचायत समिती कार्यालयात आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते सुनील खत्री, युवा नेते राहूल प्र. बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक महेश बर्गे, सुनील बर्गे, राहूल र. बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत कर्मचार्‍यांना आरोग्य किटचे वितरण करण्यात आले. आमदार शिंदे म्हणाले की, कोरेगाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात नगरपंचायत कर्मचारी घेत असलेले परिश्रम हे वाखाण्याजोगे आहेत. त्यांनी जीवाची पर्वा न करता, अत्यावश्यक सेवा व्यवस्थित सुरु ठेवल्या असून, सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेत आहेत. नगरपंचायत कर्मचार्‍यांचे अनेकविध प्रश्‍न असून, ते सोडविण्यासाठी नजिकच्या काळात प्रयत्न केले जाणार आहेत. राजाभाऊ बर्गे यांनी आरोग्य किट तयार करण्याबरोबरच त्याचे वितरण करण्यामागील भूमिका विषद केली. साथरोग नियंत्रणाबरोबरच स्वच्छता अभियानामध्ये देखील कोरेगावने देशपातळीवर यश मिळवले होते, त्यामध्ये नगरपंचायत कर्मचार्‍यांचा मोलाचा वाटा होता, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सहकारातील दीपस्तंभ : स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले

