Breaking News

 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1


Related
पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

चालणे हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ फरेराच्या संशोधकर्त्यांनुसार, वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. या अभ्यासात 1,078 हाय ब्लड प्रेशर ग्रस्त लोकांना सहभागी करुन घेतले होते. हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. शोधकर्ते म्हणाले की, चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 0 0 0 0 वेगाने चालण्याचे फायदे - अमेरिकन जर्नल ऑफ सायन्समध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार चालण्याचे तुम्हाला खालील फायदे होतात = 1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते. 3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो. 4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते. 5) रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो. 6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. 7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. 8) चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. 9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. 10) चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत 11) चालण्यामुळे झोपही चांगली लागते. 12) मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. 13) वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम 14) चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते 15) चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते. 16) दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय. 17) चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. 18) झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो. 19) नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते. 20) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. 21) नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. 22) नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. 23) हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते. 24) नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात. 25) मोतीबिंदूची शक्यता कमी होते. 26) नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो. 27) नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग. 28) चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते 29) दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. 30) नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. 31) कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करु शकता. आपण आपल्या नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.

कोरेगाव नगरपंचायतीच्या गैरकाराभाराविषयी विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी; मुख्याधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश : नगरविकास राज्यमंत्री ना. योगेश सागर यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : कोरेगाव नगरपंचायतीत गेली दोन ते अडीच वर्षे सुरु असलेल्या गैरकारभाराविषयी पदाधिकारी व मुख्याधिकार्‍यांची चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणार्‍यांवर योग्य ती कारवाई करुन वसुली केली जाणार आहे. तोपर्यंत मुख्याधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री ना. योगेश सागर यांनी विधान परिषदेत दिली. कोरेगाव नगरपंचायतीच्या कारभारामध्ये आणि कामांमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून गैरव्यवहार होत आहेत, अशी लक्षवेधी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मांडली. मुंडे यांनी अत्यंत मुद्देसुदपणे हा विषय पटलावर घेतला. मुंडे पुढे म्हणाले, नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकार्‍यांनी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून शांतीनगर उपनगरात गटर्स बांधकाम करणे, संभाजीनगर येथे गटर्स बांधकाम करणे, बाबा घर येथील रस्त्याचे काम करणे आदींमध्ये गैरप्रकार केले आहेत. आझाद चौक ते बनसोडे घर गटर्स बांधकाम करणे आदी कामे पूर्वीची असून, डागडुजी करुन नवीन बिले काढलेली आहेत. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण योजनेंतर्गत केलेल्या रंगरंगोटी कामाचे 83 लाख रुपयांचे बील काढण्यात आले आहे. या कामामध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीमार्फत विविध कामांसाठी ठेके दिले जातात, त्यामध्ये कामासाठी घेण्यात येणारे कर्मचारी अणि प्रत्यक्ष कामाला असलेल्या कर्मचार्‍यांच्या संख्येमध्ये तफावत आढळून आली असल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणून दिली. मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, कोरेगाव नगरपंचायतीत मुख्याधिकारी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कामाची वाढीव बिले काढणे, न झालेल्या कामाांची बिले काढणे असे गैरव्यवहार करत आहेत. शांतीनगर गटर्स बांधकाम प्रकरणामध्ये जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये अनियमितता झाल्याचे नमूद केले आहे, असे स्पष्टपणे समोर आले आहे. याचाच अर्थ चुकीची कामे झालेली आहेत. शासनाने नियुक्त केलेल्या मुख्याधिकारी, अभियंता आणि काही प्रमुख पदाधिकार्‍यांचा या रॅकेटमध्ये समावेश आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. लक्षवेधीला उत्तर देताना ना. योगेश सागर यांनी मुख्याधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले. मुख्याधिकारी व संबंधित पदाधिकार्‍यांची शासना कडून चौकशी करण्यात येईल, त्या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करुन वसुली केली जाईल, असे मंत्रीमहोदयांनी उत्तरात स्पष्ट केले.

चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचं अनावरण

मुंबई : देशातल्या दुसऱ्या अखंड प्रज्वलित राहणाऱ्या भीमज्योतीचं आज दादरच्या चैत्यभूमी परिसरात अनावरण करण्यात आलं. खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते आज सकाळी अखंड भीमज्योतीचं अनावरण झालं. दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत भारतीयांच्या नेहमी मनात तेवत राहावी यासाठी मुंबईत चैत्यभूमी परिसरात या अखंड ज्योत लावण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने अखंड प्रज्वलित राहणारी देशातील पहिली ज्योत मुंबईतल्या ओव्हल मैदान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर तीन महिन्यांपूर्वी बसवण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता दुसरी अखंड भीमज्योत ही दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात बसवण्यात आली आहे. ■ महापालिकेने उभारली भीमज्योत :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्र्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याबरोबर बैठका घेऊन हे काम महापालिकेच्या निधीतून करण्याचं ठरवलं. महापालिका वास्तुविशारदांकडून भीमज्योतीचा आराखडा करण्यात आला आणि त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. या भीमज्योतीसाठी महापालिकेला 21 लाख 54 हजार रुपये खर्च आला आहे. तर, चैत्यभूमी परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि अन्य बाबींसाठी 42 लाख 74 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. ■ सव्वा आठ फूट उंच साडेसात फूट रुंद भीमज्योत :- चैत्यभूमीवरील भीमज्योत सव्वा आठ फूट उंच आणि साडेसात फूट रुंद आहे. तेवणाऱ्या ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे. आठ मिमी काचेच्या आवरणाआड ही ज्योत सतत तेवत राहिल. या ज्योतीला महानगर गॅसतर्फे 24 तास अखंड गॅस पुरवठा केला जाईल. तथागत गौतम बुद्धांचा, 'अत्त दीप भव' म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्काराने गौरव

सातारा : कोल्हापूर यांचे माध्यमातून बँकींग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय व गौरवास्पद कामकाजाची दखल घेवून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उत्कृष्ट अध्यक्ष, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा बँकेस उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे तीन पुरस्कार कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे अध्यक्षतेखाली तसेच राज्य बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, रिझर्व्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक कांबळे आणि प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ. विजय काकडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये हे पुरस्कार बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, अधीक्षक संदीप शिंदे, महेश शिंदे व अनिल घाडगे यांनी स्वीकारले. महाव्यवस्थापक कांबळे यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकींग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून विशेष उल्लेख केला. तसेचकिरण कर्नाड म्हणाले, सर्वसामान्य ग्राहकांना बँकींग सेवा व सुविधा त्वरीत उपलब्ध व्हाव्यात, याकरिता सातारा जिल्हा बँक 304 शाखा व 15 विस्तारित कक्षांचे माध्यमातून कृषी सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतिमान करण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष व संचालक, सदस्य उच्चविद्याविभुषित व अभ्यासू आहेत. संपूर्ण बँकींग व्यवसाय हा बँकींग रेग्युलेशन अ‍ॅक्ट व महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार केला जातो. बँकेचे पीक कर्ज प्रकल्पांतर्गत तसेच बिगरशेती कर्जवाटप हे धोरणास अनुसरून व रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सहकार विभागाने कळविलेल्या निकषानुसार मंजूर केले जाते. याची नोंद घेऊनच बँकेचे अध्यक्ष आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ?उत्कृष्ट अध्यक्ष? या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. पुरस्काराबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच सर्व व्यवस्थापन प्रतिनिधी, सेवक वर्ग व गटसचिव यांनी अभिनंदन केले.

उदय कबुले व प्रदीप विधाते यांच्या निवडीने दिग्गजांना धक्का; हुकलेले मंत्रीपद व विधानसभेतील पराभवाला उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन

■ गणेश बोतालजी : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वाई विधानसभा मतदारसंघातील शिरवळ गटाचे उदय कबुले व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील खटाव गटाचे प्रदीप विधाते यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असणारी दिग्गजांची नावे अचानक मागे पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या आदर्श कार्यपध्दतीने सातारा जिल्हा परिषदेस एक आदर्श पायंडा घालून दिला. सर्व ठिकाणी समतोल साधत संजीवराजे यांनी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. संजीवराजेंची फेरनिवड पुन्हा अध्यक्षपदी होईल अशी इच्छा राष्ट्रवादीच्या बर्‍याच सदस्यांची व सातारा जिल्हावासियांचीही होती, परंतु त्यांची निवड न झाल्याने संजीवराजे प्रेमी यांची नाराजी वाढली आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याने त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे मसूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य मानसिंगराव जगदाळे यांचे नाव अचानक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या रेसमधून मागे पडले. कराड उत्तरला मंत्रीपद गेल्याने मानसिंगराव जगदाळे यांचा विचार झाला नसावा अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यातून ऐकू येत आहे. परंतु अशा कर्तबगार नेतृत्वाचा योग्य सन्मान भविष्यात व्हावा ही भावना कार्यकर्त्यामध्ये द़ृढ आहे. वाई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची मंत्रीपदाची संधी हुकल्याने त्यांचे अनेक समर्थक नाराज होते. अनेकांनी राजीनामास्त्रही काढले. ही नाराजी दूर करण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक समजले जाणारे उदय कबुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीने सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी खासदार कै.लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांनी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी भक्कमपणे उभी केली. त्यांचे सुपुत्र जननायक आमदार मकरंद पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळणारच हीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दृढ इच्छा होती. उदय कबुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन मंत्रीपदाबाबत झालेली नाराजी भरुन निघेल का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांंचा पराभव झाला. शशिकांत शिंदे यांचे समर्थक समजले जाणारे प्रदीप विधाते यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करुन झालेल्या पराभवाची पोकळी भरुन काढत राष्ट्रवादी पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्वाकडून करण्यात आलेला आहे. मायणी गटातील जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे हे ही अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये प्रमुख दावेदार होते. परंतु राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्नात गुदगेंचेही नाव मागे राहिल्याची चर्चा होत आहे. एकंदरीत सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य कसा राहील? यावर पक्षनेतृत्वाने भर दिलेला आहे. परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असणारे प्रमुख दावेदार अचानक मागे पडल्याने त्यांची नाराजी दूर करण्याचे व समतोल राखण्याचे आव्हान यापुढे राष्ट्रवादीपुढे असणार हे मात्र निश्चित!

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सातारा : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी डॉ. विनोद खाडे तर विनोद कुलकर्णी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी दै प्रभात चे प्रकाश राजेघाटगे, कोषाध्यक्षपदी सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची निवड झाली आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र च्या सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बैठक खटाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाली. प्रारंभी येथील संत सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व एन यु जे एम जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचे वतीने नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प पू सुंदर गिरी महाराज यांचे हस्ते राज्य अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचा देवस्थानचे महावस्त्र, पुष्पहार, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थानचे चेअरमन मोहन जाधव,विश्वस्त व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त सुरेशशेठ जाधव , विशाल माने,आदींची उपस्थिती होती. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र ही संघटना नॅशनल जर्नालिस्ट ऑफ इंडिया, दिल्ली या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट, ब्रुसेल्स ची सदस्य आहे. असं सांगून शीतल करदेकर यांनी ही संघटना केवळ पत्रकार संघटना नसून, समाजातील प्रत्येक पत्रकारासाठी संरक्षण, आरोग्य विषयक अडचणी, कौटुंबिक प्रश्न, कार्यालयीन प्रश्न आदी बाबीवर काम करणारी संघटना आहे. प्रत्येक पत्रकार हा सुरक्षित व भयमुक्त आणि सन्मान्य जीवन जगला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी ही संघटना आहे. असं ही शीतल करदेकर यांनी या वेळी सांगितले. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून पत्रकारांसाठी मेडिक्लेम, वैद्यकीय उपचार मदती विषयी काही सुविधा दिल्या जाव्यात, असंही शीतल करदेकर म्हणाल्या. यावर देवस्थान चे मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज व विश्वस्त डॉ सुरेश जाधव आदींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. दै सोलापूर तरुण भारत चे विशेष प्रतिनिधी व एन टी व्ही न्युज मराठी चे सातारा प्रतिनिधी डॉ विनोद खाडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर दै सोलापूर तरुण भारत चे सातारा आवृत्ती संपादक विनोद कुलकर्णी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दै प्रभात बुध चे प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांची जिल्हा सचिवपदी तर सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून साप्ताहिक माणदेशी न्यूज चे संपादक विजय टाकणे, दै लोकमत चे लोणंद प्रतिनिधी संतोष खरात, दै लोकमत चे म्हसवड प्रतिनिधी सचिन मंगरुळे, दै सोलापूर तरुण भारत,पाटण प्रतिनिधी अरविंद जाधव,दै सत्यसह्याद्री चे फलटण प्रतिनिधी विक्रम चोरमले यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडी राज्य अध्यक्षा शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून यावेळी एनयुजेएम सातारा जिल्हा अध्यक्ष रूपेश कदम(दै सकाळ), लालासाहेब दडस( तरुण भारत),प्रकाश सुरमुख,(दै पुण्यनगरी) महेश तांबवेकर,(लोकप्रवाह न्यूज) संदीप कुंभार,(दै लोकमत) किरण देशमुख(दै प्रभात) मुन्ना मुल्ला(ऐक्य) जे के काळे ( दै सत्यसह्याद्री) संतोष सुतार(महाराष्ट्र न्यूज) दिलीप वाघमारे (टी व्ही 1) सुनील पाटे (सह्याद्री वेध) आदींची उपस्थिती होती. एनयुजेएम चे मार्गदर्शक मा शिवेंद्रकुमारजी यांनी कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या आहेत

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सातारा : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी डॉ. विनोद खाडे तर विनोद कुलकर्णी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी दै प्रभात चे प्रकाश राजेघाटगे, कोषाध्यक्षपदी सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची निवड झाली आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र च्या सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बैठक खटाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाली. प्रारंभी येथील संत सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व एन यु जे एम जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचे वतीने नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प पू सुंदर गिरी महाराज यांचे हस्ते राज्य अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचा देवस्थानचे महावस्त्र, पुष्पहार, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थानचे चेअरमन मोहन जाधव,विश्वस्त व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त सुरेशशेठ जाधव , विशाल माने,आदींची उपस्थिती होती. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र ही संघटना नॅशनल जर्नालिस्ट ऑफ इंडिया, दिल्ली या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट, ब्रुसेल्स ची सदस्य आहे. असं सांगून शीतल करदेकर यांनी ही संघटना केवळ पत्रकार संघटना नसून, समाजातील प्रत्येक पत्रकारासाठी संरक्षण, आरोग्य विषयक अडचणी, कौटुंबिक प्रश्न, कार्यालयीन प्रश्न आदी बाबीवर काम करणारी संघटना आहे. प्रत्येक पत्रकार हा सुरक्षित व भयमुक्त आणि सन्मान्य जीवन जगला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी ही संघटना आहे. असं ही शीतल करदेकर यांनी या वेळी सांगितले. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून पत्रकारांसाठी मेडिक्लेम, वैद्यकीय उपचार मदती विषयी काही सुविधा दिल्या जाव्यात, असंही शीतल करदेकर म्हणाल्या. यावर देवस्थान चे मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज व विश्वस्त डॉ सुरेश जाधव आदींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. दै सोलापूर तरुण भारत चे विशेष प्रतिनिधी व एन टी व्ही न्युज मराठी चे सातारा प्रतिनिधी डॉ विनोद खाडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर दै सोलापूर तरुण भारत चे सातारा आवृत्ती संपादक विनोद कुलकर्णी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दै प्रभात बुध चे प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांची जिल्हा सचिवपदी तर सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून साप्ताहिक माणदेशी न्यूज चे संपादक विजय टाकणे, दै लोकमत चे लोणंद प्रतिनिधी संतोष खरात, दै लोकमत चे म्हसवड प्रतिनिधी सचिन मंगरुळे, दै सोलापूर तरुण भारत,पाटण प्रतिनिधी अरविंद जाधव,दै सत्यसह्याद्री चे फलटण प्रतिनिधी विक्रम चोरमले यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडी राज्य अध्यक्षा शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून यावेळी एनयुजेएम सातारा जिल्हा अध्यक्ष रूपेश कदम(दै सकाळ), लालासाहेब दडस( तरुण भारत),प्रकाश सुरमुख,(दै पुण्यनगरी) महेश तांबवेकर,(लोकप्रवाह न्यूज) संदीप कुंभार,(दै लोकमत) किरण देशमुख(दै प्रभात) मुन्ना मुल्ला(ऐक्य) जे के काळे ( दै सत्यसह्याद्री) संतोष सुतार(महाराष्ट्र न्यूज) दिलीप वाघमारे (टी व्ही 1) सुनील पाटे (सह्याद्री वेध) आदींची उपस्थिती होती. एनयुजेएम चे मार्गदर्शक मा शिवेंद्रकुमारजी यांनी कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या आहेत

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र संघटनेच्या सातारा जिल्हा कोषाध्यक्षपदी सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची निवड

सातारा : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र संघटनेच्या सातारा जिल्हा कोषाध्यक्षपदी सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची निवड झाली आहे. तर कार्याध्यक्ष पदी डॉ. विनोद खाडे, उपाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी व सचिवपदी दै प्रभात चे प्रकाश राजेघाटगे यांची निवड झाली आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र च्या सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बैठक खटाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाली. प्रारंभी येथील संत सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व एन यु जे एम जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचे वतीने नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प पू सुंदर गिरी महाराज यांचे हस्ते राज्य अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचा देवस्थानचे महावस्त्र, पुष्पहार, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थानचे चेअरमन मोहन जाधव,विश्वस्त व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त सुरेशशेठ जाधव , विशाल माने,आदींची उपस्थिती होती नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र ही संघटना नॅशनल जर्नालिस्ट ऑफ इंडिया, दिल्ली या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट, ब्रुसेल्स ची सदस्य आहे. असं सांगून शीतल करदेकर यांनी ही संघटना केवळ पत्रकार संघटना नसून, समाजातील प्रत्येक पत्रकारासाठी संरक्षण, आरोग्य विषयक अडचणी, कौटुंबिक प्रश्न, कार्यालयीन प्रश्न आदी बाबीवर काम करणारी संघटना आहे. प्रत्येक पत्रकार हा सुरक्षित व भयमुक्त आणि सन्मान्य जीवन जगला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी ही संघटना आहे. असं ही शीतल करदेकर यांनी या वेळी सांगितले. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून पत्रकारांसाठी मेडिक्लेम, वैद्यकीय उपचार मदती विषयी काही सुविधा दिल्या जाव्यात, असंही शीतल करदेकर म्हणाल्या. यावर देवस्थान चे मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज व विश्वस्त डॉ सुरेश जाधव आदींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. दै सोलापूर तरुण भारत चे विशेष प्रतिनिधी व एन टी व्ही न्युज मराठी चे सातारा प्रतिनिधी डॉ विनोद खाडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर दै सोलापूर तरुण भारत चे सातारा आवृत्ती संपादक विनोद कुलकर्णी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दै प्रभात बुध चे प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांची जिल्हा सचिवपदी तर सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोतालजी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून साप्ताहिक माणदेशी न्यूज चे संपादक विजय टाकणे, दै लोकमत चे लोणंद प्रतिनिधी संतोष खरात, दै लोकमत चे म्हसवड प्रतिनिधी सचिन मंगरुळे, दै सोलापूर तरुण भारत,पाटण प्रतिनिधी अरविंद जाधव,दै सत्यसह्याद्री चे फलटण प्रतिनिधी विक्रम चोरमले यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडी राज्य अध्यक्षा शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून यावेळी एनयुजेएम सातारा जिल्हा अध्यक्ष रूपेश कदम(दै सकाळ), लालासाहेब दडस( तरुण भारत),प्रकाश सुरमुख,(दै पुण्यनगरी) महेश तांबवेकर,(लोकप्रवाह न्यूज) संदीप कुंभार,(दै लोकमत) किरण देशमुख(दै प्रभात) मुन्ना मुल्ला(ऐक्य) जे के काळे ( दै सत्यसह्याद्री) संतोष सुतार(महाराष्ट्र न्यूज) दिलीप वाघमारे (टी व्ही 1) सुनील पाटे (सह्याद्री वेध) आदींची उपस्थिती होती. एनयुजेएम चे मार्गदर्शक मा शिवेंद्रकुमारजी यांनी कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या आहेत

साताऱ्यात पत्रकार मारहाणप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील १ ला गुन्हा दाखल; एनयुजे महाराष्ट्रची कठोर कारवाईची मागणी

सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुध येथील पत्रकार प्रकाश राजेघाडगे यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीत टाळेबंदीमध्ये बाहेर गावावरून कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता गावात प्रवेश केलेल्या व्यक्तीवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती.त्या बातमीचा राग मनात धरून त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पत्रकार प्रकाश राजे घाडगे यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली होती. सदर गुन्हा घडलेल्या दिवशी पुसेगाव पोलीस ठाण्यात भा द वि कलम ४५२,३२३,५०४,५०६,३४ नुसार दाखल करण्यात आला होता. मात्र यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम लावण्यात आले नव्हते.ही बाब लक्षात आल्यानंतर एन यु जे एम चे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ विनोद खाडे व सचिव प्रकाश राजेघाडगे यांनी राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या सूचनेवरून कोरेगावचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी बी बी महामुनी यांचे बरोबर संपर्क साधला असता त्यांनी संचारबंदी कायदा असल्याने मा न्यायालयाची परवानगी घेवून पत्रकार संरक्षण कायद्या ची अंमलबजावणी करू असे सांगितले....आणि तीन दिवसांतच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार दोषींवर पत्रकार संरक्षण कायदा कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला गेला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील हा पत्रकार संरक्षण कायद्यानुसार १ला गुन्हा दाखल झाला असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे अशी मागणी सातारा जिल्हा एनयुजेएम ने केली आहे.