सातारा म्हणजे मराठ्यांची राजधानी. छ. शिवाजी महाराजांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या या राजघराण्याचा श्रीमंत छ.अभयसिंहराजे भोसले यांनी आपल्या अलौकीक कार्यकर्तृत्वाने नावलौकीक वाढवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती घराण्याचा समाजसेवेचा वारसा जोमाने चालवणाऱ्या स्व. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्याची ओळख जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजीक आणि राजकीय पटलावर करून दिली . सहकाराच्या माध्यमातून सातारा तालुक्याचा कायापालट करणाऱ्या स्व. भाऊसाहेब महाराजांना सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाते. सहकारातील दीपस्तंभ ठरलेल्या श्रीमंत छ. स्व. भाऊसाहेब महाराजांची आज ७६ वी जयंती.त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा... छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी मनाची अस्मिता आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. याच ऐतिहासिक आणि वंदनीय घराण्यात भाऊसाहेब महाराजांचा जन्म झाला. राजघराण्यातील असलो, तरी आपण एक सामान्य माणूस आहोत या भावनेतून संपूर्ण जीवन जगताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी अहोरात्र समाजासाठी कष्ट घेतले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत स्व. भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. केवळ राजघराण्यात जन्म घेतला म्हणून माणूस मोठा होत नाही तर त्याच्या कर्तृत्वाने तो मोठा होतो, हे श्रीमंत छ .स्व. भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या अजोड कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सातारा तालुक्याची अवहेलना होत असताना, स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या रूपाने तालुक्याला एक उमदे आणि सक्षम नेतृत्व लाभले आणि सातारा तालुक्याचे नाव राज्याच्या राजकारणात आदराने घेतले जावू लागले. या तालुक्याचे नेतृत्व करताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी सहकार क्रांती घडवली आणि सातारा तालुक्यातील गोर- गरीब, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्त करतानाच तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला. राजकारणात सक्रिय झाल्या नंतर विविध पदे सक्षमपणे सांभाळून त्या पदाच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील जनतेचा विकास साधण्याचा प्रयत्न स्व. भाऊसाहेब महाराज यांनी केला. सहकार मंत्री असताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी सपूंर्ण राज्यात सहकार क्रांती घडवून आणली. प्रत्येक गावात विकास सेवासोसायट्यांचे जाळे विणले आणि जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला आर्थिक सक्षम करण्याचे अनमोल काम स्व. भाऊसाहेब महाराजांनी केले. विना सहकार नही उद्धार हे ओळखूनच स्व. भाऊसाहेब महाराजांनी शेंद्रे येथील उजाड माळरानावर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुकाच नव्हे, तर आसपासच्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची संस्था उभी करून दिली. आज याच साखर कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह आपसपासच्या तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळत आहे. याच कारखान्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. याच कारखान्यामुळे तालुक्यातील हजारो बेरोजगार हातांना रोजगार मिळाला आहे आणि याच कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह पर जिल्ह्यातीलच नव्हे, तर परराज्यातील सुद्धा असंख्य घरातील चुली दरवर्षी पेटतात, ही वस्तुस्थिती आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यानंतर स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची उभारणी केली. आज त्यांचे सुपुत्र आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूत गिरणीतून उत्तम दर्जाचे सूत उत्पादीत केले जाते आणि हे सूत देशी व परदेशी बाजारपेठेतही निर्यात केले जात आहे. सूत गिरणीच्या माध्यमातूनही हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. साखर कारखान्याच्या सहवीजप्रकल्पातून निर्माण होणारी वीज, वीज वितरण कंपनीला वितरित केली जाते. यामुळेच सातारा शहर आणि तालुक्यातील भारनियमन आटोक्यात आले आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनातून अजिंक्य उद्योग समूहात विविध संस्थांची उभारणी झाली आणि सहकारातील मानबिंदू म्हणून अजिंक्य उद्योग समूहाचा नावलौकिक झाला. अजिंक्य उद्योग समूहामुळे सातारा तालुका राज्याच्या सहकार क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. जलक्रांतीचे जनक- राजकारणात सक्रिय राहून, राजकारणाला कमी महत्त्व देत समाजकारण करणारऱ्या स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यात सहकार क्रांतीबरोबरच जलक्रांती घडवून सातारा तालुक्याला कृषीप्रधान तालुका बनवले. तालुक्यात ठिक ठिकाणी पाणीसाठवण बंधारे बांधले. प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडले. प्रत्येक गावात अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सभामंडप, सुसज्ज ग्रामपंचायत इमारती उभ्या करून प्रत्यके गावाला विकासप्रवाहात आणले. सातारा तालुक्याचा चौफेर विकास साधून जिल्ह्यात सातारा तालुक्याला नेहमीच अग्रसेर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळेच सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून आजही स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. मी राजा नाही, जनतेचा सेवक आहे, हीच भूमिका घेऊन स्व. भाऊसाहेब महाराजांनी आपले संपूर्ण जीवन जनसामान्यांसाठी खर्ची घातले. अखंडपणे जनतेची सेवा केली आणि त्यामुळेच प्रत्येक घराघरात आपला हक्काचा माणूस म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचा आजही आदराने उल्लेख केला जातो. शांत, संयमी, नेहमी हसतमुख आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा जनसामान्यांचा राजा म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते आणि यापुढेही कायम घेतले जाईल. राजकारणात राहूनही राजकारण न करणारा, जातपात, गटतट न मानणारा आणि नेहमी समाजासाठी झटणाऱ्या सर्वसामान्यांच्या या राजाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन ..! ◆ अमर मोकाशी (जनसंपर्क अधिकारी सुरुची सातारा)

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालय जनसंपर्क अधिकारी पदी श्री दिपेश अशोक वझे यांची नियुक्ती; नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश

वसई : वसई विरार महानगरपालिका होऊन दहा वर्षे उलटून गेली तरी वसई-विरार महानगरपालिकेला अद्याप अचूक समन्वयासाठी जनसंपर्क अधिकारी नव्हता. नवनियुक्त पालिका आयुक्त डी गंगाथरन यांनी ४ जून २०२० रोजी पत्रकार परिषद बोलावली होती, मात्र या पत्रकार परिषदेला प्रमुख व ज्येष्ठ पत्रकारांना डावलण्यात आले होते तर काहींना कळवण्यात आले नव्हते. यावर केवळ आपल्या प्रसार माध्यमांतून टीका करणे हा उपाय नसून पुढील काळात असे प्रसंग येऊन जनसमन्वयातील कमतरता दूर करण्यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई यांनी पालिका आयुक्त डी गंगाथरन यांना जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती . या मागणीला पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला असून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालय जनसंपर्क अधिकारी पदी श्री दिपेश अशोक वझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वसई-विरार मधील पत्रकारांना जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व बातम्या पोहचल्या जातील! या तातडीने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल एनयुजे महाराष्ट्राच्या वतीने एनयुजे महाराष्ट्र कोषाध्यक्ष वैशाली आहेर तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई, सचिव अनिल पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र घरत यांनी नवनिर्वाचित जनसंपर्क अधिकारी दीपक वझे यांचे अभिनंदन केले आणि आयुक्त डी गंगाथरण यांचे आभार मानले आहेत.