सहकारातील दीपस्तंभ : स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले

सातारा म्हणजे मराठ्यांची राजधानी. छ. शिवाजी महाराजांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या या राजघराण्याचा श्रीमंत छ.अभयसिंहराजे भोसले यांनी आपल्या अलौकीक कार्यकर्तृत्वाने नावलौकीक वाढवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती घराण्याचा समाजसेवेचा वारसा जोमाने चालवणाऱ्या स्व. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्याची ओळख जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजीक आणि राजकीय पटलावर करून दिली . सहकाराच्या माध्यमातून सातारा तालुक्याचा कायापालट करणाऱ्या स्व. भाऊसाहेब महाराजांना सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाते. सहकारातील दीपस्तंभ ठरलेल्या श्रीमंत छ. स्व. भाऊसाहेब महाराजांची आज ७६ वी जयंती.त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा... छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी मनाची अस्मिता आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. याच ऐतिहासिक आणि वंदनीय घराण्यात भाऊसाहेब महाराजांचा जन्म झाला. राजघराण्यातील असलो, तरी आपण एक सामान्य माणूस आहोत या भावनेतून संपूर्ण जीवन जगताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी अहोरात्र समाजासाठी कष्ट घेतले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत स्व. भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. केवळ राजघराण्यात जन्म घेतला म्हणून माणूस मोठा होत नाही तर त्याच्या कर्तृत्वाने तो मोठा होतो, हे श्रीमंत छ .स्व. भाऊसाहेब महाराज यांनी आपल्या अजोड कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सातारा तालुक्याची अवहेलना होत असताना, स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या रूपाने तालुक्याला एक उमदे आणि सक्षम नेतृत्व लाभले आणि सातारा तालुक्याचे नाव राज्याच्या राजकारणात आदराने घेतले जावू लागले. या तालुक्याचे नेतृत्व करताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी सहकार क्रांती घडवली आणि सातारा तालुक्यातील गोर- गरीब, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्त करतानाच तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला. राजकारणात सक्रिय झाल्या नंतर विविध पदे सक्षमपणे सांभाळून त्या पदाच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील जनतेचा विकास साधण्याचा प्रयत्न स्व. भाऊसाहेब महाराज यांनी केला. सहकार मंत्री असताना स्व. भाऊसाहेब महाराजांनी सपूंर्ण राज्यात सहकार क्रांती घडवून आणली. प्रत्येक गावात विकास सेवासोसायट्यांचे जाळे विणले आणि जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला आर्थिक सक्षम करण्याचे अनमोल काम स्व. भाऊसाहेब महाराजांनी केले. विना सहकार नही उद्धार हे ओळखूनच स्व. भाऊसाहेब महाराजांनी शेंद्रे येथील उजाड माळरानावर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुकाच नव्हे, तर आसपासच्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची संस्था उभी करून दिली. आज याच साखर कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह आपसपासच्या तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळत आहे. याच कारखान्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. याच कारखान्यामुळे तालुक्यातील हजारो बेरोजगार हातांना रोजगार मिळाला आहे आणि याच कारखान्यामुळे सातारा तालुक्यासह पर जिल्ह्यातीलच नव्हे, तर परराज्यातील सुद्धा असंख्य घरातील चुली दरवर्षी पेटतात, ही वस्तुस्थिती आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यानंतर स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीची उभारणी केली. आज त्यांचे सुपुत्र आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूत गिरणीतून उत्तम दर्जाचे सूत उत्पादीत केले जाते आणि हे सूत देशी व परदेशी बाजारपेठेतही निर्यात केले जात आहे. सूत गिरणीच्या माध्यमातूनही हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. साखर कारखान्याच्या सहवीजप्रकल्पातून निर्माण होणारी वीज, वीज वितरण कंपनीला वितरित केली जाते. यामुळेच सातारा शहर आणि तालुक्यातील भारनियमन आटोक्यात आले आहे. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनातून अजिंक्य उद्योग समूहात विविध संस्थांची उभारणी झाली आणि सहकारातील मानबिंदू म्हणून अजिंक्य उद्योग समूहाचा नावलौकिक झाला. अजिंक्य उद्योग समूहामुळे सातारा तालुका राज्याच्या सहकार क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. जलक्रांतीचे जनक- राजकारणात सक्रिय राहून, राजकारणाला कमी महत्त्व देत समाजकारण करणारऱ्या स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यात सहकार क्रांतीबरोबरच जलक्रांती घडवून सातारा तालुक्याला कृषीप्रधान तालुका बनवले. तालुक्यात ठिक ठिकाणी पाणीसाठवण बंधारे बांधले. प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडले. प्रत्येक गावात अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सभामंडप, सुसज्ज ग्रामपंचायत इमारती उभ्या करून प्रत्यके गावाला विकासप्रवाहात आणले. सातारा तालुक्याचा चौफेर विकास साधून जिल्ह्यात सातारा तालुक्याला नेहमीच अग्रसेर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळेच सातारा तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून आजही स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. मी राजा नाही, जनतेचा सेवक आहे, हीच भूमिका घेऊन स्व. भाऊसाहेब महाराजांनी आपले संपूर्ण जीवन जनसामान्यांसाठी खर्ची घातले. अखंडपणे जनतेची सेवा केली आणि त्यामुळेच प्रत्येक घराघरात आपला हक्काचा माणूस म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचा आजही आदराने उल्लेख केला जातो. शांत, संयमी, नेहमी हसतमुख आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा जनसामान्यांचा राजा म्हणून स्व. भाऊसाहेब महाराजांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते आणि यापुढेही कायम घेतले जाईल. राजकारणात राहूनही राजकारण न करणारा, जातपात, गटतट न मानणारा आणि नेहमी समाजासाठी झटणाऱ्या सर्वसामान्यांच्या या राजाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन ..! ◆ अमर मोकाशी (जनसंपर्क अधिकारी सुरुची सातारा)

सलग शंभर दिवस, नियंत्रण कक्षात झेडपीमध्ये लढताहेत, करोना योद्धे...!

सातारा : करोना विषाणूच्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे .सातारा जिल्हा परिषद ही त्या बाबतीत मागे नाही.येथील आरोग्य विभागात मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद मध्ये आरोग्य विभागात नियंत्रण कक्ष स्थापन झाला .सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.आज तेथील कर्मचारी आणि अधिकारी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत तब्बल शंभर दिवस कोणतीही सरकारी अथवा वैयक्तिक सुट्टी न घेता राबताहेत.विशेष म्हणजे यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही अथक सहभाग आहे.संपूर्ण जिल्ह्याच्या विषाणू प्रादुर्भाव नियंत्रण ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आणि त्यानुसार सातत्याने न थकता विना सुट्टी काम चालू आहे ..शेकडो विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांशी सातत्याने संपर्क करण्यात येतो .त्यांची विचारपूस करण्यात येते जिल्ह्याची संपूर्ण परिस्थिती माहीत होण्यासाठी शेकडो प्रकारचे अहवाल कर्मचारी रात्रंदिवस तयार करून पुणे येथील आयुक्त कार्यालयाला तसेच आरोग्य उपसंचालक कार्यालयाला कळवित असतात.त्यानुसार नियोजनात तातडीने बदल करण्यात येतात, आजपर्यंत शेकडो प्रकारची माहिती पुस्तके, माहितीपत्रके प्रबोधनासाठी छापण्यात आली आहेत.त्या मार्गाने जिल्ह्यातील लाखो संख्येने असलेल्या जनतेपर्यंत काळजी कशी घ्यावी याचे प्रबोधन केले जात आहे .जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील सर्व अधिकारी तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका अथक परिश्रम चालू आहेत.जिल्हा परिषदेतील कक्षात " व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल" विशेष करून निर्माण करण्यात आला आहे.तेथून विविध संपर्क साधले जातात.तसेच जिल्ह्यातील आजारी असलेल्या नागरिकांशी प्रत्येक तालुकानिहाय कर्मचारी नेमून संपर्क साधून मार्गदर्शन केले जाते .मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत ,जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वारंवार या कक्षात आढावा घेऊन मार्गदर्शन केले आहे.माहिती तंत्रज्ञान कक्ष ,जिल्हा परिषद मुद्रणालय, यांच बहुमोल योगदान आहे.नूतन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येते.लाखो लोकांना रोज सुमारे साडेसात लाख मेसेज करून विषाणूपासून बचावासाठी, तसेच; प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे .वारंवार हात स्वच्छ धुणे ,मास्क वापरणे ,सामाजिक अंतर पाहणे अशा सूचना विविध प्रकारे जिल्ह्यात सातत्याने पोहोचवल्या जात आहेत.त्यासोबतच आयुर्वेदिक उपाय बाबत जनजागृती केली जात आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये ,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन पाटील ,माता-बाल संगोपन अधिकारी डॉक्टर प्रमोद शिर्के जिल्हा साथ रोग तज्ञ डॉक्टर सुभाष औंधकर हे नियोजनासाठी अविरत कष्ट घेत आहेत.उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव तसेच अविनाश फडतरे हे देखील वारंवार विविध प्रकारे नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असतात.हजारो कर्मचारी ,अधिकाऱ्यांना "अर्सेनिक अल्बम 30" गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून आजवर दोन लाखाहून अधिक मास्क तयार करण्यात आले आहेत.सुट्टी न घेता कामामुळे ताण तणाव जाणवतो, मात्र देशकार्यासाठी काम करणे अत्यंत समाधानकारक आहे अशा भावना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या .मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह सातत्याने कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे मनोबल मनोधैर्य वाढवत असतात.त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजबीले माफ करा; तीव्र आंदोलन करण्याचा रमेश उबाळे यांचा इशारा

कोरेगाव : कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजबीले माफ करा.अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी अधीक्षक अभियंता विद्युत महामंडळ सातारा यांना निवेदनही दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य शेतकरी हातावर पोट असणारे सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.त्यात महावीतरणने तीन महिन्याची वीज बिल दिले आहेत.ती सर्वसामान्य जनतेने कशी भरायची? असा सवाल रमेश उबाळे यांनी केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या हातात रोजगार नसल्याने लोक आर्थिक विवंचनेत असल्याने घरामध्ये अन्न धान्य नसल्याने उपासमार होत आहे.महामारीने जनता हवालदिल झाली असताना तीन महिन्यांचे वीज बील भरताना खूप अडचणीचे होणार आहे. सदरची विजबिले माफ करण्यात यावीत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा उबाळे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्याचे रमेश उबाळे म्हणाले.

कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार? लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांचा सामाजिक संदेश, घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या

सातारा : साताऱ्यात १७ ते २६ जुलै दरम्यान दहा दिवस लाॅकडाऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केला आहे.जिल्ह्यातील बाधितांच्या आकड्याने दोन हजारी पार केल्याने,कोरोना साखळी तोडण्यासाठी त्यातील पाच दिवस कडक लाॅकडाऊन असणार आहे.लगतच्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातही लाॅकडाऊन सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना 'कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार? असा प्रश्न विचारत 'घरटं सोडायचं नाही, काळजी घ्या'. असा सामाजिक संदेश छायाचित्रातून दिला आहे. उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण,सुधीर महामुनी,अधिक्षक हेमंत खाडे, दिपक मगर यांच्या उपस्थितीत याबाबतची अनेक पोस्टर्स प्रकाशित करुन त्यांनी माध्यमिक विभागातही लावली आहेत, तसेच सोशल मीडियावर प्रकाशित केली आहेत, त्यापैकी 'कोरोना संसर्गाचा वाहक की देशाचा सहाय्यक बनणार?' हे त्यांनी पोस्ट केलेले छायाचित्र खूपच व्हायरल झाले आहे. कोरोना विषाणू तुमच्या घरी येणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला आणायला बाहेर जात नाही.डाॅक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे माणसांतील देवांना सलाम, कोरोनाची साखळी तोडायचीय... कुटूंबाला आणि देशाला कोरोनापासून वाचवायचय..., लक्षात ठेवा ही लढाई जिंकायची आहे हारायची नाहीय..., बहिरे व्हा अफवांना थारा देऊ नका अफवा कोरोनापेक्षा भयंकर असू शकतात. कुटुंबासोबत घरात की एकटं रुग्णालयात तुम्ही ठरवायचं...!, कोरोनावर एकच उपाय टाकू नका घराबाहेर पाय, कंसापेक्षा क्रूर आणि रावणापेक्षा मायावी आहे कोरोना. ठेवूया एक मीटर सुरक्षित अंतर कोरोना होऊ दे छूमंतर. अशा शब्द व चित्ररुपी संदेशांचा त्यात समावेश आहे. यापुर्वी क्षीरसागर यांची पाचवर्षीय कन्या रुचिताचे लाॅकडाऊन एक व दोन काळातील 'स्टे अॅट होम'चे सामाजिक संदेश देणारे दोन स्वतंत्र व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

सातारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, तसेच जिल्हा पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांसमोर मी नतमस्तक होतो. सलाम आपल्या कार्याला, हो आपणच खरे कोरोना योद्धा...! आम्ही सातारकर आपले ऋणी आहोत ...!

हो, आज मी स्वतःशी ठरवलं होतं की एक स्टिंग ऑपरेशन करायचं आणि खरी वस्तुस्थिती समोर आणायची. का वाढतो आहे, सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनारुग्णसंख्या? कुणाचा हलगर्जीपणा आहे? कोण खत पाणी घालतोय या आजाराला? मग ठरलं आपण याचा शोध घ्यायचा, काही जुन्या बातम्या होत्या त्याच्या मदतीने काहीतरी हाती लागेल दुपारी एक वाजता गाडी काढली ,आनेवाडी टोल नाक्यावर मी टोल देऊन निघालो पुण्याच्या रस्त्याला, त्याआधी गुगल मॅपवरती सातारा जिल्ह्यात यायचे आणि जायचे रस्ते शोधले. माझ्या मनात असा प्रश्न होता की एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आजार पसरतोय, नक्कीच "दाल में कुछ काला है!", मग मी ठरवलं याचा शोध घ्यायचा अचानक वाढलेले प्रमाण या अशा छुप्या रस्त्याने येणाऱ्या माणसांमुळेच असणार, याचा शोध घेऊन प्रशासनाला जाब विचारायचा? मनाशी पक्की गाठ बांधली आणि या शोधासाठी प्रवास चालू केला. टोल देऊन भोर फाट्याच्या दिशेने प्रवास चालू ठेवला,मध्ये कुठेतरी पानटपऱ्या चहाची गाडी एकदा छोटसं हॉटेल चालू होतं पण कुठेही थांबणं धोक्याची घंटा होती मग मी थेट पोहोचलो भोर फाट्यावरती तिथून भोरच्या दिशेने वाटचाल केली. गुगल मॅप उघडला तीन रस्ते मॅप वर ती दिसले, जेणेकरून पुण्याला जाणशक्य होत मग गाडी त्या दिशेने चालवायला सुरुवात केली.पहिल्या ठिकाणी पोहोचलो बघतोय,तर पुढं रस्त्यामध्ये मोठे झाड तोडून आडवे पडले होते. मी समजलो हा रस्ता बंद केला आहे. गाडी परत वळवली आणि भोरच्या दिशेने प्रवास चालू केला, भोर च्या जवळ येताच एक मोठा मातीचा ढिगारा समोर दिसला,त्याच्या पाठीमागे दोन पोलिस उभे होते मी म्हणालो हाही रस्ता बंद केलाय. मी गाडी वळवली व पुन्हा भोरच्या रस्त्याने भोर फाट्यावर आलो. नीरा नदी वरती कडक बंदोबस्त आहे तिथून कोणीही विनापास येऊ शकत नाही व जाऊ ही शकत नाही हे मला माहीत होतं, तरीही थोडं पुढे गेलो बघतो तर काय भली मोठी रांग, मोठी तपासणी, खूप सारे पोलीस यंत्रणा. गाडी पुन्हा वळवली पंढरपूर लोणंद रस्त्याला म्हणे वीर डॅम धरणापासून मॅप वरती एक रस्ता दिसला म्हंटल इथून लोक बिनापास प्रवास करत असतील मग गाडी निघाली.सर्व पाहून पंढरपूर लोणंद रस्त्याला प्रवास चालू होता. रस्त्याला ना गाडी न माणसं सर्व शुकशुकाट माझी गाडी चालू होती मनात असंख्य प्रश्न ती उत्तरे शोधण्यासाठी गुगल मॅप च्या साह्याने रस्ते शोधायचं काम चालू होतं. अखेर त्या रस्त्याला पोहोचलो चारचाकी चालवणे मुश्किल होतं,मी तेही धाडस केलं आणि खडबडीत रस्त्याने डॅम कडेकडेने पोहोचलो, एक चारचाकी गाडी उभी होती गाडीत काही माणसं होती. आजूबाजूलाही काही माणसं बसली होती मी त्यांच्या समोरून गाडी पुढे घेऊन गेलो बघतोय तर काय मातीचा कंबरे एवढा ढिगारा गाडी परत फिरवली. समोर बसलेल्या गाडीतली माणसं माझ्याकडे बघून हसत होती पण त्यांना हे माहीत नव्हतं मला रस्ता ओलांडण्यात आनंद न्हवतां, रस्ता बंद बघण्यात आणी ,माझ्या सातारकर बांधवांचा आयुष्य सुरक्षित आहे हे बघायचं होतं.मीही थोडा त्यांच्याकडे बघून हसलो, गाडी परत फिरवली लोणंद मध्ये आलो व लोणंद मधून गाडी नीरा नदी पुलांच्या दिशेने निघालो, गुगल मॅप वरती बरोबर नदीच्या अलीकडून डाव्या हाताने सेम टू सेम पूल होता आणि तोही रस्ता खूप खराब पाण्याचे डबके साचले होते, मी गाडी घातली शेतातली कामं चालू होती पुला जवळ जाताना पुन्हा एकदा मोठा मातीचा ढिगारा दोन पोलीस ऑन ड्युटी फक्त साताऱ्या जिल्ह्यातील लोकांचा ह्या महामारी आजारापासून जीव वाचवण्यासाठी, ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता पहारा देत बसले होते, फक्त तुमच्यासाठी फक्त तुमचा जीव वाचावा म्हणून,तिथून गाडी परत फिरवली एक वाजल्यापासून पाच वाजले होते, गेले चार तास प्रवास चालू होता, गाडीतली पाण्याची बाटली काढली दोन घोट पाणी प्यायलो, थोडसं चेहऱ्यावरती स्मित हास्य केलं गाडी वळवली पुन्हा शिरवळ ते सातारा सातारच्या दिशेने जाताना वाई मार्गे भोर हा रस्ता लक्षात आला पण धाडस नाही झालं कारण वाईमध्ये पोलीस दलातील एक कोरोना युद्धाची मुर्त्याशी झुंज चालू होती व एवढी मोठी रिस्क घेणं चुकीचं वाटलं, गाडी सातारच्या दिशेने चालू ठेवली कुठेही न थांबता फक्त दोन वेळा आनेवाडी टोल नाक्यावर मी गाडीच्या काचा खाली केली, टोल भरला, याहीवेळी पैसे भरल्यानंतर तोंडावरती मास्क हातावरती सॅनी टायझर आणि घरची वाट घर जवळ आल्यानंतर असंख्य प्रश्नांचं एकच उत्तर मिळालं, सातारा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब व सातारा पोलीस अधीक्षक साहेब यांचे कार्य यांनी घेतलेला निर्णय, यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असणारे त्यांचे सहकारी बंधू व भगिनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबाचे परवा न करता ह्या आलेल्या अडचणी काळात दोन हात करताना ,आपले सर्वस्व पणाला लावून सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा वासी यांसाठी ते 24 तास ऑन ड्युटी आहेत, आता जबाबदारी तुमची आहे बांधवांनो आणि बहिणींनो सवय भान खूप महत्वाचा आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग स्वतःची घ्यावयाची काळजी हे फक्त तुम्हीच करू शकता जसं आदरणीय गुरुजी श्री .वामन पै गुरुवर्य यांनी सांगितलं," तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" फक्त एकच सवय भान राखा ,मास्क सोशल डिस्टंसिंग, सकारात्मक विचार ,पुन्हा एकदा सातारा जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या जिल्हा अधिक्षक व त्यांचे सहकारी आम्ही आपले ऋणी आहोत. आपले व आपल्या कार्याचे ,आता खरी गरज आहे जनजागृतीची, सवय आत्मभानाची, आता कोरोनाला हरवायचं, त्याला सोबत घेऊन जगायचं आहे पण हरवण्यासाठी सवय भान मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग,शासकीय नियमाचे पालन करून जिंकायचं,तेही त्याला हरवून आता कुणी म्हणायचं नाही जगायचं आपल्यासोबत आपले प्रशासकीय बांधव आहेत भिऊ नका ते तुमच्या पाठीशी आहेत. जय हिंद जय महाराष्ट्र ,जय भारत ,थँक्यू प्रेस अलर्ट न्यूज चैनल, तुमच्यातील एक सर्वसामान्य जागरुक नागरिक ,श्री. रमेश उबाळे वेळ 1 ते 6 ....

कास धरणाचे रखडलेले काम पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा पुन्हा यशस्वी; वाढीव ५७ कोटींसाठी ना. अजितदादांची मान्यता

सातारा : वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. ज्या ना. अजित पवारांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला मंजूरी दिली होती त्याच ना. पवारांनी आज पुन्हा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरुन कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५७ कोटी निधी देण्यासाठी मान्यता दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कास धरणाचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी सुधारीत प्रस्तावास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा कास धरणासाठी निधी मंजूर होणार असून बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी कास धरण प्रकल्पाचे काम पुर्ण होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सातारा शहरासह आसपासच्या १५ गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. हे ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कॉंग?ेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमु?यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करुन घेतले होते. त्याचवेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करुन घेण्यात आला होता. तसेच वन विभाग, हरित लवाद यासह अनेक विभागाच्या परवानग्याही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक पाठपुराव्यातून मिळवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. सद्य परिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पुर्ण झाले आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले आणि कास धरण प्रकल्प पुर्णत्वास जाणार का? सातारकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार का, असे प्रश्‍न निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा ना. अजित पवार आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काहीही करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पुर्ण झाले पाहिजे आणि सातारकरांचा पाणीप्रश्‍न कायस्वरुपी सुटला पाहिजे यासाठी सातात्याने अभ्यासपुर्ण पाठपुरावा करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी रखडेलेल्या या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा पाठपुरावा सुरु केला. महाआघाडी मंत्रीमंडळाच्या स्थापनेनंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पुन्हा उपमु?यमंत्री अजित पवार यांना सातारकरांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी, कास धरण प्रकल्पासाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात तातडीने निर्णय व्हावा, यासाठी संबंधीत सर्व विभागांची बैठक घ्यावी, अशा मागणीचे पत्रही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांना दिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात आज बैठक झाली. या बैठकीला ना. पवार यांच्यासह आ. शिवेंद्रसिंहराजे, राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे सचिव चहांदे, नगर विकास विभागाचे सचिव महेश पाठक, वित्त व नियोजन विभागाचे सचिव दहीङ्गळे, जलसंपदा विभागाचे सचिव मोहिते, संबंधीत सर्व विभागांचे अधिकारी, परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले उपस्थित होते. तसेच या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, सातारा पालिकेचे मु?याधिकारी अभिजित बापट हेही व्हिडीओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे जोडले गेले होते. बैठकीत झालेल्या सवीस्तर चर्चेनंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांनी कास धरण प्रकल्पाच्या उर्वरीत कामासाठी सुधारीत प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी वाढीव ५७ कोटी निधी नगरविकास विभागामार्ङ्गत नगरोत्थानमधून उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही घेण्यात आला. सदर कामाचा सुधारीत वाढीव निधी मागणी प्रस्ताव येत्या सात दिवसांत देण्याच्या सुचना ना. पवार यांनी सातारा पाटबंधारे विभागाला केल्या. दरम्यान, या निधीसह सातारा कास ते बामणोली या बाधीत रस्त्याच्या कामासाठीही ६ कोटी निधीची वेगळी तरतूद करुन हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा निर्णय ना. पवार यांनी बैठकीत घेतला. या ऐतिसाहिक आणि निर्णायक बैठकीमुळे कास धरण प्रकल्पातील रखडलेली घळ भरणी, सांडवा बांधकाम व उर्वरीत सर्व प्रकारची कामे मार्गी लागण्यासाठी निधी उपलब्ध होणार असून प्रकल्पाचे काम जून २०२१ पर्यंत पुर्ण केले जाणार आहे. तशा सुचनाही ना. पवार यांनी संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत. दरम्यान, ना. अजित पवार यांचे सातारा शहराच्या विकासावर नेहमीच लक्ष राहिले आहे. त्यांच्यामुळेच कास धरण उंची वाढवण्याच्या कामला मंजूरी आणि निधीही मिळाला होता. हा प्रकल्प रखडेलेला असताना आज त्यांच्याच माध्यमातून वाढीव निधीही मिळाला आहे. ना. अजितदादा यांच्या माध्यमातून सातारा शहरातील अनेक प्रश्‍न सोडवण्यासाठी मदत झाली आहे. आजही त्यांनी सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक बोलावून मोठा निर्णय घेतला. यावरुन ना. अजितदादांचे सातारकरांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. सातारकरांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नेहमीच सकारात्मक सहकार्य करणार्‍या ना. अजितदादा यांच्यामुळे सातारकरांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. याबद्दल मी ना. अजितदादांचे विशेष आभार मानतो, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांचे घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार मानले. ■ चौकट ■ सातारकरांसाठी पुन्हा धावले दादा- बाबा कास धरण उंची वाढवण्याच्या कामाला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीमुळेच तत्कालीन उपमु?यमंत्री असलेल्या ना. अजित पवार यांनी मंजूरी दिली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि अजितदादा यांचे मैत्रीपुर्ण संबंध सर्वांनाच माहिती आहेत. बाबाराजेंनी नेहमीच विकासात्मक दृष्टकोन ठेवून काम केले आहे. कास धरण प्रकल्पाचे रखडलेले काम पुर्णत्वास जाणार का, असा प्रश्‍न निर्माण झालेला असतानाच सातारकरांचा हा प्रश्‍न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा दादा- बाबांची जोडीच धावून आले. ज्या दोघांच्या माध्यमातून या प्रकल्पाला मंजूरी मिळाली होती आज त्याच अजितदादा आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांच्या माध्यमातून हा रखडलेला प्रकल्प पुर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे सातारकरांच्या मदतीला पुन्हा एकदा दादा आणि बाबा धावून आले, अशी समाधानी प्रतिक?ीया सातारकरांमधून व्यक्त होत आहे.

माण तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांबाबत शिक्षक संघाचे प्रयत्न; सोनाली पोळ यांना दिले निवेदन

सातारा : माण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे काही प्रश्न जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत. तरी हे सर्व प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे व्हॉईस चेअमनपद महेंद्र अवघडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती सोनाली पोळ यांना भेटून त्यांनी सदरची विनंती केली. यामध्ये नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षकांची अंशदान निवृत्तीवेतन योजनेची १०% कपात रक्कम संबंधितांना मिळावी,२०१८/१९ मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांची फरक बिलासाठी चे अनुदान पंचायत समितीकडे वर्ग करावे,२०१९-२० या वर्षी च्या भविष्य निर्वाह निधी च्या स्लिपा मिळाव्यात,७ व्या वेतन आयोगाच्या निश्र्चितीची पडताळणी तालुका स्तरावर विशेष कॅम्प लावून करावी तसेच २०१६ ला निवृत्त झालेल्या शिक्षकांची पेन्शन ७ व्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर दाखल प्रस्ताव लवकर मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आली. सोनाली पोळ यांनी सर्व प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सुचना केली असून तसे पत्र ही यावेळी दिले आहे. यामुळे माण तालुक्यातील सदरचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. यावेळी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, जिल्हा संघाचे माजी कार्याध्यक्ष अंकुश शिंदे,कराड पाटण सोसायटीचे माजी चेअरमन संजय शेजवळ, बाजीराव शेटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

केवळ सकारात्मक विचारच, कोरोनाला हरवतील..!!

ऑगस्ट 2020 चा शेवट होत असतानाच खूप चांगली परिस्थिती आहे .रुग्ण जरी वाढत असले तरीही ,बरे होण्याची टक्केवारी वाढत आहे .संपूर्ण भारतामध्ये 19 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.खुद्द सातारा जिल्ह्यात जवळपास 4 हजार 200 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत,तर महाराष्ट्रामध्ये हा टप्पा चार लाखापेक्षा अधिक आहे.भारतामध्ये बरे होण्याचा दर 73 टक्‍क्‍यांवर पोचला आहे.तर महाराष्ट्रामध्ये हाच दर 70 टक्केहून अधिक झाला आहे.प्रशासकीय पातळीवर आपण कोरोनाशी एकजुटीने लढत आहोत.अनेक बंधू-भगिनी मुक्त होत आहेत .अशा वेळेला चहूबाजूंनी जागरुकता बाळगणे, नागरिकांचे कर्तव्य ठरत आहे.प्रशासनाने घालून दिलेले, शासनाने सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहेच; परंतु त्यासोबतच काही सामाजिक वाईट तत्त्वे बाजूला ठेवली पाहिजेत. कानावर येणारे तसेच; समाज माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या सगळ्या गोष्टी खर्‍या नसतात.तार्किक दृष्टीने आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या, शासनाने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आज कुटुंबात, समाजात सकारात्मक वातावरण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.टेस्टची संख्या वाढल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.मुंबई मधील धारावी पॅटर्न यामुळेच प्रसिद्ध झाला आहे. फिलीपिन्स देशातील मनिला मध्ये सुद्धा धारावी पॅटर्न अवलंबला जात आहे,ही आपल्याला गौरवाची गोष्ट आहे...!!अन्यथा अफवांचा खूप मोठा धोका समाजाच्या स्वास्थ्याला उद्भवू शकतो. सातत्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि वारंवार हात धुणे ही यशाची आणि सुरक्षेची त्रिसूत्री ठरली आहे.नव्या नियमानुसार शासकीय कार्यालय, तसेच खासगी कार्यालयांमध्ये कंटेनमेंट झोन वगळून शंभर टक्के उपस्थिती आहे. कंटेनमेंट झोन वगळून अनेक दुकानांनाही दिवसातला ठरवून दिलेला वेळ उघडे ठेवण्याची परवानगी आहे.मात्र, याचा अर्थ संकट पूर्णपणे संपले आहे,असा नसून काळजी सुद्धा आणि खबरदारी सुद्धा 100% घ्यावयाची आहे.जनतेच्या सोयीसाठी शिथिलता देण्यात आली आहे.ती गरजेनुसार वापरावी .सरसकट बाहेर पडू नये .काटेकोर निर्बंध पाळावेत.जनतेच्या अडचणी ओळखून आणि परिस्थितीचा अभ्यास करून प्रशासनाने सातारा जिल्ह्यामध्ये शिथिलता दिली आहे. लस लवकरच येणार आहे त्या बाबतचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे मात्र, गाफील राहू नये.विषाणूचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.पूर्वीप्रमाणेच सर्व वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे.शिथिलता याचा अर्थ ;"आता धोका नाही" असा जनतेने कृपया घेऊ नये . जनतेच्या अडचणी ओळखून सामान्य लोकांच्या सोयीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.त्याचा आदर ठेवून आणि स्वतःची जबाबदारी ओळखून सामाजिक अंतर पाळूनच सर्व व्यवहार करणे गरजेचे आहे. वारंवार हात धुणे, चेहर्‍याला वारंवार स्पर्श न करणे, अत्यावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडणे, मास्क वापरणे, कोणत्याही जागेत थुंकू नये,हस्तांदोलन न करता लांबूनच हात जोडून नमस्कार करणे अशा सर्वच गोष्टी पूर्वीप्रमाणेच पाळाव्यात .वारंवार हात धुण्याचा आणि मास्क वापरण्याचा कंटाळा करू नये.कार्यालयीन तसेच; इतर कर्मचाऱ्यांनी आणि सर्वच नागरिकांनी, घरी गेल्यावर विशेष काळजी घ्यावी आणि सर्व आवश्यक त्या गोष्टी पाळाव्यात . आपल्या आयुर्वेदिक मंत्रालयाने सुचविलेल्या अनेक सुंदर गोष्टी आहेत : 1) हळद टाकून गरम पाणी गुळण्या करणे.यालाच; " गोल्डन वॉटर" म्हणतात.2) हळद आणि सुंठ टाकून गरम दूध पिणे, यालाच; "गोल्डन मिल्क" म्हणतात.3) खोबरेल तेल किंवा तिळ तेल किंवा मोहरीचे तेल नाकात दोन थेंब सोडणे 4) दोन ते तीन मिनिटे खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल तोंडात धरून नंतर थुंकणे आणि लगेच गरम पाण्याच्या गुळण्या करणे 5) रोज दहा ग्रॅम चवनप्राश खाणे 6)काळी मिरी, काळे मनुके, दालचिनी, सुंठ, तुळशीची पाने, गुळ हे सर्व दहा मिनिटे पाण्यात उकळावे आणि त्यातून तयार झालेला आयुर्वेदिक काढा प्राशन करणे 7) रोज नियमितपणे तीस मिनिटे योगासने, ध्यानधारणा ,प्राणायाम करणे 8) रोज एक "आवळा" कोणत्याही स्वरूपात खाणे.9) "आर्सेनिक अल्बम थर्टी" या गोळ्या सल्ल्यानुसार खाणे 10) "संशमनी वटी", या गोळ्या रोज सकाळी संध्याकाळी एक- एक अशा पद्धतीने पंधरा दिवस सल्ल्यानुसार खाणे 11) बाहेरचे अन्न अजिबात न खाता घरात शिजवलेला पौष्टिक गरम आहार घ्यावा 12) वारंवार गरम पाणी पिणे, तसेच ;गरम पाण्याची वाफ घ्यावी.अशा गोष्टी आता रोजच्या जीवनशैलीचा भाग झाल्या पाहिजेत. गावोगावी ग्राम समिती तसेच शहरातून वेगवेगळे प्रभाग विलगीकरणसाठी कष्ट घेत आहेत . विलगीकरण प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे .बाहेरून आलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवावी आणि आपले कर्तव्य बजावावे."स्वच्छता" सर्वप्रकारे सर्व ठिकाणी पाळणे ;हा तर आपला रोजचा मूलमंत्र बनला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे संस्कार असलेला आपला समाज आहे.म्हणूनच स्वच्छता हा आपला "जीवितधर्म" बनवावा.जेणेकरून संसर्ग रोखला जाईल.विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नष्ट झालेला नाही.साखळी पूर्णपणे तुटलेली नाही.त्यामुळे रोजचे जीवन जगण्यात सुसह्यता यावी, एवढाच हेतू शिथिलता देण्यामागे आहे. परस्परातील मतभेद विसरून सर्वांनी मिळून मुकाबला करणे गरजेचे आहे.प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर हे जणू "एक राष्ट्र" बनणार आहे. बाधित झालेले आणि त्यानंतर बरे झालेले तसेच ;संपर्कात येऊन अथवा प्रवास करुन विलगीकरण असलेल्या नागरिकांशी अत्यंत आपुलकीने वागणे गरजेचे आहे. मनाचा संकुचितपणा: माझे घर ,माझी गल्ली आणि फक्त माझा गाव असा विचार अत्यंत धोक्याचा ठरणार आहे.संत ज्ञानेश्वर माउलींनी " हे विश्वची माझे घर "असा एकात्म संस्कार महाराष्ट्रावर केला आहे, हे आपण विसरता कामा नये. "मला काय त्याचे", अशी बेफिकीर वृत्ती असणे बरोबर नाही. आपल्या राज्यात गावोगावी ज्ञानेश्वरीचे पारायण होते. तुकोबांच्या अभंगाची तर सुभाषिते झाली आहेत...हे सर्व लक्षात घेता आता एकमेकांसाठी झटणे ,गावाचा विचार करणे गरजेचे बनले आहे.आरोग्य ,पोलीस, महसूल प्रशासनाला ,अंगणवाडी सेविका ,आशाताई ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य केंद्रांमधील सर्व सहकारी, पोलीस जीवावर उदार होऊन, प्रत्यक्ष समाजात जाऊन; घरोघरी जाऊन काम करीत आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी अशा जबाबदार अधिकार्‍यांपासून ते तळागाळातल्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण अत्यंत तळमळीने समाजासाठी झटत आहेत.कार्यालयातून काम करणारे कर्मचारी ,तसेच; सामाजिक काम करणाऱ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते इतकेच नव्हे तर; पत्रकार बंधू सुद्धा जीवावर उदार होऊन स्वतःचे कर्तव्य बजावत आहेत ."ग्राम समिती" आणि शहरातील "प्रभाग समिती" यांना सर्व बाबतीत सहकार्य करावे. फेसबुक, व्हाट्सएप, इंस्टाग्राम अशा समाज माध्यमांचा वापर अत्यंत सकारात्मक आणि प्रबोधनासाठी करावा.कलाकार, लेखक ,गायक, विविध प्रकारचे तंत्रज्ञ इत्यादी जबाबदार घटकांनी आपल्या कलेचा वापर, सर्व नियम पाळून ;समाजात जागृती साठी करावा. गावोगावी सरकार तर्फे आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला प्रतिसाद द्यावा. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो की; सुशिक्षित नागरिक, तसेच; शिक्षण घेत असलेले तरुण-तरुणी तसेच; इतर जागरूक यांनी नियंत्रण करण्याचे सर्व नियम स्वतः जाणून घ्यावेत आणि त्याचा आपल्या कमी शिकलेल्या ,कामगार इत्यादी बंधूंपर्यंत प्रसार करावा. दिव्यांग, गर्भवती स्त्रिया, वृद्ध, लहान मुले इत्यादी घटकांची विशेष काळजी घ्यावी.हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे. ऑगस्ट 2020 आता संपत आला आहे आपण गेले चार ते पाच महिने प्राणपणाने मुकाबला करीत आहोत.आपण मुक्त होणार आहोत . संपूर्णपणे काळजी घेत असताना दारू, सिगारेट ,तंबाखू अशा व्यसनांपासून सुद्धा पण दूर राहिले पाहिजे .एकंदरीतच ; आपुलकी ,मानवता, शासन, प्रशासनाबद्दलचा आदर, आपल्या देशबांधवांवरील प्रेम आणि त्यांना केलेले जीवापाड सहकार्य, या सर्व मुल्यांचा अवलंब करून या महासंकटावर आपण मात करू या.... संघर्ष आणि खंबीर लढवय्येपणाचा भारताचा इतिहास पाहता हे अजिबातच अशक्य नाही.. ■ यशेंद्र क्षीरसागर (सामाजिक घडामोडींचे अभ्यासक, 7057681908) ■