पुण्यातला जैविक कचरा आणून सातारकरांच्या जीवाशी खेळू नका; आ. शिवेंद्रसिंहराजेंचा इशारा, नागरिकांच्या आरोग्याबाबत तडजोड खपवून घेणार नाही

सातारा : सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असून सातार्‍यातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असताना पुण्यातील जैविक कचरा सातारा नगर पालिकेच्या कचरा डेपोमध्ये आणला जातो आणि सातारकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होतो, ही मोठी चिंताजनक आणि संतापजनक बाब आहे. सातारकरांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. सातारकरांच्या अडचणीत भर टाकण्याचा प्रकार कोणी करु नये, असा इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, सातार्‍यातही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. असे असताना पुणे महानगर पालिकेतील जैविक कचर्‍याचे दोन डंपर सातारा कचरा डेपोत येतात. सोनगांव कचरा डेपोत दिवसाला १०० किलो विघटन क्षमता असताना तब्बल ४- ५ टन जैविक कचरा सातार्‍यात आणला जातो, ही बाब अत्यंत चुकीची आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. सातारा पालिका प्रशासनाने हा प्रकार का केला? याबाबत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांना तरी माहिती आहे का? मु?याधिकार्‍यांनी मनमानी कारभार करुन नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. पुण्यातल्या जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी- चिंचवड, लोणावळा अथवा अन्य नजीकच्या नगर पालिका आहेत. असे असताना हा कचरा सातार्‍यात आला कसा? यासाठी नगर पालिकेने परवानगी दिली होती का? मु?याधिकार्‍यांनी यासाठी परवानगी दिली कशी? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सातारा शहरानजीकची उपनगरे, काही गावांतील कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये टाकण्यासाठी नगर पालिका आडकाठी आणत असते. असे असताना पुण्यातील धोकादायक जैविक कचरा सोनगाव कचरा डेपोमध्ये येतो आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो, ही बाब गंभीर आहे. कोणीही काहीही टाकावे यासाठी सातारा हे डंपींग ग?ाऊंड आहे काय? असा संतापजनक सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे. सातार्‍यात आधीच अडचणी आहेत त्यात भर टाकण्याचा हा प्रकार आहे. कोरोनामुळे भितीचे वातावरण असताना जैविक कचरा आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सातारकरांसह आसपासच्या गावातील लोकांना धोका होवू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाहीत. पालिका प्रशासनाने तातडीने हा प्रकार थांबवून सातारकरांच्या आरोग्याबाबत सतर्क रहावे, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीन बियाणे प्रयोगाची कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी बांधावर जाऊन घेतली माहिती

वाई : वाई तालुक्यात ग्रामबीजोत्पादन अंतर्गत उत्पादित सोयाबीन बियाणे पेरणी केलेल्या शेतकरी सुनील शंकर जगताप गाव उडतारे यांच्या प्लॉटला कृषीमंत्री दादासाहेब भुसे, खा. श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली. यावेळी टोकण पद्धतीने सरीवर सोयाबीन पेरणी केल्याने एकरी फक्त 15 किलो बियाणे लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले.तसेच या पद्धतीने एकरी उत्पादन 20 क्विंटल घेतल्याचे सांगितले.यावेळी सोयाबीन पिकाची उगवण 100 टक्के झालेली असल्याने कृषीमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ,कृषी पर्यवेक्षक माणिक बनसोडे, कृषी सहायक निखिल मोरे, शेतकरी उपस्थित होते.