घोरपडे परिवाराचे आगळेवेगळे दातृत्व : उदय शिंदे

कोरेगाव : स्वर्गीय नानासाहेब शंकराव घोरपडे (शिरढोण) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्री प्रमोद घोरपडे व उदय घोरपडे (उपाध्यक्ष कोरेगाव तालुका शिक्षक समिती) परिवारा मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरढोण या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या 128 विद्यार्थ्यांना मोफत स्वाध्याय पुस्तिका वाटप व देवराई वनराई शिरढोण या वनराईस 5001 रूपयाची रोख मदत आज शिरढोण याठिकाणी देण्यात आली. आज पर्यंत घोरपडे कुटुंबियांनी आपल्या मुलींच्या वाढदिवसा दिवशी ही अनाथ मुलांना खाऊ वाटप ,गरजेच्या वस्तू वाटप व रोख रक्कम अशा प्रकारची सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून नेहमीच मदत केली आहे. या कार्यक्रमास उपस्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष श्री उदय जी शिंदे कोरेगाव शिक्षक समितीचे अध्यक्ष नितीन शिर्के विद्यमान शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव शिरढोण गावचे माजी केंद्रप्रमुख शिवाजीराव साळुंखे श्री अनिल कदम श्री शामराव वाघमोडे कोरेगाव राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष जयवंत जी घोरपडे शिरढोण ग्रामपंचायतीचे सरपंच सौ गितांजली पवार माजी उपसरपंच श्रीकांत घोरपडे विद्यमान उपसरपंच गजानन बर्गे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय भोसले व सर्व सदस्य वनराई प्रकल्पाचे कार्यकर्ते सुनील शेडगे गणेश घोरपडे शिरढोण शाळेचे मुख्याध्यापक सौ संगीता कदम श्री सतीश शिंदे राजेंद्र जाधव सर्व पालक व सर्व ग्रामस्थ शिरढोण यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. घोरपडे परिवाराच्या दातृत्वा बद्दल व आगळ्यावेगळ्या वडिलांच्या स्मृतिबद्दल महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष श्री उदय शिंदे यांनी आपल्या मनोगतातून प्रशंसा केली.

अखेर सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मोठे यश, महानगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा

सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत होता. शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळेल. सातारा शहराचा आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर होणे अत्यावश्यक होते आणि त्यासाठीच आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अभ्यासपुर्ण पाठपुरावा करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून चालू अधिवेशनात सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव त्यांनी मंजूर करुन घेतला. यामुळे सातारा पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असून शहरासह त्रिशंकू भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आणि सातारकरांसाठी अत्यावश्यक असणारा प्रश्‍न मार्गी लागल्याने सातारकर आणि उपनगरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान, हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी सहकार्य करणार्‍या उपमु?यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील या तिघांचेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकरांच्याावतीने आभार मानले आहेत. सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून निसर्ग संपन्नतेने नटलेल्या सातारा शहराच्या विस्तारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहराच्या आजूबाजूला उपनगरांचा झालेला विस्तार आणि लोकसं?या वाढीच्या मानाने सातारा नगर पालिकेच्या उत्पन्नात आवश्यक अशी वाढ होत नसल्याने नागरिकांना मुलभूत सोयी, सुविधा पुरविणे अडचणीचे ठरत होते. सातारा शहरालगत अनेक पर्यटनस्थळे आहेत. विशेषत: जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेले कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची सं?या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कास, ठोसेघर, अजिंक्यतारा कि?ा, सज्जनगड आदी पर्यटन व धार्मिक स्थळे, महामार्ग आदी तत्सम बाबी लक्षात घेता सातारा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सातारा शहराची हद्दवाढ होणे अत्यावश्यक होते. गेल्या अनेक वर्षांपासून हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत होता. यामुळे सातारा शहराच्या आणि आसपासच्या उपनगरांच्या, त्रिशंकू भागाच्या विकासावर दुरोगामी परिणाम होत आहे. त्यामुळे एक जनहिताची बाब म्हणून सातारा शहराच्या हद्दवाढीस तातडीने मंजूरी देवून मुलभूत सोयी- सुविधांपासून वंचीत राहणार्‍या उपनगरे व त्रिशंकू भागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा हद्दवाढ मंजूरीसाठी सातत्याने अभ्यासपुर्ण पाठपुरावा सुरु होता. यासंदर्भात त्यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्‍नही उपस्थित केला होता. सरकार कोणत्याही पक्षाचे असो सातारा- जावली मतदारसंघातील विकासकामांमध्ये खंड पडता कामा नये, यासाठी नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विकासकामांसाठी सातत्याने निधी खेचून आणला आहे. हद्दवाढीच्या ठरावाबाबतीतही याचाच प्रत्यय आला असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चालू अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि उपमु?यमंत्री अजित पवार यांचे मैत्रीपुर्ण संबंध नेहमीच सातारकरांच्या पथ्यावर पडले आहेत. त्याचाच परिणाम हद्दवाढीच्या प्रश्‍नातही दिसून आला. मंगळवारी सकाळी उपमु?यमंत्री ना. अजित पवार यांनी स्वत: आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दालनात बोलावून घेवून सातारा शहराच्या हद्दवाढ मंजूरीचे पत्र त्यांच्या स्वाधिन केले. हद्दवाढ मंजूरीसाठी ना, पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, सातार्‍याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे सहकार्य लाभले आणि याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तिघांचेही सातारकरांच्यावतीने आभार मानले. आता शहराचा विकास अधिक गतीने होणार असून सातारा पालिकेची महानगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय शहरालगतच्या उपनगरांचा आणि त्रिशंकू भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ◆ दिलेला शब्द पाळला... ◆ सातारा नगर पालिकेच्या निवडणूकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास आघाडीच्यावतीने सातारा शहराची हद्दवाढ मंजूर करुन घेणार असा शब्द सातारकरांना दिला होता. तो शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खरा करुन दाखवला. सातारा पालिकेत आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या आघाडीची सत्ता नसतानाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शहराच्या विकासकामांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. साताराकरांचे सर्व प्रश्‍न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिकेत सत्ता नसतानाही शहराच्या हद्दवाढीचा प्रश्‍न निकाली काढला आणि सातारकरांना दिलेला शब्द पाळला. ◆ पुढचे लक्ष एमआयडीसी... ◆ सत्ता असो किंवा नसो एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कायम विकासकामांचा झंजावात सुरु ठेवला आहे. सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेला कास धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मंजूर करुन घेतला. त्यावेळीही उपमु?यमंत्री अजित पवार यांनी हा प्रस्ताव मंजूर करताना ४२ कोटी निधी दिला. कालांतराने या प्रकल्पाचे काम निधी अभावी रखडले. मात्र सातारकरांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सुटावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पुन्हा पाठपुरावा केला आणि ना. अजितदादा यांच्याकडूनच कास धरणाचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी वाढीव ५८ कोटी रुपये मंजूर करुन घेतले. आता कित्येक वर्षांपासून प्रलंबीत असलेला हद्दवाढीचा प्रश्‍नही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निकाली काढला. हे दोन महत्वाचे प्रश्‍न सोडवल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे पुढचे लक्ष सातारा एमआयडीसी आहे. आगामी काळात औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी मोठमोठे उद्योगधंदे, कंपन्या सातार्‍यात येण्यासाठी प्रयत्न करणार तसेच देगांव, निगडी एमआयडीसी सुरु करुन रोजगानिर्मीतीला चालना देणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमीत्ताने स्पष्ट केले आहे.

शासनाने अधिग्रहित केलेल्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनरोग्य योजना सुरू करावी; रमेश उबाळे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

कोरेगाव : कोरोनावर उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालये गोर-गरीब कुटुंबांची अडवणूक करत असून शासनाने अधिग्रहित केलेल्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनरोग्य योजना सुरू करावी याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे मागणी केल्याची माहिती भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिली. रमेश उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सद्यस्थितीत राज्यात सर्वत्र कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे.राज्य सरकारने सर्व रंगाच्या रेशनकार्डधारकांना कोरोनाग्रस्त रुग्णांना दीड लाख रुपयांचे सहायय करण्याचे धोरण ठेवले आहे.परंतु ही योजना ठराविक हॉस्पिटलमध्ये कार्यन्वित असल्याने इतर हॉस्पिटलमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांकडून भरमसाठ बील आकारणी केली जात आहे.ज्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेच्या बिलाची रक्कम जमवताना अक्षरशः कंबरडे मोडत आहे. शिवाय उपचारास रुग्णांकडे पैसे नसल्यास सबंधीत हॉस्पिटलकडून अडवणूक केली जात आहे. यास्तव आपणास विनंती की राज्यातील कोरोना रुग्णांकरीता शासनाने अधिग्रहित केलेल्या सर्वच खाजगी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करून सामान्य, गरीब जनता व मध्यमवर्गीय कोरोनाग्रस्त रुग्णांवर तातडीचे उपचार होवून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार कोरेगाव यांना पाठविल्याचे उबाळे यावेळी म्हणाले.

ग्रामीण पत्रकारांना कोव्हिडं सेंटर मध्ये राखीव कोटा असावा : NUJM ची मागणी

पुणे(मंचर) : पुणे जिल्हा कोरोनाचा हॉट स्पॉट होत असताना अनेक पत्रकार व पत्रकारांना कोव्हिडं सेंटर ला राखीव बेड उपलब्ध नसतात हा विषय मांडत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांना कोव्हिडं सेंटर मध्ये राखीव कोटा असावा अशी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट या संघटनेची मागणी असून याबाबतचे निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,कामगार मंत्री दिलीप वळसे यांना मंचर(ता.आंबेगाव) इथे निवेदन देताना नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट पुणे(NUJM) चे पदाधिकारी पुणे ग्रामीण चे सदस्य रोहिदास गाडगे(Etv भारत),खेड तालुका अध्यक्ष सुनील थिगळे(जय महाराष्ट्र),जिल्हा कार्याध्यक्ष रायचंद शिंदे(News 18 लोकमत). यावेळी जिल्हाधिकारी देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यापुढे सर्व पत्रकारांना किंवा त्यांचा कुटुंबियांना राखीव बेड उपलब्ध असतील असा शब्द दिला आहे.याबद्दल nujm च्या राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले.

कोरेगावातील 100 खाटांच्या कोविड सेंटरचे गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा : कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या कोविड सेंटर लोकार्पण राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादक शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज आज पार पडले. कोरेगावातील जीतराज मंगल कार्यालय येथे लोकार्पण झालेल्या 100 खाटांच्या कोव्हीड सेंटरच्या उदूघाटन कार्यक्रमास आमदार महेश शिंदे, कोरेगावचे नगराध्यक्ष श्रीमती कोकरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार रोहिनी शिंदे, गटविकास अधिकारी श्रीमती बोराटे, तालुका आरोग्य आधिकारी श्री.जाधव, डॉ. करपे, डॉ.चिवटे, डॉ. काळोखे, विजया घाडगे, रवी साळुंखे, संदिप शिंदे, सुनिल खत्री, किरणनाना बर्गे, दैनिक पुढारीचे न्युज ब्युरो चिफ हरिष पाटणे, संग्राम बर्गे आदी उपस्थित होते. 00

बोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू आ. शिवेंद्रसिंहराजे; धरणस्थळी जावून ग्रामस्थांसोबत केली जागेची पाहणी

सातारा : जावली तालुक्यातील केळघर, मेढा विभागातील ५४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे काम मार्गी लागले आवश्यक आहे. बोंडारवाडी ग्रामस्थांनी काही मागण्यांसाठी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. ग्रामस्थ, बोंडारवाडी धरण कृती समीती आणि पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. सर्वसमावेशक तोडगा काढून जावली तालुक्यात ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी लवकरच बोंडारवाडी धरणप्रकल्पाचे काम मार्गी लावू, असे आश्‍वासक प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. बोंडारवाडी ग?ामस्थांनी पिकाऊ शेतजमीन वाचावी आणि धरणाचे काम व्हावे, अशी मागणी करुन या प्रकल्पाला विरोध केला होता. ग?ामस्थांच्या मागणीनुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्यक्ष धरणस्थळ आणि जागेची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, सहायक अभियंता (श्रेणी १) जयंत बर्गे, शाखा अभियंता संजय पांडकर, सरपंच बाजीराव ओंबळे, वसंत मानकुमरे, संदीप ओंबळे, गणपत ओंबळे, विष्णू ओंबळे, महेंद्र ओंबळे यांच्यासह बोंडारवाडी ग?ामस्थ उपस्थित होते. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून केळघर, मेढा विभागातील गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्प मंजूरीसाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरु ठेवला होता. बोंडारवाडी ग?ामस्थ, कृती समिती आणि पाटबंधारे विभाग यांचा समन्वय साधून या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रयत्न सुरु आहे. बोंडारवाडी ग?ामस्थांच्या मागणीनुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गुरुवारी सकाळी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांसोबत धरणस्थळाची पाहणी केली. ज्या जोगवर धरण होत आहे त्या जागेत ग?ामस्थांची शेतजमीन जात आहे. आमची शेतजमीन वाचवी, अशी मागणी ग?ामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली. ५४ गावांचा पाणीप्रश्‍न आणि बोंडारवाडी ग?ामस्थांची शेतजमीन या दोन्ही बाबींचा विचार करुन सर्वांच्या सहमतीने, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेवून धरणाचे काम मार्गी लागेल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ग?ामस्थांना सांगितले. काहीही झाले तरी बोंडारवाडी प्रकल्पाचे काम मार्गी लावू आणि ५४ गावांचा पाणीप्रश्‍न सोडवू, असेही ते म्हणाले. चौकट... कशाचीही तमा न बाळगणारा लोकप्रतिनिधी आ. शिवेंद्रसिंहराजे जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी काहीही करतात, हे बोंडारवाडीच्या प्रश्‍नावरुन पुन्हा एकदा सिध्द झाले. बोंडारवाडी धरणस्थळाची पाहणी करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना ६ किलोमीटर चालत जावे लागले आणि पुन्हा ६ किलोमीटर चालत माघारी यावे लागले. ग?ामस्थांचा प्रश्‍न समजून घेण्यासाठी चिखल, पावसाची तमा न बाळगता ते स्वत: धरणस्थळी गेले. प्रश्‍न नीट समजावून घेतला. उपस्थित अधिकार्‍यांना ग?ामस्थांचा प्रश्‍न सोडवण्याच्या सुचना केल्या आणि पुन्हा माघारी आले. चौकट... विष कालवणार्‍यांपासून सावध रहावे देवेंद्र ङ्गडणवीस मु?यमंत्री असताना बोंडारवाडी प्रकल्पाला मंजूरी मिळवली होती. दुर्देवाने भाजपाचे सरकार आले नाही. सरकार कोणाचेही असले तरी मी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला आहे आणि करणार आहे. महाआघाडी सरकारकडेही पाठपुरावा करुन हा प्रकल्प मार्गी लावणार आहे. सोशल मिडीयावर विनाकारण वावड्या उठवायच्या, लोकांच्या मनात विष कालवायचं अशा काही विकृतीं सध्या ङ्गोङ्गावल्या आहेत. त्यांना ङ्गोटोशुट करुन गाजावाजा करायची ङ्गार हौस असते. मला श्रेयवादात पडायचे नाही आणि मला श्रेयही घ्यायचे नाही. मला ङ्गक्त जनतेचे प्रश्‍न सोडवायचे असतात आणि ते मी सोडवतोच. स्वत: काहीही करायचं नाही. काम झालं तर मी केलं म्हणायचं आणि झालं नाही तर आमदारावर ढकलायचं अशा प्रवृत्तींपासून जावलीकरांनी सावध रहावं. सातारा- जावली या मोठ्या मतदारसंघात आमदार म्हणून पहिल्या दिवसांपासून मी काम करत आहे. काम करताना कधीही दुजाभाव केला नाही. कास धरणाचे काम पुर्वीच सुरु होते. निधी अभावी रखडल्याने ना. अजित पवार यांच्या सहकार्याने वाढीव निधी मंजूर करुन घेतला. मेडीकल कॉलेजही पुर्वीच मंजूर होते आणि ते संपुर्ण जिल्ह्याचे आहे. तसेच हद्दवाढीचा प्रस्तावही बरेच वर्ष प्रलंबीत होता, तो मंजूर करुन घेतला. मात्र यावरुन जावलीकडे दुर्लक्ष केलं असा अर्थ विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी काढला. बोंडारवाडीसाठी माझा पाठपुरावा कसा आहे हे ग?ामस्थ, कृती समिती आणि सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे गैरसमज पसरवणार्‍या विकृतीपासून जनतेने सावध रहावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.

बाळासाहेब ठाकरे आणि अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सशक्त व समर्थ महाराष्ट्र करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : बाळासाहेब ठाकरे आणि अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सशक्त व समर्थ महाराष्ट्र करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांनी अण्णासाहेबांच्या जयंतीनिमित्त ध्वनी चित्रफितीद्वारे केले. ते माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी मर्या. व अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने माथाडी भवन तुर्भे, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या ऑनलाइन मेळाव्यात बोलत होते. ते पुढे असे म्हणाले कि, गेल्या वर्षी संघटनेच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमात हजारो माथाडी कामगारांच्या मेळाव्याला मी उपस्थित होतो, त्यावेळी संघटनेच्या ज्या-ज्या समस्या आहेत त्या माझ्यासमोर आहेत. या सर्व समस्यांची मुख्यमंत्री म्हणून मी सोडवणूक करणार आहेच. तसेच मराठा आरक्षण हि न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी सरकारचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आणि हि लढाई आम्ही जिंकणारच. आम्ही सरकारद्वारे माझे कुटुंब माझी जबादारी हि योजना जाहीर केलेली आहे. ती साकार करण्याची जबाबदारी संघटीतपणे स्वीकारली पाहिजे असेही आपल्या भाषणाद्वारे मुख्यमंत्री यांनी सूचित केले. राज्याचे सहकार व पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी या ऑनलाईन मेळाव्यात बोलताना असे सांगितले कि, स्व.अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांची चळवळ अथक संघर्ष करून वाढविली आणि माथाडी कायद्याची निर्मिती केली. तसेच माथाडी कामगारांना सन्मानही मिळवून दिला, याची जाणीव मला आहे. आता मी माथाडी कामगारांच्या गहन समस्या ऐकलेल्या आहेत, या सर्व समस्या शासनासमोर मांडून आमचे मंत्रीमंडळ संयुक्तपणे त्यावर निश्चित तोडगा काढेल अशी ग्वाही मी सरकारद्वारे देतो. तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या ऑनलाईन मेळाव्यात बोलताना सांगितले कि, अण्णासाहेबांनी माथाडी कामगार चळवळीला व मराठा समाजाला प्रचंड मोठे नेतृत्व दिले. त्यांनी अनेक कार्यकर्ते, नेते तयार केले. अठरापगड जातींना एकत्र करून असंघटीत माथाडी कामगारांना संघटीत केले व ऐतिहासिक असा माथाडी कायदा निर्माण करून माथाडी कामगारांना सन्मान मिळवून दिला. हा कायदा अधिक सुरक्षित होण्यासाठी व त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे कशी होईल याची आपणा सर्वांना दक्षता घ्यावी लागेल. या कायद्याचा आधार घेऊन माथाडी कामगारांना आणि माथाडी चळवळीला बदनाम करणाऱ्या माफियांना जेरबंद करावेच लागेल. ते पुढे असेही म्हणाले कि, बाजार समिती नियमन मुक्तीचा माथाडी कामगारांवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही, तसेच शेतकरी व कामगारांचा फायदाच होणार आहे अशी तरतूदही या कायद्यात आहे. मराठा आंदोलनाचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी पहिले बलिदान दिले व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष केला. आज आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे हे न्याय प्रविष्ट प्रकरण आहे. तरीही न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आपण अथक प्रयत्न केले पाहिजेत आणि ज्या दिवशी हि लढाई आपण जिंकू तीच खरी अण्णासाहेबांना अर्पण केलेली आदरांजली असेल. राज्याचे माजी मंत्री,आमदार गणेश नाईक म्हणाले कि, कष्टकरी कामगारांना 'माथाडी' हे सन्मानाचे नाव मिळवून देण्याचे काम अण्णासाहेब पाटील यांनी केले. ज्या-ज्या वेळेस माथाडी कामगारांसमोर प्रश्न निर्माण होतील त्या-त्या वेळी मी माथाडी कामगारांच्या पाठीशी उभा राहून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करेन. आजपर्यंत आपण अनेक संकटांचा सामना केला आहे. यापुढेही येणाऱ्या संकटांची सोडवणूक करण्यासाठी आपण सगळे भव्य एकजुटीने प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी केले. तर आपल्या स्वागत व प्रास्ताविक भाषणात नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणाले, सरकारने बाजार समित्यांचे नियमन मुक्त करण्याचा आदेश काढला पण अजूनही शेतकऱ्यांना न्याय कसा मिळत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून माथाडी कामगार हे शेतकऱ्यांचीच मुले आहेत. बाजार समित्या टिकल्या पाहिजेत आणि बाजार समित्याद्वारे व्यवहार सुरु राहिले पाहिजेत. पुढे ते असे म्हणाले कि, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कामगारांचा कोरोना काळात मृत्यू झाल्यास त्याला विमा सुरक्षा कवच म्हणून ५० लाख रुपये मिळावेत अशी मागणी त्यानी या मेळाव्यात केली. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे मी अध्यक्ष पदाच्या कालावधीत कोट्यावधी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळवून देऊन अनेक मराठा तरुणांना उद्योजक केले. अण्णासाहेबांच्या काळात हे महामंडळ असते तर मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासली नसती. अण्णासाहेबानी आयुष्यात कधीही तडजोड केली नाही ते सतत संघर्ष करीत राहिले. तडजोड केली असती तर अण्णासाहेबानी आपले आयुष्य संपवले नसते. शेवटी त्यांनी मुख्यमंत्री निधीतून माथाडी कामगारांच्या हॉस्पिटलला १० कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी केली. माथाडी पतपेढी व माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न देखील मेळाव्यात मांडले. राज्याचे माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे त्यांच्या भाषणात असे म्हणाले कि, केंद्र सरकार अनेक वेळा नियम बदलते आणि त्यानुसार राज्य सरकारचेहि नियम बदलले जातात त्याचा परिणाम होतो कायदा शेतकऱ्यांसाठी जरूर असावा पण त्याच बरोबर व्यवहार सुरळीत चालण्यासाठी इतर घटकांचीही आवश्यकता असते याचीही केंद्र सरकारने दाखल घेतली पाहिजे. आता बदललेल्या कायद्यातून भांडवलशाही वाढू नये यासाठी आपण सर्वांनी संघटीत प्रयत्न केले पाहिजेत. पुढे ते असे म्हणाले कि, एकजुटीने संघर्ष आणि लढा देऊन आपण सर्वांनी माथाडी चळवळ जिवंत ठेव्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अण्णासाहेब पाटील यांनी उभी केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ अभेद्य ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार आहे केंद्र व राज्य सरकारकडून कामगारांचे प्रश्न सोडविण्यास सर्व पक्षातील नेत्यांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले. युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप असे म्हणाले कि, माथाडी हा कामगार चळवळीचा केंद्रबिंदू आहे. इतर चळवळी दिशाहीन झाल्या पण हि चळवळ आपले अस्तित्व अजूनही टिकवून आहे या चळवळीचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी गडी, हमाल म्हणून संबोधले जाणाऱ्या कामगारांना माथाडी कामगार हि सन्मानाची पदवी मिळवून दिली. तसेच ऐतिहासिक माथाडी कायद्याची निर्मिती केली. एकजुटीने संघर्ष करून कायद्याचे अस्तित्व कायम स्वरूपी टिकवून ठेवले पाहिजे हीच खरी आजच्या जयंती निमित्त त्यांना वाहिलेली श्रद्धांजली होय. या मेळाव्यात ८ माथाडी कामगारांना माथाडी भूषण हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले तर आभार अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी मानले. या ऑनलाईन मेळाव्यास आमदार प्रसादजी लाड, अशोक गावडे, बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, सचिव अनिल चव्हाण, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे एमडी अनिल पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, माथाडी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.हणमंतराव अण्णासाहेब पाटील, माथाडी युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील, दिलीप खोंड, खजिनदार गुंगा पाटील, कायदेशीर सल्लागार सौ. भारतीताई पाटील आदी उपस्थित होते. कोविड -१९ संबंधित राज्य सरकारचे व नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसारच्या सर्व नियमांचे उदा. सामाजिक अंतर, मास्क व हेड शिल्ड लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. टेम्प्रेचर व ऑक्सिजन व पल्स रेट प्रवेशद्वारावर तपासून मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा ऑनलाईन समारंभ महाराष्ट्रातील हजारो माथाडी कामगार, त्यांचे कुटुंबीय व जनतेने युट्यूब व फेसबुक लाईव्हद्वारे पहिला.

सातारा तालुका शिक्षक समितीने सामाजिक बांधिलकी जोपासली : उदय शिंदे; सातारा तालुका शिक्षक समिती मार्फत शिक्षकांसाठी ऑक्सिजन मशिन्स सह उपचार साहित्य भेट

सातारा : सातारा तालुका शिक्षक समितीच्या वतीने ४ ऑक्सिजन मशीन शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिल्या.त्याचा उद्घाटन सोहळा राज्याध्यक्ष श्री.उदय शिंदे यांच्या शुभहस्ते , जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षक बँकेचे संचालक श्री किरण यादव यांच्या उपस्थितीत शिक्षक भवन सातारा याठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कै. बाळकृष्ण बागल व कै.राहुल सावंत यांना एक मिनिटाचे मौन पळून श्रद्धांजली वाहिली यावेळी sanitizer बॉटल्स, ऑक्सीजन लेवल चेक करण्याच्या oximeter. मशिन्स, ताप चेक करण्याच्या गन सातारा तालुक्‍यात विभागवार उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी सातारा तालुक्यातील शिक्षक समितीच्या सभासदांच्या वतीने एक लाख ऐंशी हजार रुपये निधी जमा झाला. यासाठी सातारा तालुका शिक्षक समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री अनिल चव्हाण व त्यांची संपूर्ण कार्यकारणी तसेच शिक्षक समितीचे सर्व सभासद यांनी विशेष कष्ट घेतले. सातारा तालुका शिक्षक समितीच्या या सामाजिक बांधिलकी बद्दल व स्तुत्य उपक्रमाबद्दल राज्याध्यक्ष श्री उदय शिंदे यांनी आपल्या मनोगतात कौतुक केले. त्याग आणि सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन चालणारी शिक्षक समिती नेहमीच सेवेसाठी उपलब्ध आहे असे श्री शंकर देवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. शिक्षक बँकेचे संचालक श्री किरण यादव यांनी मशीन बद्दल माहिती देऊन ती कशी जोडावी याचा डेमो दाखविला. याप्रसंगी श्री अनिल कांबळे संचालक कराड पाटण शिक्षक सोसायटी केंद्रप्रमुख श्री रमेश लोटेकर, श्री रामचंद्र गायकवाड, श्री भूरकुंडे सर, श्री सातपुते सर व शिक्षक श्री लक्ष्मण ढाणे, श्री राजेंद्र शेलार श्री धनंजय ढाणे, श्री किशोर ढाणे ,श्री अनिल अशोक चव्हाण श्री तानाजी सराटे श्री बंडु थोरात, श्री संजय काटाळे, श्री संतोष लोहार श्री राजेंद्र बोबडे, श्री प्रवीण क्षीरसागर, सातारा तालुक्यातील शिक्षक समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.

शिक्षक संघास सहकार्य राहील : गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील

दहिवडी : माण तालुका ही गुणवत्तेची खाण आहे. नैसर्गिक दृष्टया अडचणी असूनही इथला माणूस परिस्थितीशी झुंजत राहतो, याच कारण मुख्यत्वे शिक्षण हेच आहे.शिक्षकांनी समर्पित भावनेने काम केल्यामुळे असंख्य लोक विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.माण तालुका प्राथमिक शिक्षक संघ ही तालुक्यातील शिक्षकांच्या व शिक्षणाच्या बाबतीत सतत कार्यरत असणारी संघटना असून शिक्षक संघास सहकार्य राहील असे प्रतिपादन माणचे नुतन गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी केले. श्री.गोरख शेलार यांची बदली सोलापूर येथे झाली असून त्यांच्या जागी सर्जेराव पाटील यांची बदली माण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी झाली आहे.नुकताच त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. शिक्षक बॅंकेचे उपाध्यक्ष तथा माण तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र अवघडे यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या शिष्टमंडळाने पाटील यांचे स्वागत केले. यावेळी महेंद्र कुंभार, किशोर देवकर, रामभाऊ खाडे, शशिकांत खाडे,अजिनाथ गलांडे, दत्तात्रय खाडे, दत्तात्रय कोळी, सोपान मोटे,सुस्तरपड सर तसेच संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

इन्स्पायर अवार्ड नोंदणीसाठी ३० सप्टेंबरची मुदत; सातारा जिल्ह्यातील नऊ हजार विद्यार्थ्यांना संधी

सातारा: भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने २००९-१० सालापासून सुरु केलेल्या इन्सायर अवार्ड (INSPIRE AWARD MANAK)योजना २०२०-२१ करीता ऑनलाईन नामांकने भरण्याचा अंतिम दिनांक ३० सष्टेंबर २०२० आहे. जिल्हा विज्ञान पर्यवेक्षिका तथा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी मंगल मोरे यांनी सांगितले की, INSPIRE AWARD MANAK योजनेअंतर्गत सन २०२०-२१ मध्ये इ ६ वी ते १० वी या वर्गात शिकणा-या सर्व शासनमान्य सर्व माध्यमाच्या प्रत्येक शाळेने आपल्या विदयालयातून उत्तम संकल्पनेवर आधारित ५ मॉडेल्सची ( ideas) आॅनलाईन नोंदणी www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत करावयाची आहे. CBSC,ICSC व नवोदय शाळांनाही नोंदणी करता येईल. इ.६ वी ते १० वी चे वर्ग असलेल्या कोणत्याही शाळेस जास्तीत जास्त ५ मॉडेल्सची नोंदणी (Nomination) करता येते. म्हणजे सहावी ते दहावीपैकी कोणत्याही वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांस नावनोंदणीसाठी संधी आहे. शाळांनी प्रकल्प सादर करताना तो नाविन्यपूर्ण असेल, समाजाला उपयोगी पडणारा आणि पर्यावरण पूरक असेल, शेतक-यांना उपयोगी पडेल, घरगुती व सामाजिक समस्या सोडविणारा, नैसर्गिक आपत्तीमध्ये उपयोगी पडणारा, स्वच्छतेसाठी उपयोगी पडणारा असेल, याची दक्षता घेऊन केलेला असावा. मात्र पाठयपुस्तकातून घेतलेला , जलविदयुत प्रकल्प, जलसंग्रहणप्रबंधन, जलस्तरसूचक, जैविक उर्जा जनरेटरकरिता टरबाईनचा वापर, कचरा, बॅटरी, शेण वाहतूक, लाटेवर आधारित प्रकल्प नको. तसेच पावसाच्या पाण्याची साठवण,भूकंप, मातीची धूप, घरफोडीचा गजर, गॅस अलार्म, फायर अलार्स, व्हर्मी कंपोष्ट, व्हर्मीवॉश, पत्रपेटी गजर,पवनउर्जा, सौर उर्जेचे वीजनिर्मितीत रुपांतर इ. बाबीवर केलेली मॉडेल्स नकोत. अशा उपकरणंची NIF(National Innovation Foundation, India Amarapur Gandhinagar Gujrat, India)मार्फत निवड होऊ शकत नाही. NIF मार्फत निवड झालेल्या मॉडेलसाठी प्रत्येक विदयार्थ्यांच्या बँक खात्यावर पुरस्कार म्हणून १० हजार रुपये जमा करण्यात येतील,सातारा जिल्हयातील इ.६ वी ते १० वी चे वर्ग असलेल्या एकूण १७९० शाळा असून प्रत्येक शाळेचे५ मॉडेल्स प्रमाणे एकूण ८९५० मॉडेल्स तयार होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत १६२ शाळांनी नामांकने केलेले असून ७०० विदयार्थ्यांनी आपल्या ideasऑनलाईन सादर केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्हा सद्यस्थितीत नोंदणीत प्रथम क्रमांकावर आहे.विहित मुदतीत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विदयार्थ्यांना या योजनेकरीता समाविष्ट करुन घ्यावे अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. ● मागील शैक्षणिक वर्षात सातारा जिल्हयासाठी स्वतंत्र जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले होते. त्यातून राज्यस्तरावर २२ विद्यार्थी निवडण्यात आले होते. नागपूरच्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या सूचनेनुसार अधिकाधिक विद्यार्थ्यांची जिल्ह्यातून नोंदणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे -राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

धनगर समाजाच्या आरक्षणाची अमलबजावणी तात्काळ होणे करिता दिशा ठरवणेसाठी माळशिरस येथे धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य पुणे कार्यकारणीची बैठक संपन्न

सातारा : दि. 25 सप्टेंबर रोजी माळशिरस येथे धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य पुणे कार्यकारणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अमलबजावणी तात्काळ होणे करिता दिशा ठरवणेसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेनुसार आगामी काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणा बरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील प्रमाणे सर्व कार्यवाही तातडीने करणेबाबत सर्वानुमते ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय सुभाष पाटील खेमनरसाहेब हे होते , सदर बैठकीसाठी मा.दादासाहेब काळे, परमेश्वर कोळेकर, डॉ मारुतीराव पाटील, बजरंग नाना खटके, गणपतराव वाघमोडे, शिवाजीराव ईजुगडे, विठ्ठलनाना पाटील, शिवाजीराव पाटील,अँडवोकेट पांढरे, पांडुरंग तात्या वाघमोडे, विष्णु देशमुख ,बजरंग नाना गावडे, पंकज देवकते, अमोल खरात, किरण गोफणे, सोन्नर साहेब व इतर मान्‍यवर उपस्‍थित होते. त्याप्रमाणे दिनांक 1 आक्‍टोंबर रोजी तमाम महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी खालील प्रमाणे शांततेने निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले त्याचबरोबर येत्या कालावधीत राज्याचे प्रमुख नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब,मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे व विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची कृती समितीच्या नेत्यांनी वेळ घेऊन धनगर प्रश्न सोडवण्यासाठी आग्रह धरण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. ■ निवेदनाचा नमुना ■ प्रति मा, तहसीलदार, विषय : महाराष्ट्रातील धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्या बाबत... महोदय, वरील विषयानुसार धनगर समाजातील तमाम नागरिकांच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की धनगर समाजाची आर्थिक ,राजकीय,शैक्षणीक व सामाजिक परिस्थिती अत्यंत हालाखीची व बिकट झालेली आहे यामधून धनगर समाजाची उन्नती होणेसाठी यापूर्वीच महाराष्ट्राच्या यादीत धनगर समाजाचा आदिवासी मध्ये समावेश आहे तथापि धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख झाल्यामुळे समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाही ही दुरुस्ती होणेसाठी महाराष्ट्च्या मुख्यमंत्री यांनी 1) महाराष्ट्राच्या आदिवासीच्या यादीमध्ये अनुक्रमांक 36 वर धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती केंद्र शासनाने करणे बाबत ची शिफारस करण्यात यावी (2)केंद्र सरकारने या दुरुस्तीबाबत चे बिल तयार करून संसदेमध्ये मंजूर करण्यात यावे(3) किंवा संसदेत सादर झालेल्या 325 क्रमांकाच्या बीलामध्ये ही दुरुस्ती टाकून बिल मंजूर करावे (4)किंवा या दुरुस्ती बाबतचा राष्ट्रपती यांचे मान्यतेने अद्यादेश त्वरित काढण्यात यावा अशी मागणी तमाम धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे कृपया हे निवेदन आपले शिफारशीसह माननीय मुख्यमंत्री यांना सादर करावे ही नम्र विनंती आपले नम्र महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समिती.