जे.एम. एन्टरप्रायजेस अल्पावधीत नावलौकिक मिळवेल : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा : आर्थिक मंदी, स्पर्धा आणि बेरोजगारीच्या काळात तीन होतकरु युवक एकत्र येवून नवीन उद्योगाचा पाया रोवतात, ही एक आदर्शवत आणि अभिमानास्पद बाब आहे. युवकांनी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर स्वत:च्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज असून त्यातूनच निर्माण झालेली जे.एम. एन्टरप्रायजेस ही संस्था अल्पावधीत नावलौकिक मिळवेल असा विश्‍वास आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. स्वप्नील जाधवराव, जगतनारायण दुबे आणि दिनेश गायकवाड या तीन सुशिक्षित मित्रांनी धाडसी पाऊल उचलत जे.एम. एन्टरप्रायजेसच्या रुपाने व्यवसायात पदार्पन केले असून या कंपनीच्या माहितीपत्रकाचे अनावरण आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्ञानदेव रांजणे, राजेंद्र जाधव, महेंद्र जाधव, जितेंद्र जाधव, विश्‍वजीत बर्गे, राहुल तांबोळी, जितेंद्र वारागडे, अभिजित जाधव, अनमोल जाधव, अजय माळवदे, गणेश बगाडे, सनि कांबळे आदी उपस्थित होते. कनिष्ठ ते वरिष्ठ पदावरील कुशल, अकुशल कामगार पुरवठा, हाऊसकिपींग, कारखाने, व्यवसायिक संकुल, दवाखाने, शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शॉपिंग मॉल आदी वास्तूंमध्ये साङ्गसङ्गाई, निर्जंतुकीकरण अशी कार्ये मशीन आणि कुशल कामगारांच्यामार्ङ्गत करणे, विविध प्रकारच्या आर्थिक संस्था, व्यवसाय यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक पुरवणे, रुग्णांसाठी काळजीवाहू कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, परिचारिका, परिचारक तसेच स्वच्छता यासार?या वैद्यकीय क्षेत्रातील सेवा, औद्योगिक क्षेत्रातील सर्वप्रकारची बांधकामे, इमारतींचे रंगकाम तसेच कोणत्याही पध्दतीचे दर्जेदार बांधकाम करणे आदी सेवा जे.एम. एन्टरप्रायजेसमार्ङ्गत दिल्या जाणार आहेत. तीनही युवकांनी चांगला निर्णय घेवून व्यवसायात पदार्पण केले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून तिघांच्या कुटूंबांची भरभराट होईल आणि लोकांनाही चांगली दर्जेदार सेवा मिळेल यात शंका नाही, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शुभेच्छा दिल्या. श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिन्ही मित्रांना या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

सलग शंभर दिवस, नियंत्रण कक्षात झेडपीमध्ये लढताहेत, करोना योद्धे...!