लाेकसेवेतून समाजऋण व्यक्त करण्याची संधी मिळाली : आमदार महेश शिंदे; काेरेगांव शहरासाठी अत्याधुनिक जम्बाे रुग्णवाहिकेचे लाेकार्पण

काेरेगांव : ज्या जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आमदार म्हणून निवडूण दिले त्या माझ्या मायबाप जनतेचे लाेकसेवेतूनच समाजऋण व्यक्त करण्याची संधी मला मिळाल्याचे उद्गार आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले. आमदार स्थानिक विकास निधीतून आमदार महेश शिंदे यांनी काेरेगांव नगरपंचायतीला दिलेल्या अत्याधुनिक सुविधांनीयुक्त जम्बाे रुग्णवाहिकेचे लाेकार्पण आज बाजारमैदानावर झाले, त्यानंतर नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी आमदार महेश शिंदे बाेलत हाेते. ज्येष्ठ नेते सुनिल खत्री, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, नगराध्यक्षा रेश्मा काेकरे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, पाेलीस निरीक्षक सुनिल गाेडसे, मुख्याधिकारी विजया घाडगे, नगरसेवक महेश बर्गे, जयवंत पवार, सुनिल बर्गे, राहुल बर्गे, निवास मेरुकर, युवक अध्यक्ष राहुल बर्गे, माजी नगरसेवक राजेंद्र बर्गे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी बाेलताना महेश शिंदे म्हणाले, काेराेनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या लढ्यात धैर्याने पुढे जाण्यासाठी काेरेगांव मतदारसंघात आपण माेठ्या ताकदीने प्रामाणिक प्रयत्न सुरु केले, त्यासाठी सर्व नगरसेवक, कार्यकर्ते पुढे आले आहेत. वाढती रुग्णसंख्या राेखण्यासाठी सर्वांना एक चांगला पण केला आहे. काेरेगांव शहरात सुसज्ज असे 100 बेडचे काेराेना केअर सेंटर उभे केले असून आणखी 100 बेडचे स्वतंत्र रुग्णालय उभे करीत आहाेत. त्यात 10 व्हेंटीलीटर सह 25 जम्बाे ऑक्जिनची यंत्रणाही येत्या दाेन दिवसात कार्यान्वित हाेत असल्याचे सांगून आमदार महेश शिंदे म्हणाले, काेराेना महामारीला सामाेरे जाताना काेणताही भेदभाव न करता, गटा तटाचा विचार न करता माणूसकीधर्म जपा, प्रत्येक गरजू रुग्णाला, नागरिकाला मदत करा. रुग्णालयापर्यंत पाेहाेचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रसंगी स्वत:चे वाहनच त्या नागरिकासाठी रुग्णवाहिका म्हणून उपलब्ध करुन द्या. प्रत्येकाने झाेकून देवून काम करा, तरच काेरेगांव काेराेना मुक्तीचा पॅटर्न निर्माण करु शकेल. प्रत्येक नगरसेवकाने हे आव्हान स्विकारुन आपापल्या प्रभागात स्वत:ची यंत्रणा उभी करा, प्रत्येक नागरिकाच्या आराेग्य तपासणीसाठी घराेघरी जावून माहिती घ्या. आपण करीत असलेले काम मी कधीही काेरेगांव शहरात येवून पाहणी करीन. काेरेगांव शहर काेराेनामुक्त करण्यासाठी आपल्याला आता माेठा संघर्ष करावा लागणार असल्याचेही आमदार महेश शिंदे यावेळी म्हणाले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी करुन, काेराेनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून आमदार महेश शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघात पायाला भिंगरी लावून निर्णायक काम करण्याचा सपाटा लावला आहे. लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी मतदारसंघात गरजूंना अत्यावश्यक साहित्याचे वाटप, आर्थिक मदत यासह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रिक्षा चालक, प्रवासी वाहतुक करणाèया व्यवसायीकांना आर्थिक मदत देवून माेठा दिलासा दिला. मागेल त्याला सॅनिटायझर पुरविले. एवढ्यावर न थांबता मतदारसंघातील जनतेसाठी स्वखर्चातून 100 बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभे करुन जनतेतला आमदार काय असताे हे महाराष्ट्राला दाखवून दिल्याचे राजाभाऊ बर्गे म्हणाले. यावेळी सुनिल खत्री, सूर्यकांत बर्गे, नगरसेवक महेश बर्गे यांनीही मनाेगत व्यक्त केले. नगराध्यक्षा रेश्मा काेकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पाेलीस उपनिरीक्षक विशाल कदम, व्यापारी संघटनेचे प्रमुख सुरेश कुलकर्णी, सागर दाेशी, राजेश दायमा, पंचायत समितीचे माजी सदस्य रविंद्र बाेतालजी, उज्वला निकम, श्रीकांत बर्गे, महेश बर्गे, संताेष बर्गे, संजय बर्गे, राजेंद्र कुंभार, अजय बर्गे, राजेश बर्गे, रामभाऊ देवकर, संजय दुबळे, अक्षय बर्गे, मंदार बर्गे, रितेश बर्गे, प्रितम बर्गे, संताेष कदम, विलास जाधव, रमेश उबाळे, वसिम इनामदार, किशाेर चिनके, अजित पवार, राजु रसाळ, साेमनाथ शिंदे, नगरपंचायतीचे कार्यालय अधिक्षक बाळासाहेब सावंत, अभियंता काकडे, धनंजय भुजबळ यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी, नागरिक उपस्थित हाेते. ◆ चाैकट ◆ चमकाेगिरी नकाे प्रत्यक्ष काम करा : काेरेगांव शहरात काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने कार्यकर्ता बनून प्रत्येक नागरिकाची आराेग्य तपासणी करावी त्यासाठी उद्यापासूनच टाक्स ाेर्स तयार करा, मी प्रत्यक्ष कुठल्याही प्रभागात जावून माहिती घेईन, केवळ कामाची प्रसिध्दी करण्यासाठी चमकाेगिरी न करता प्रत्यक्ष काम करुन दाखवा असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. ◆ काेरेगांव पॅटर्न महाराष्ट्रात नावाजेल : काेराेना मुक्तीसाठी काेरेगांव शहरात लाेकाेपयाेगी कार्यक्रम राबवून सर्वच प्रभागात अतिशय दिशादर्शक काम सुरु आहे. त्यामध्ये आदर्श नगरसेवक असणाऱ्या महेश बर्गे यांचे काम अतिशय उल्लेखनिय असून भविष्यात काेराेना मुक्तीचा काेरेगांव पॅटर्न महाराष्ट्रात नावाजला जाईल असेही आमदार महेश शिंदे म्हणाले.

आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत वाढदिवसानिमित्त रमेश उबाळे यांनी श्री काड सिद्धेश्वर महाराज कोविड सेंटर यास केली मदत

कोरेगाव : कोरेगावं विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने उभारलेल्या श्री काड सिद्धेश्वर महाराज कोविड सेंटर, कोरेगाव साठी महेशदादांच्या या सेवायज्ञात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या पेशंट्सच्या सेवार्थ श्री बालाजी कन्स्ट्रक्शन श्री. रमेश अनिल उबाळे यांनी आज वाढदिवसानिमित्त फळे, बिस्कीट, किराणा माल कोव्हिड सेन्टरला आमदार महेशदादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोपविण्यात आले. थोडा खारीचा वाटा. महेशदादाच्या मोठ्या कार्यास छोटीशी मदत. खरंतर आपण सर्वांनी कोरेगावं विधानसभा मतदारसंघातील जनतेने ह्या सेवा यज्ञात खारीचा वाटा उचलला पाहिजे. जेणेकरून आपल्या मतदारसंघातील गरजू, गरीब पेशन्टला औषधे, आहार देण्यात आपला मोलाचे सहकार्य मिळेल व आमदार महेशदादांच्या कार्यास ताकद मिळेल. चला तर ह्या सेवा यज्ञाचा हिस्सा बनूयात. असे आवाहन आमदार महेश दादा शिंदे युवामंच कोरेगाव विधानसभा मतदार संघ यांच्याकडून करण्यात आले. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे, भाजपा कोरेगाव शहराध्यक्ष राहुल बर्गे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश यादव, युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्रीकांत बर्गे, वसीम इनामदार व कार्यकर्ते उपस्थित होते

रमेश उबाळेंचा आदर्श इतरांनी घ्यावा : आ. महेश शिंदे; कोरोना रुग्णांना आहार, औषध वाटप करून केला वाढदिवस साजरा

कोरेगाव : भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी आपल्या वाढदिवस कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार तसेच औषधे देऊन साजरा केला आहे. रमेश उबाळे यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे मत आ. महेश शिंदे यांनी व्यक्त करून उबाळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. आ.महेश शिंदे यांनी उभारलेल्या काडसिद्धेश्वर महाराज कोविड सेंटरला वाढदिवसानिमित्त रमेश उबाळे यांनी फळे, बिस्कीट, धान्य तसेच औषधे आ.शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत सुपूर्त केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.शिंदे यांनी रमेश उबाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आ.शिंदे पुढे म्हणाले, रमेश उबाळे उत्तम उद्दोजक तसेच हरहुन्नरी, सामाजिक जाणिव, सामाजिक भान असणारा कार्यकर्ता आहे. सर्व काही समाजासाठी झोकून देण्याची त्यांची वृत्ती आहे. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर धुमधडाक्यात, उत्साहात वाढदिवस साजरा करणाऱ्या रमेश उबाळे यांनी कोरोनाच्या संकटात मात्र कोव्हीड सेंटरमधील रुग्णांना पौष्टिक आहार, औषेध देऊन वाढदिवस साजरा केला आहे. उबाळे यांचा हा आदर्श इतर कार्यकर्त्यांनी घेऊन कोरोनवर अधिकचे काम करावे. राहुल बर्गे म्हणाले, रमेश उबाळे हे उत्तम कार्यकर्ते, नेते आहेतच परंतु एक चांगले मित्रही आहेत. मैत्रीला जगणारा हा माणूस आहे. कोरोना रुग्णांना आहार वाटप करून वाढदिवस साजरा करणेचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. सत्काराला उत्तर देताना रमेश उबाळे म्हणाले, खरे तर कोरोनाच्या संकटात आपण वाढदिवस साजरा करणार नव्हतो.परतु माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांनी, कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने मी वाढदिवसाचा केक कापला परंतु याचवेळी आ.महेश शिंदे यांनी उभारलेल्या कोव्हीड सेंटर मधील कोरोना रुग्णांना आहार, औषेध वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचे सर्वानुमते ठरले.कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी स्वखर्चाने आ.महेशदादांनी कोव्हीड सेंटर उभे केले आहे.असे कोव्हीड सेंटर शासनालाही उभे करता आले नाही. आ.शिंदे यांचा हा सेवायज्ञ असून या यज्ञाची सध्या सर्वत्र चर्चा आहे यामध्ये आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे म्हणून आपण येथे आलो आहे. यावेळी कोरेगाव तालुका भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, , युवा मोर्चाचे कोरेगाव शहराध्यक्ष श्रीकांत बर्गे, वसीम इनामदार आदी उपस्थित होते. सर्वच उपस्थित कार्यकर्त्यांनी उबाळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले नुतन पोलीस अधिक्षकांचे स्वागत

सातारा : सातारा हा शूरविरांचा जिल्हा असून अशा या ऐतिहासिक जिल्ह्यात काम करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांनी आपली भावना व्यक्त केली. सातारकरांच्यावतीने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बन्सल यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. नूतन पोलीस अधिक्षक बन्सल यांनी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पोलीस मु?यालयात जावून बन्सल यांची भेट घेतली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारकर आणि तमाम जिल्हावासियांच्यावतीने बन्सल यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, अनिल देसाई, नगरसेवक अविनाश कदम, बाजार समितीचे चेअरमन विक्रम पवार आदी उपस्थित होते. सातारकर हे शांत आणि संयमी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील जनताही शांत आणि संयमी आहे. तमाम जिल्हावासियांचे पोलीस प्रशासनाला नेमहीच सहकार्य असते आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वचजण पोलीस प्रशासनाला मदत करत असतात असे सांगून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात जनतेच्यावतीने नूतन एस.पी. बन्सल यांचे स्वागत केले. यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. या शांतताप्रिय जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवतानाच सुशासन आणि लोकाभिमुख कामकाज करु आणि जनतेच्या अपेक्षा सार्थ ठरवू, असे आश्‍वासन बन्सल यांनी यावेळी दिले.

शिक्षक संघाची ऑनलाईन मिटींग दिमाखात संपन्न

दहिवडी : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ऑनलाईन मिटींग घेतली.या मिटींगला उदंड प्रतिसाद मिळाला.माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे व्हॉईस चेअरमन महेंद्र अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली गुगल मिटद्वारे संपन्न झालेल्या या मिटींगला विभागीय कार्याध्यक्ष मोहनराव जाधव, सरचिटणीस सुरज तुपे,राज्य संघाचे मार्गदर्शक बाळासाहेब पवार, केंद्रप्रमुख नारायण आवळे साहेब,दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव अवघडे, संघाचे कार्याध्यक्ष महेश माने, नंदकुमार साखरे,दिलिप गंबरे, महेश कुचेकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रथमतः प्रसिध्दीप्रमुख रामभाऊ खाडे यांनी सर्वांचे स्वागत केले.अध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी प्रास्ताविक करताना शिक्षक बँकेचे माजी व्हा.चेअरमन दिवंगत शिवाजीराव कणसे,विष्णू नागू शेंडे,ल.के.भोसले, शिवदास मुळे, पोपटराव अवघडे,राणी घनवट-राऊत या गुरुजनांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यानंतर कोरोना आपत्तीमध्येसुध्दा माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कार्य अविरतपणे सुरू आहे,त्याबाबतची दत्तात्रय खाडे,बाबा खाडे, रामभाऊ खाडे यांनी तयार केलेली चित्रफित दाखविण्यात आली. यानंतर शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. ऑनलाईन शिक्षणातील अडचणी, हिंदी भाषा सुट,२००५ नंतरच्या शिक्षकांचे प्रश्न, वरिष्ठ वेतनश्रेणी, डाएट कडून होणारी ऑनलाईन प्रशिक्षणे, प्रलंबित बिले, सेवा पुस्तके ऑनलाईन करणे इ.विषयावरील चर्चेत विक्रम माने, शिवाजीराव शिंगाडे,दत्तकुमार खाडे,केशव खाडे,सागर जाधव,विजय शिपटे, महादेव लोखंडे, तुकाराम शेलार श्री.बाबर सर, अंजली कट्टे,आदींनी सहभाग घेतला. सर्व विषयांचे संकलन करून पंचायत समिती, जिल्हा परिषद, शिक्षक बँक या स्तरावर पाठपुरावा करण्याचे नियोजन केले. शेवटी रामभाऊ खाडे यांनी आभार मानले. एकंदरीत माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या या ऑनलाईन मिटींगला उदंड प्रतिसाद मिळाला.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षकांच्या प्रश्नावर झालेली ही मिटींग उपस्थितांना अत्यंत भावली हे मात्र निश्चित.

राष्ट्रीय विजेत्यांनी राज्याला केले इन्स्पायर; संचालकांच्या ऑनलाईन उपस्थितीत साताऱ्यातून प्रेरणादायी कार्यक्रम

सातारा : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि सातारा जिल्हा परिषद, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत फेसबुक लाईव्हव्दारे राज्यातील सर्व विद्यार्थी व शाळांना इन्स्पायर अवार्ड योजनेमधून राष्ट्रीय स्तरावर विजेते झालेल्या पाच विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या पाच विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे गमक या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासमोर व्यक्त केले. किशोरावस्थेतील मुले म्हणजे वय वर्षे १० ते १५ या वयोगटातील इयत्ता ६ वी ते १० वी च्या वर्गातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विज्ञानाकडे आकर्षित करणे, त्याचबरोबर शोध आणि विकास यांची सांगड घालून त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देऊन समाजोपयोगी साधन निर्मिती करुन दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यास प्रेरणा देणे हा इन्स्पायर अवार्ड या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. सध्या इन्स्पायर अवार्ड योजनेतील वाढीव मुदतीत नोंदणी वाढविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातून प्रयत्न सुरु आहेत. नोंदणीची सद्यस्थिती- *देशात महाराष्ट्र १० व्या स्थानी असून पहिल्या ५ मध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू . *राज्यात पुणे, नाशिक, सांगली, सातारा व भंडारा हे जिल्हे नोंदणीत आघाडीवर. *पालघर, ठाणे, मुंबई (उपनगर), हिंगोली, औरंगाबाद, मध्ये अत्यंत कमी नोंदणी . *सातारा जिल्ह्यातून आतापर्यंत १५०० विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी. * १५ ऑक्टोंबरपर्यंत वाढीव मुदत . यांनी दिली प्रेरणा- राष्ट्रीय स्तरावरील विजेते व मार्गदर्शक विदयार्थी- अनुज लोणकर (पुणे, महाराष्ट्र) सईदा उरुज (मंड्या, कर्नाटक) सिध्दार्थ कुशवाह (प्रयागराज, उत्तर प्रदेश) आर्यन माळी (सांगली, महाराष्ट्र) आशिष राऊत (अहमदनगर, महाराष्ट्र) कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (माध्य.)जि.प.सातारा यांनी केले. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच विज्ञान विषयाच्या अभ्यासाकडे आकर्षित करणे आणि विज्ञान व तंत्रज्ञान यामधील संशोधन व विकास यासाठी त्यांना चालना देणे असा आहे.इन्स्पायर या कार्यक्रमाचा इन्स्पायर अवार्ड हा एक घटक आहे असे स्पष्ट करत जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या प्रकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 'समस्येसोबत जगणे न शिकता,समस्या निराकरण करण्यास विदयार्थ्यांनी शिकावे' यासाठी इन्स्पायर अवॉर्ड हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे ,असे गुजरातहून सहभागी झालेले राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानचे (एन आय एएफ तज्ज्ञ मार्गदर्शक राकेश माहेश्वरी यांनी स्पष्ट केले. तत्कालीन राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून साकार झालेला, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली मार्फत सन २००९-२०१० पासून विज्ञान शिक्षण संशोधनासंबंधी सुरु असलेला 'इन्स्पायर (Innovation in Scince Pursuit for Inspire Research)' हा शालेय विद्यार्थ्यांकरता ११ व्या पंच वार्षिक योजनेमध्ये सुरु केलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. एन आय एफच्या डॉ.प्रियंका खोले यांनी विदयार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन सूचना सांगितल्या. ते उपकरण नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी असावे. या सर्व निकषांचा विचार राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट उपकरणाची निवड होते असे त्यांनीनमूद केले तसेच इन्स्पायर अवार्ड योजनेसंबंधी सविस्तर माहिती सांगितली. राष्ट्रबांधणीत महाराष्ट्राचे योगदान अनन्यसाधारण असे आहे. यांचे स्मरण करुन देत नागपूरहून सहभागी झालेल्या राज्य विज्ञान संस्थेचे संचालक रविंद्र रमतकर यांनी इन्स्पायर प्रकल्पातही महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील विदयार्थ्यांचा सहभाग वाढावा सर्व विदयार्थ्यांना तसेच शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, इन्स्पायर अवार्ड नामांकन २०२० साठी महाराष्ट्र राज्य देशामध्ये अग्रेसर असावे या हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन NIF व DST यांच्यामार्फत केले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या राष्ट्रीय अवार्ड विजेत्या बालवैज्ञानिक विदयार्थ्यांनी स्वानुभवातून केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी ठरेल असे होते. भावी विजेते होण्याची स्वप्न पाहणा-या विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वप्रथम अनुज लोणकर याने 'मिनिपोर्टेबल फ्रीज' या आपल्या उपकरणाचा प्रवास राष्ट्रीय पातळीपर्यंत कसा झाला व इन्स्पायर अवार्ड या उपक्रमामुळे त्याच्यातील वैज्ञानिक कसा घडत गेला हा अनुभव सर्वांना सांगितला. मंडया कर्नाटकमधील बालवैज्ञानिक सईदा उरुज हीने फिरते फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते यांना येणा-या समस्यांचा मानवतेच्या भावनेतून विचार करुन त्यांच्यासाठी ' मिरॅकल अम्ब्रेला' हे उपकरण तयार केले. त्यावेळी आलेल्या अनुभवांचे कथन सईदाने याप्रसंगी केले. स्वतःवर विश्वास ठेवा, यश मिळेलच असा संदेशही तिने सर्वांना दिला. प्रयागराज, उत्तरप्रदेश येथील सिद्धार्थ कुशवाह या संवेदनशील बालवैज्ञानिकाने सांगितले की, जर आपण ठरवले तर उच्च दर्जाच्या विचारातून एखादे उपकरण निर्माण होऊ शकते हे सिद्ध केले. आपल्या 'फायटींग रोबोट' या बहुउद्देशीय उपकरण निर्मितीचा प्रवास सिद्धार्थने सर्वांना सांगितला. या रोबोटचा गुन्हेगारी कमी करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल असे सांगताना त्याने विदयार्थांना सभोवतालचे निरीक्षण, समस्या शोध, समस्या निराकरणासाठी उपलब्ध पर्याय आणि या पर्यायांपेक्षा वेगळा विचार या टप्प्यांना अनुसरुन प्रकल्प निर्मिती करावी असा सल्ला सिध्दार्थने दिला. सध्या सगळीकडेच प्लास्टिक बॉटल्सचा कचरा वाढताना दिसतो आहे. या टाकाऊ बॉटल्सचा वापर करुन नवीन वस्तूंची निर्मिती करता येईल व एक छोटासा उदयोगच उभा राहू शकेल हे सांगली महाराष्ट्राच्या आर्यन माळी या बालवैज्ञानिकाने आपल्या 'वेस्ट प्लास्टीक बॉटल्स अॅज अ स्मॉल इंडस्ट्री ' या उपकरणाद्वारे दाखवून दिले .या प्रकल्पामुळे मिळालेल्या विविध संधीची माहिती आर्यनने दिली. प्रत्येक नागरिक हा देशाचे काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून अहमदनगर, महाराष्ट्रातील बालवैज्ञानिक आशिष राऊत याने भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात शौचालयांची जी समस्या आहे. ती सोडवण्यासाठी आपल्या 'फोल्डींग टॉयलेट' या उपकरणाची कल्पना सत्यात कशी उतरवली हे अतिशय प्रेरक शब्दात सर्वांना सांगितले. राष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड ही गोष्ट आपले जीवनच बदलवून टाकते. इथेच हा प्रवास थांबत नाही, तर इथून आयुष्याची खरी सुरुवात होते, असे प्रेरणादायी विचार आशिषने यावेळी मांडले. राष्ट्रीय इन्स्पायर अवार्ड विजेत्या विदयार्थ्यांसोबत फेसबुक लाईव्हव्दारे महाराष्ट्रातील अनेक विदयार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. यातून विदयार्थ्यांना नवनवीन संकल्पनांविषयी माहिती मिळाली. या कार्यक्रमाचे आभार मंगल मोरे, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. सातारा यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन गज्जम श्रीनिवास श्रीहरी यांनी केले. व विदयार्थ्यांमधून आलेले प्रश्न विजेत्यांना भाग्यश्री फडतरे व झुल्फिकार मुल्ला यांनी विचारले. या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग फेसबुक व युट्युबवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जनता दरबारात ५५ तक्रारींचा ऑन दि स्पॉट फैसला; आ. शशिकांत शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करु नका

सातारा : करोना संकटामुळे उदयोग, व्यवसाय अडचणीत आले आहेता. या कठीण परिस्थितीत प्रशासनाने विविध घटकांतील लोकांना आधार मिळेल असे काम करावे, नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष करु नका, अशा सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी जनता दरबारात अधिकाऱ्यांना केल्या. या दरबारात ५५ तक्रारींचा फैसला ऑन दि स्पॉट करण्यात आला. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादी भवनात आयोजित जनता दरबारात आ. शिंदे यांनी विविध प्रकारच्या तक्रारींचे निराकरण केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सौ. समिंद्रा जाधव, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे, स्मिता देशमुख, सुजाता भोसले, पूजा काळे, बाळकृष्ण शिंदे, गोरख नलावडे आदि उपस्थित होते. जनता दरबारात आलेल्या तक्रारीपैकी आ.शशिकांत शिंदे यांनी ५५ तक्रारींचा ऑन दि स्पॉट फैसला केला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आ. शिंदे यांनी सज्जड दम देत नागरिकांची कामे त्वरित मार्गी लावावीत, अशी तंबी दूरध्वनीवरुन दिली. या जनता दरबाराला नागरिकांनील सोशल डिस्टन्सिंग पाळून मोठा प्रतिसाद दिला. यावेळी महसूल, महावितरण, सिटी सर्व्हे, बांधकाम, कृषी विभाग यांच्यासह अन्य विभागातील सुमारे ६१ तक्रारी आल्या होत्या . सर्वात जास्त तक्रारी महावितरण आणि सिटी सर्व्हेबाबत होत्या,. नागरिकांच्या कामांचा खोळंबा करु नका. करोना आणि पावसामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांची कामे मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

युवा शेतकरी मैदानात यावा : अनिल ढोले; सुलाई ॲग्रो सव्हिसेचा उद्घाटन समारंभ संपन्न

पुसेगाव : ग्रामीण शेती आता पारंपारिक राहीली नसून तिला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. म्हणून नोकरीसाठी फिरत बसण्यापेक्षा युवकांनी शेतीच्या मैदानात उतरुन हाय-टेक शेती करण्याचे आवाहन कृषी उदयोजक अनिल ढोले यांनी केले. पुसेगाव येथे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांचे हस्ते सूलाई ॲग्रो सव्हिसेचा उध्दाटन समारंभ झाला. याप्रसंगी देवस्थानचे चेअरमन मोहनराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्र्वस्थ सुरेशशेठ जाधव, रणधीरशेठ जाधव, नवनाथ फडतरे, मानाजी घाडगे, संतोष तारळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, नितीन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. व्यवहारज्ञान चळवळ उभारावी यावेळी बोलताना अनिल ढोले पुढे म्हणाले, शेतीश्‍ तंत्रज्ञान अवगत केल्याशिवाय किफायशीरपणा येत नाही. नुसते शेतीशिवाय मजा नाही, हे गाडीच्यापाठीमागे लिहून शेती होत नाही, कारण असे शेतकरी एकदाच मजा आणि आयुष्यभर सजा भोगताना दिसतात. आता युवा शेतकऱ्यांची व्यवहारज्ञानी चळवळ उभी राहीली जावी, सुलाई ऍग्रोच्या माध्यमातून संग्राम जाधव या युवकाचा प्रयत्न असाच असेल. सदरवेळी श्री महंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव पाटील, हणमंतराव देशमुख, मच्छीद्रशेठ जाधव आदिंनी आपले विचार मांडले. प्रारंभी सुलाई ऍग्रोच्यावतीने दिलीपराव जाधव व नामदेवराव जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास मदनशेठ जाधव, रामचंद्र जाधव, लक्ष्मणराव जाधव, धनंजय क्षीरसागर, कला ? वाणिज्यचे प्राचार्य खरात, संजय क्षीरसागर, तात्या पवार, मनोज जगदाळे, सचिनशेठ देशमुख, प्रविणसाहेब जाधव, प्रशांत कुलकर्णी, उमेश शेडगे, संतोष जाधव, बाबूभाई माळी, दिलीप देशमुख, गिरीष कुलकर्णी, रामचंद्र माने, विशाल माने, विशाल जाधव, पंकज माने, महेंद्र कचरे, अण्णा जगदाळे, नितीनआप्पा जाधव, चंद्रकांत जाधव, शिवाजी जाधव इत्यादीसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन चव्हाण तर मान्यवरांचे आभार संग्राम जाधव यांनी मानले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : ना. दरेकर; सातारा-जावलीतील नुकसानग्रस्त पिकांची आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत केली पाहणी

सातारा : अतिवृष्टीमुळे सातारा-जावळी तालुक्यात झालेल्या पिकनुकसानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत थेट शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतात जावून पाहणी केली. दोघांनी भात, सोयाबीन, भुईमूग आदी नष्ट झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांची गाऱ्हांनी ऐकून घेतल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कर्जमाफी व इतर गोष्टी नंतर कराच पण आधी सरकारने तातडीने आर्थिक मदत केली पाहिजे असे सांगितले. यावर शेतकरी बांधवांनो तुम्हांला जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन ना. दरेकर यांनी दिले. ना. दरेकर, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह भाजप पदाधिकारी, महसूल आणि कृषि विभागाच्या अधिकारी यांनी जावळी तालुक्यातील रिटकावली, बिभवी आणि सातारा तालुक्यातील गजवडी, कारी, सोनवडी आदी परिसरातील नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडून त्वरित मदतीची अपेक्षा व्यक्त केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघात झालेल्या पीक नुकसानीची सविस्तर माहिती ना. दरेकर याना दिली. तसेच आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आणि शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल करून टाकले आहे. कोरोना महामारीत फक्त शेतकऱ्यांमुळे सर्वांना खायला अन्नधान्य मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. यावर ना. दरेकर म्हणाले की, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ठाकरे सरकारने सरसकट प्रत्येक बाधीत शेतकऱ्यांना दहा ते १५ हजार रूपये तातडीची मदत द्यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी रसत्यावर उतरेल. होणाऱ्या परीणामाला सरकार जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार निश्चित परभणीत दिलेला शब्द पाळतील नुकसान ग्रस्त कोरडवाहू शेतीसाठी २५ हजार, बागायत साठी ५० हजार व फळबाग लागवडी साठी १ लाख रूपये द्यावे. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. अन्यथा राज्यभर भारतीय जनता पार्टी जनआंदोलन उभारेल, मग ते मदत मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत ,नुकसानीने अधिक चिंताग्रस्त, निराश होवू नका, आम्ही तुम्हांला न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही ना. दरेकर यांनी यावेळी दिली.

जावली तालुक्यातील ९ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी निधी; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे प्रमुख जिल्हा मार्ग होणार चकाचक

सातारा : कोणत्याही भागाचा विकास करायचा असेल तर प्रथम त्या भागातील खेड्यापाड्यापर्यंत डांबरी रस्ता पोहचला पाहिजे. हेच सुत्र ओळखून सातारा- जावली मतदारसंघात वाड्यावस्त्यांसह प्रत्येक गावात डांबरी रस्ता पोहचवणार्‍या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावली तालुक्यातील ९ रस्त्यांची दर्जोन्नती झाली आहे. दर्जोन्नती झाल्याने प्रमुख जिल्हा मार्ग बनलेल्या या ९ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून तब्बल २ कोटी ९६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच या ९ रस्त्यांची दुरुस्ती होवून हे रस्ते वाहतूकीसाठी चकाचक होणार आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू नये आणि रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती व्हावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार जावली तालुक्यातील ९ रस्ते जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले. या ९ रस्त्यांची दर्जोन्नती होवून प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून गणल्या गेलेल्या या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या द्विवार्षीक देखभाल दुरुस्ती कार्यक?मांतर्गत आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून २ कोटी ९६ हजार रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीतून महु, पिंपळी, खर्शी, वालूथ, हुमगाव, इंदवली, दरे, करंदोशी या प्रमुख जिल्हा मार्गाच्या (०/०० ते १९/०० किमी)दुरुस्तीसाठी २३.६१ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. प्रजिमा २६ ते कास, एकीव, गाळदेव, माचुतर ०/०० ते १७/५०० किमी या भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २१.४५ लाख तर याच रस्त्यावरील १७/०० ते ३३/५०० किमी या भागाच्या दुरुस्तीसाठी २०.६५ लाख रुपये निधी मिळाला आहे. प्रजिमा २६ ते गोगवे, वरसोळी, गाळदेव, वाघदरे, म्हाते, मोहाट, गांजे, तांबी, खरोशी, निझरे, कामथी, वेळे ते कण्हेर या रस्त्याच्या (०/०० ते २१/५०० किमी) दुरुस्तीसाठी २७.९५ लाख रुपये, दिवदेव, मार्ली, भालेघर, आखाडे जोड रस्ता प्रजिमा १४२ (०/०० ते १०/०० किमी) दुरुस्तीसाठी १२.५० लाख, आशियाई महामार्ग क?. ४७ (राष्ट्रीय महामार्ग क?. ४) ते आनेवाडी, सायगाव, मोरघर, वाघेश्‍वर ०/०० ते १४/०० किमी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १७.३५ लाख, मेढा (वेण्णा चौक), कुसुंबी, सह्याद्रीनगर, कोळघर ङ्गाटा, अंधारी, मुनावळे, वाघळी, शेंबडी, बामणोली रस्ता ०/०० ते २७/३०० किमी दुरुस्तीसाठी ३३.९० लाख, राज्य मार्ग १४० ते आंबेघर ङ्गाटा, पुनवडी, केडांबे, बोंडारवाडी रस्ता ०/०० ते १३/०० किमी दुरुस्तीसाठी १६.८० लाख, आणि भिलार, उंबरी, धावली, आलेवाडी खिंड, रेंगडी मुरा, कुंभारगणी, मोरखिंड, जननी माता मंदीर, मोरावळे ते राज्य मार्ग १४० या रस्त्याच्या (८/०० ते २७/०० किमी) दुरुस्तीसाठी २६.७५ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. तातडीने निविदा प्रक?ीया राबवून लवकरात लवकर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरु करा आणि कामे दर्जेदार करुन वेळेत पुर्ण करा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत.

श्रावण जंगम यांची सार्थ निवड : किशोर बर्गे; कोरेगाव विकास मंचच्या वतीने सत्कार

कोरेगाव : युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने तळमळीने काम करणाऱ्या श्रावण जंगम यांची भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीवर झालेली निवड सार्थ असल्याचे प्रतिपादन कोरेगांव शहर विकास मंचचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक किशोर बर्गे यांनी व्यक्त केले. येथील युवा संघटक श्रावण जंगम यांची भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीवर निवड झाल्याबद्दल कोरेगांव विकास मंचच्या वतीने त्यांचा किशोर बर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना किशोर बर्गे म्हणाले, अत्यंत मधुरभाषी स्वभावामुळे श्रावण जंगम यांनी संपूर्ण राज्यात असंख्य मित्रांचे जाळे विणले आहे. युवकांचे प्रचंड संघटन करुन आज ते राज्य कार्यकारीणीपर्यंत पोहोचले आहेत. सातत्यपूर्ण कामातूनच त्यांनी हे यश मिळविले असून त्यांच्या पदाचा कोरेगांव तालुक्यातील युवकांना नक्कीच फायदा होईल असेही किशोर बर्गे यावेळी म्हणाले. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन श्रावण जंगम म्हणाले, राज्याचे नेते व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर कायम निष्ठा ठेवून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य व युवकांचे भक्कम संघटन उभारल्यामुळेच मला ही संधी मिळाली असून या माध्यमातून मी युवा मोर्चाची ताकद अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास निवृत्त वाहतुक निरीक्षक रामचंद्र बोलातजी, विकास मंचचे कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे, राजु बागवान आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उपळवे पिडित कुटूंबास न्याय मिळाला पाहिजे.अन्यथा, जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल : चंद्रकांत खंडाईत

सातारा : उपळवे पीडित कुटुंबास न्याय मिळावा. अन्यथा,जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल.असा गंभीर इशारा वंचित'चे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत (आप्पा) खंडाईत यांनी दिला आहे. जिल्हा बहुजन आघाडी'च्या वतीने उपळवे,ता.फलटण येथील पीडीत कुटूंबाला न्याय मिळावा. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - आंदोलन करण्यात आले. तेव्हा चंद्रकांत खंडाईत मार्गदर्शन करीत होते. जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील ऊपळवे गावात अणुसूचीत जातीच्या अल्पवयीन मुलीचा अमानूष घातपात करण्यात आला होता.अन्याय अत्याचारीत कुटूंबाच्या पाठीशी न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे. अनूसूचीत जाती मधील व्होलार समाजातील अल्पवयीन मुलीचा घातपात करून गावा पासून सुमारे ८ कीलोमीटर लांब रस्त्यालगत असणाऱ्या विहीरीमध्ये कमरेला मोठे दगड बांधुन असलेले शव मिळून आल्याने घातपात नक्कीच झाला आहे.असा संशय यायला वाव आहे. त्यामुळे या कुटूंबावर मोठा दुखा:चा डोंगर कोसळला आहे. सुरवातीपासूनच वंचित बहुजन आघाडी त्या कुटूंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी झटताना दिसत आहे.सदर कुटुंबास न्याय लवकरात लवकर मिळालाच पाहिजे. अन्यथा, तीव्रस्वरूवाचा लढा जिल्हाभर उभारला जाईल.असेही खंडाईत यांनी जाहीर केले आहे.यावेळी राष्ट्रोत्सव संयोजन समिती, एनडीएमजे व तत्सम संघटनांनी जाहीर पाठींबा देऊन आंदोलनात सहभाग नोंदवला. समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आली.यावेळी श्रीरंग वाघमारे,गणेश कारंडे,दादासाहेब केंगार,बाळकृष्ण देसाई,कल्पना कांबळे,भंडारेताई,सुधाकर काकडे,सुनील त्रिम्बके,गणेश भिसे,बबनराव कारंडे,दादा आवटे,कुमार गायकवाड, शशिकांत खरात,अनिल वीर,वामनराव गंगावणे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री सेवागिरी महाराज रथ जिर्णोद्धारासाठी श्री मुगुटराव जाधव व श्री चंद्रकांत जाधव यांच्याकडून ११ लाख ७५ हजार रुपयांची देणगी

पुसेगाव : प.पू. श्री सेवागिरी महाराजांचा रथ नव्याने बांधण्याचे काम सुरू असून श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट ने भाविक भक्तांना रथ जीर्णोद्धारासाठी देणगी देण्याचे आवाहन केले होते या आव्हानास प्रतिसाद देऊन माजी प्राचार्य श्री मुगुटराव राजाराम जाधव सर, श्री बाळासाहेब मुगुटराव जाधव आणि श्री चंद्रकांत शंकर जाधव, श्री प्रदीप शंकर जाधव व जाधव कुटुंबियांच्या वतीने सदरच्या कामासाठी ११ लाख ७५ हजार रुपयांची देणगी श्री चरणी अर्पण केली. याबद्दल देवस्थान ट्रस्ट च्या वतीने मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज , चेअरमन श्री मोहनराव जाधव विश्वस्त डॉ सुरेश जाधव, श्री योगेश देशमुख, श्री प्रताप जाधव, श्री सुरेशशेठ जाधव श्री रणधीरशेठ जाधव यांच्या शुभहस्ते स्तकार करण्यात आला. यावेळी जाधव कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा दहिवडी येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची सदिच्छा भेट

दहिवडी : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शाखा दहिवडी येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिक्षक बँकेचे व्हॉईस चेअरमन महेंद्र अवघडे, विभागीय कार्याध्यक्ष मोहनराव जाधव, संपर्क प्रमुख हरीश गोरे, दत्तात्रय कोळी, प्रमोद खाडे, शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव व बँकेचा सेवकवृंद यांनी त्यांचे स्वागत केले. मा. रणजितसिंह मोहिते-पाटील दादा यांनी यावेळी बँकेच्या विविध योजनांची माहिती घेतली व कामकाजाचे कौतुक केले.