सातारा : करोना विषाणूच्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे .सातारा जिल्हा परिषद ही त्या बाबतीत मागे नाही.येथील आरोग्य विभागात मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद मध्ये आरोग्य विभागात नियंत्रण कक्ष स्थापन झाला .सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.आज तेथील कर्मचारी आणि अधिकारी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत तब्बल शंभर दिवस कोणतीही सरकारी अथवा वैयक्तिक सुट्टी न घेता राबताहेत.विशेष म्हणजे यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही अथक सहभाग आहे.संपूर्ण जिल्ह्याच्या विषाणू प्रादुर्भाव नियंत्रण ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आणि त्यानुसार सातत्याने न थकता विना सुट्टी काम चालू आहे ..शेकडो विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांशी सातत्याने संपर्क करण्यात येतो .त्यांची विचारपूस करण्यात येते जिल्ह्याची संपूर्ण परिस्थिती माहीत होण्यासाठी शेकडो प्रकारचे अहवाल कर्मचारी रात्रंदिवस तयार करून पुणे येथील आयुक्त कार्यालयाला तसेच आरोग्य उपसंचालक कार्यालयाला कळवित असतात.त्यानुसार नियोजनात तातडीने बदल करण्यात येतात, आजपर्यंत शेकडो प्रकारची माहिती पुस्तके, माहितीपत्रके प्रबोधनासाठी छापण्यात आली आहेत.त्या मार्गाने जिल्ह्यातील लाखो संख्येने असलेल्या जनतेपर्यंत काळजी कशी घ्यावी याचे प्रबोधन केले जात आहे .जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील सर्व अधिकारी तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका अथक परिश्रम चालू आहेत.जिल्हा परिषदेतील कक्षात " व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल" विशेष करून निर्माण करण्यात आला आहे.तेथून विविध संपर्क साधले जातात.तसेच जिल्ह्यातील आजारी असलेल्या नागरिकांशी प्रत्येक तालुकानिहाय कर्मचारी नेमून संपर्क साधून मार्गदर्शन केले जाते .मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत ,जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वारंवार या कक्षात आढावा घेऊन मार्गदर्शन केले आहे.माहिती तंत्रज्ञान कक्ष ,जिल्हा परिषद मुद्रणालय, यांच बहुमोल योगदान आहे.नूतन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येते.लाखो लोकांना रोज सुमारे साडेसात लाख मेसेज करून विषाणूपासून बचावासाठी, तसेच; प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे .वारंवार हात स्वच्छ धुणे ,मास्क वापरणे ,सामाजिक अंतर पाहणे अशा सूचना विविध प्रकारे जिल्ह्यात सातत्याने पोहोचवल्या जात आहेत.त्यासोबतच आयुर्वेदिक उपाय बाबत जनजागृती केली जात आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये ,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन पाटील ,माता-बाल संगोपन अधिकारी डॉक्टर प्रमोद शिर्के जिल्हा साथ रोग तज्ञ डॉक्टर सुभाष औंधकर हे नियोजनासाठी अविरत कष्ट घेत आहेत.उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव तसेच अविनाश फडतरे हे देखील वारंवार विविध प्रकारे नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असतात.हजारो कर्मचारी ,अधिकाऱ्यांना "अर्सेनिक अल्बम 30" गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून आजवर दोन लाखाहून अधिक मास्क तयार करण्यात आले आहेत.सुट्टी न घेता कामामुळे ताण तणाव जाणवतो, मात्र देशकार्यासाठी काम करणे अत्यंत समाधानकारक आहे अशा भावना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या .मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह सातत्याने कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे मनोबल मनोधैर्य वाढवत असतात.त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजबीले माफ करा; तीव्र आंदोलन करण्याचा रमेश उबाळे यांचा इशारा

कोरेगाव : कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजबीले माफ करा.अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी अधीक्षक अभियंता विद्युत महामंडळ सातारा यांना निवेदनही दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य शेतकरी हातावर पोट असणारे सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.त्यात महावीतरणने तीन महिन्याची वीज बिल दिले आहेत.ती सर्वसामान्य जनतेने कशी भरायची? असा सवाल रमेश उबाळे यांनी केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या हातात रोजगार नसल्याने लोक आर्थिक विवंचनेत असल्याने घरामध्ये अन्न धान्य नसल्याने उपासमार होत आहे.महामारीने जनता हवालदिल झाली असताना तीन महिन्यांचे वीज बील भरताना खूप अडचणीचे होणार आहे. सदरची विजबिले माफ करण्यात यावीत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा उबाळे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्याचे रमेश उबाळे म्हणाले.

Leave a comment


राजू शेट्टींचा महाआघाडीला रामराम, लोकसभा 'स्वाभिमानी' लढणार?


राहुल गांधी हे विमान कंपन्यांचे दलाल- रवीशंकर प्रसाद


Suresh Raina: अपघाती मृत्यूची अफवा रैनाने फेटाळली


एसटीच्या एसी स्लीपर शिवशाही बसच्या तिकीट दरात भरघोस कपात - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा


दिव्यांगांना सुखद धक्का..''शिवशाही'' मध्ये आजपासून सवलत लागू


स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये महाराष्ट्राची मोहोर सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून महाराष्ट्र देशात अव्वल


All England Championships: चुरशीच्या लढतीत सायना विजयी


नरेंद्र मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा......


राज्यातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर समन्वयातून तोडगा काढणार : आमदार गोपीचंद पडळकर


 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1