पुणे पदवीधर मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार विजयी होणार : विक्रांत पाटील

कराड : भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष मा.श्री. विक्रांतजी पाटील यांचा सातारा जिल्हा दौरा प्रसंगी कराड येथे पदवीधर मतदार नोंदणी अभियान व कार्यकर्ता बैठक संगम हॉटेल,कराड येथे भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल भोसले,युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंघडे, प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर,अनुप मोरे,जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिनीताई शिंदे,शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या प्रमुख उपस्थिती मधे बैठक संपन्न झाली. याबैठकीत सुदर्शन पाटसकर यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले की कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सर्व राजकीय पक्षांच्या युवक संघटना घरात बसल्या होत्या,अशा वेळी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मात्र जीवाची पर्वा न करता या महामारीच्या काळातही नागरिकांना मदत कार्य करत होते अश्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व आभार मानण्यासाठी ही आजची बैठक संपन्न होत आहे याच बरोबर आगामी काळात होऊ घातलेल्या पुणे पदवीधर मतदार संघात पदवीधर नोंदणी सर्वात जास्त कराड तालुका मध्ये करून आपला उमेदवार निवडून आणणे हे आपल्या युवा मोर्चा कार्यकर्ताची जबाबदारी आहे असे आपले मनोगत व्यक्त केले. सदर बैठकीस श्री.विक्रांतजी पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे ज्यामध्ये सामान्य कार्यकर्ता सुद्धा देशाचा पंतप्रधान, पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, आज आपल्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सध्याच्या कोरोंना महामारीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम केले असून आपण जगातील अनेक राष्ट्रांना औषधे व इतर सर्व मदत केलेली आहे. भाजयूमो ने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्रामधील सध्याचे महाआघाडी सरकार हे सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले सरकार असून सरकारच्या अकार्यक्षमतेची मोठी किंमत महाराष्ट्रातील सर्वच जनता विशेषता शेतकरी, विद्यार्थी वर्ग यांना मोजावी लागत आहे. यावेळी त्यांनी भाजयूमो च्या कार्यकर्त्यांना पदवीधर मतदार नोंदणीबाबत आव्हान केले. श्री.अतुल भोसले (बाबा) यांनी मा.विक्रांतजी पाटील हे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकरणात मोठ्या पदावर दिसतील असे संगितले. सध्या आपल्याकडे कोरोंना पेशंट ची संख्या कमी दिसत असली तरी लस येईतोपर्यंत गफिल राहून चालणार नाही, अजून असीम्टोमॅटिक पेशंट ची संख्या खूप आहे त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असलेबाबत नमूद केले. श्री.विक्रम पावसकर यांनी भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे ज्यामध्ये सामान्य युवकान्ना नेतृत्व करनेची साधी देतो आहे. त्यांनी कोरोंना काळात भाजपा ने केलेले कार्य नमूद केले व आपण समाजाचे देणे लागतो हे समजून काम करणेचे आव्हान त्यांनी भाजपा युवा मोर्चा चे कार्यकर्त्यांना केले. यावेळी कराड भाजपा युवा मोर्चा कराड चे अध्यक्षपदी अ‍ॅड. विशाल कुलकर्णी यांची निवड करणेत आली. त्यांना भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. विक्रांतजी पाटील यांचे हस्ते नियुक्तिपत्र देणेत आले. सदर बैठकीस भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.जगन्नाथ पाटील, युवती विभाग महाराष्ट्र सह संयोजिका वैशाली खाडये, जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डूबल कराड दक्षिण चे अध्यक्ष पै.श्री.धनाजी पाटील,कराड उत्तर चे अध्यक्ष श्री.महेशकुमार जाधव,पाटण तालुका अध्यक्ष सागर माने,शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे,राहुल भिसे,शहर उपाध्यक्ष उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर,महिला मोर्चा प्रदेश सदस्य स्वाती पिसाळ,सारिका गावडे,सीमा घार्गे,अर्चना कारंडे,प्रवीण शिंदे,रोहित घारे,सुरज जिरगे,सौरभ शहा,विनायक घेवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्यापार्‍यांप्रमाणेच सातार्‍यातील सर्व मिळकतधारकांना घरपट्टीत सवलत मिळावी : आ. शिवेंद्रसिंहराजे; नगर पालिकेने तातडीने निर्णय घेण्याची मागणी

सातारा : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सर्व कारखाने, व्यवसाय, व्यापार आणि दुकाने यासह इतर सर्व प्रकारचे उद्योगधंदे बंद होते. वडापाव, पानटपरी, हातगाडे यासारखे सर्वच छोट उद्योग बंद होते. सातारा पालिकेने व्यापार्‍यांसाठी तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय चांगला आणि स्वागतार्ह आहे. लॉकडाऊनमध्ये व्यापार्‍यांप्रमाणेच सातार्‍यातील सर्वच मिळकतधारकांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापार्‍यांप्रमाणे सर्वच मिळकतधारकांना घरपट्टीत सवलत मिळणे आवश्यक असून व्यापार्‍यांना लागू केलेला निर्णय सर्व मिळकतधारकांना लागू करावा, अशी रास्त मागणी करतानाच आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतचा ठराव पालिकेने करावा, त्याला नगर विकास आघाडी बिनशर्त पाठिंबा देईल, असेही म्हटले आहे. यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे देशासह संपुर्ण राज्यात आणि सातारा जिल्ह्यातही लॉकडाऊन होता. या लॉकडाऊनच्या काळात सर्वप्रकारचे उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार उदीम आणि सर्वच प्रकारची दुकाने बंद होती. यामुळे व्यावसायिक, नोकरदार, रोजंदारी आणि हातावरचे पोट असणार्‍या गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. या सर्वांनाच दिलासा मिळणे अपेक्षित आहे. सातारा पालिकेने शहरातील व्यापार्‍यांना तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा चांगला निर्णय घेतला असून यामुळे व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यापार्‍यांप्रमाणेच सर्व प्रकारचे व्यवसाय बंद होते. नोकरदारांचे पगार बंद होते. अनेकांच्या नोकरीवर गदा आली. मजूर आणि हातावर पोट असणार्‍यांचे अतोनात हाल झाले. मोठमोठ्या दुकानांप्रमाणेच हातागाडे, पानटरपी, फेरीवाले, वडापाव, चहावाले अशा असंख्य लोकांचे छोटे- छोटे व्यवसाय बंद होते. त्यामुळे अशा लोकांना कर भरणे शक्यच नव्हते. याचाही विचार पालिकेने करावा. त्यामुळे व्यापार्‍यांसाठी घेतलेला योग्य निर्णय पालिकेने सातार्‍यातील सर्वच मिळकतधारकांसाठी लागू करावा आणि सर्व मिळकतधारकांना लॉकडाऊनच्या कालावधीतील घरपट्टीमध्ये सूट द्यावी. व्यापार्‍यांप्रमाणेच इतर सर्वच व्यावसायिक, उद्योजक, लघु उद्योजक, नोकरदार यांचे लॉकडाऊनमुळे हाल झाले. सातारा पालिकेने चांगला निर्णय घेवून व्यापार्‍यांना घरपट्टीमध्ये सवलत दिली आहे. व्यापार्‍यांप्रमाणेच इतर मिळकतधारकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे हा निर्णय व्यापार्‍यांप्रमाणेच सातार्‍यातील सर्वच मिळकतदारांना लागू करुन सर्वांना घरपट्टीमध्ये सवलत देवून दिलासा द्यावा. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करावा. नगर विकास आघाडी या ठरावाला बिनशर्त पाठिंबा देईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे. हद्दवाढीत समाविष्ट भागाचाही विचार व्हावा लॉकडाऊनचा फटका सातारा शहराप्रमाणेच हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या सर्वच भागातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार यांच्यासह सर्वांनाच बसला आहे. सातारा पालिकेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतानाच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन भागाकडेही पालिकेने लक्ष देण्याची मागणी केली आहे. घरपट्टी माफीचा निर्णय घेताना पालिकेने नवीन भागाचाही विचार करावा, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी सणासुदी काळात विशेष काळजी घ्या : मनोज जाधव

सातारा : कोरोना वर मात करण्यासाठी शक्य ते सर्व उपाय आपण सर्वजण करीत आहोत.कायमच नियम पाळणे गरजेचे आहे.परंतु ;सध्याच्या विशेषतः सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन एका पत्रकाद्वारे जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केले आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा तसेच जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कोरोना मुक्तीकडे यशस्वी वाटचाल चालू आहे कोरोना मुक्ती मध्ये चांगले यश मिळत आहे ही सर्वांचेच परिश्रमाचे फलित आहे तथापि नवरात्री दसरा या सणांच्या नंतर आता दिवाळी जवळ आली आहे या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत अथवा पाहुण्या रावळ्या कडे जाऊन नागरिकांनी गर्दी करू नये सर्व नियम पाळावेत अजून काही काळ आपल्याला संयम ठेवायचा आहे त्यामुळे आपण शंभर टक्के कोरोनावर यश नक्की मिळवू.सातारा जिल्ह्याचे यश 90 टक्‍क्‍यांच्या आसपास पोहोचले आहे.आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच महसूल अंगणवाडी विभाग पोलीस यंत्रणा असे सर्वच कर्मचारी आणि अधिकारी जीवाचे रान करून कोरोना मुक्ती साठी प्रयत्न करीत आहेत यश काही पावलांवर असताना गाफील न राहता संयम पाळणे गरजेचे आहे.सातत्याने मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, तसेच वारंवार स्वच्छ हात धुणे हे नियम काटेकोरपणे पाळावे.त्यासोबतच आयुर्वेदिक उपाय जे आयुष मंत्रालयाने सुचवले आहेत त्यानुसार आपली जीवनशैली कायम ठेवावी.आसपास स्वच्छता ठेवावी असे देखील पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे.

महामारीविराेधात छातीठाेकपणे लढणारा आमदार तुम्ही निवडलाय : आमदार महेश शिंदे

काेरेगांव : काेराेना विराेधात हिंमतीने लढत असताना मतदारसंघातील काेणत्याही व्यक्तीला वाऱ्यावर साेडू न देता त्याच्या सेवेत मी अखंड कार्यरत राहिलाे, उद्या जगातील कुठलीही महामारी येऊद्यात त्या विराेधात छातीठाेकपणे मी उभा राहिन हा विश्वास देत तुम्ही लढणारा आमदार निवडलाय असेही आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले. ल्हासुर्णे (ता. काेरेगांव) येथे उभारण्यात आलेल्या आराेग्य उपकेंद्राचे उद्घाटन व आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणाऱ्या १५ लक्ष निधीच्या नवीन स्मशानभूमीचे, बाैध्द विहार इमारत व रामाेशी वस्ती अंतर्गत रस्त्यांच्या भुमिपूजन प्रसंगी आमदार महेश शिंदे बाेलत हाेते. माजी सरपंच किसनराव सावंत, माजी सरपंच प्रशांत संकपाळ, सरपंच साै. नंदा उबाळे, उपसरपंच सचिन सावंत, संताेष जाधव, राहुल बर्गे, जवानसिंग घाेरपडे, संदीप केंजळे, आराेग्य विभागाचे डाॅ. वाघमारे, वीज वितरणचे श्री. मेटकरी, बांधकाम विभागाचे श्री. वंजारी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती हाेती. आमदार महेश शिंदे पुढे बाेलताना म्हणाले, काेराेना रुग्णालय उभारल्यानंतर सेवावृत्तीने तिथे काम करीत राहिलाे, अनेक रुग्णांना अगदी त्यांच्या मुलाप्रमाणे मी सेवा दिली. झपाटल्यासारखे काम केल्यानेच आज आपण मतदारसंघातील काेराेनावर नियंत्रण आणू शकलाे याचे फार माेठे समाधान आहे. चांगले काम करीत असताना नावे ठेवणारी प्रवृत्ती पदाेपदी असतेच. पण म्हणून चांगले काम सुरु असताना काेणी नासाडी करण्याच्या भावनेने वावरत असेल तर त्याला हुसकावून लावण्याची क्षमता ल्हासुर्णेकरांमध्ये चांगलीच आहे, उणीधुनी काढू नका अन्यथा जसाश तसे उत्तर देण्याची धमक आमच्यातही असल्याचे सांगून आमदार महेश शिंदे म्हणाले, सामान्य कार्यकर्ता स्वत:चे घर चालविण्या इतपत सक्षम झाला पाहिजे हा माझा विचार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला मतदारसंघ पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे, त्यात काेणी बाधा आणू नका असा इशाराही त्यांनी दिला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच प्रशांत संकपाळ यांनी करुन जाहीरनाम्यात दिलेल्या कामांची वचनपूर्ती आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले. चंद्रकांत उबाळे यांनीही आपल्या मनाेगतात ल्हासुर्णे गाव एकसंघपणे विराेधकांच्या आव्हानाला कायम सामाेरे जात असल्याचे सांगून जनतेच्या भावना समजून घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी आपण निवडून दिल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, त्यामुळे आतातरी चांगल्याची वाट धरा असा सल्ला चंद्रकांत उबाळे यांनी विराेधकांना लगावत आमदार महेश शिंदे यांनी अवघ्या एकाच वर्षात ल्हासुर्णे गावाला दिलेल्या लाखाे रुपयांच्या विकासाचा वेग यापुढेही वेगाने दाैडत राहिल असे सांगितले. उपस्थितांचे स्वागत सरपंच साै. नंदा उबाळे, उपसरपंच सचिन सावंत, सदस्य शिवाजी गुरव यांनी केले. ल्हासुर्णे ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश शिंदे यांचा काेव्हिड याेध्दा सन्मानपत्र देवून यावेळी गाैरव करण्यात आला. कार्यक्रमास ल्हासुर्णे विभागातील मान्यवर, कार्यकर्ते, विविध विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. ●चाैकट ● लाेकसेवेचा हिशाेब जनताच सांगेल.... आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चातून कराेडाे रुपये खर्चून उभारलेल्या काेराेना रुग्णालयाचा गाैरव करताना चंद्रकांत उबाळे यांनी उपस्थितांसमाेर हिशाेबच मांडला. आमदार महेश शिंदे यांनी अवघ्या एक वर्षात केलेल्या लाेकसेवेचा हिशाेब एका बाजूला आणि नुसत्या घाेषणांचा हिशाेब एका बाजूला ही परिस्थीती सामान्य जनता आता कधीच विसरणार नसून प्रत्येक कामाचा हिशाेब आता इथली जनता देत राहिल असेही त्यांनी सांगितले.

सृष्टी रासकर हिची भारतीय बॉक्सिंग संघात प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

सातारा : सातारा बॉक्सिंग अकॅडमी ची राज्यस्तरीय सुवर्ण पदक विजेती राष्ट्रीय खेळाडू कु. सृष्टी सुनीलकुमार रासकर हिची भारतीय खेल प्राधिकरण (SAI) व बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत खेलो इंडिया उपक्रमात भारतीय ज्युनिअर महिला बॉक्सिंग संघात प्रशिक्षण शिबिरासाठी (INDIA CAMP) निवड करण्यात आली. भारतातील 40 खेळाडूंमध्ये तिची निवड झाली. ती भारतीय खेल प्राधिकरण (SAI)औरंगाबाद येथे शिबिरासाठी दाखल झाली असून ती कसून सराव करत आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये याच शिबिरातुन भारतीय संघ निवडला जाणार आहे. सृष्टीला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहाय्यक प्रशिक्षक विनोद राठोड, सुनील जाधव, अक्षय ढाणे, तेजस यादव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीबद्दल सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव राजेंद्र हेंद्रे, कार्याध्यक्ष रवींद्र झुटिंग, विभागीय सचिव योगेश मुंदडा व संघटनेचे सर्व पदाधिकारी, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, सचिव रवींद्र होले,खजिनदार संजय पवार, अमर मोकाशी, विजय मोहिते, बापूसाहेब पोतेकर, मयुर डिगे, गणेश माने, शैलेंद्र भोईटे, अंकुश माने व सर्व पदाधिकारी,पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

एनयुजे इंडियाचे सचिवपदी शीतल करदेकर तर कार्यकारिणी सदस्यपदी सुवर्णा दिवेकर, संजना गांधी व शिवाजी नलावडे यांची निवड

मुंबई : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस इंडिया,नवी दिल्ली(एनयुजे इंडिया)च्या सचिवपदी शीतल करदेकर तर एक्झिक्युटिव मेंबर म्हणून मा सुवर्णा दिवेकर , रायगड मा संजना गांधी , पुणे मा शिवाजी नलावडे, औरंगाबाद यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात युनियनचे अधिक बळकटीसाठी आणि राष्ट्रीय स्तरावर मा शिवेंद्रकुमार यांचे मार्गदर्शनाखाली भरीव योगदान निश्चितच देऊ असे प्रातिनिधिक मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले. सीमा भोईर, वैशाली आहेर, कैलास उदमले, सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव , कोषाध्यक्ष तसेच एनयुजे महाराष्ट्र चे सर्व टीमने , मा मार्गदर्शक ज्येष्ठ एनयुजे नेते मा शिवेंद्रकुमारजी व एनयुजे इंडियाचे अध्यक्ष मा रासबिहारीजी यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत! - संदिप टक्के प्रवक्ते एनयुजे महाराष्ट्र

शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती हेच अजिंक्यतारा कारखान्याचे ध्येय : आ. शिवेंद्रसिंहराजे; एफआरपी ३०४३ रु., पहिली उचल २६०० रुपये

सातारा : सातारा तालुका आणि आसपासच्या परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्या सक्षम व्हावा आणि शेतकर्‍याने पिकवलेल्या ऊस पिकाला किफायतशीर दर मिळावा हे स्वप्न उराशी बाळगून स्व. भाऊसाहेब महाराजांनी अनंत अडचणींवर मात करुन सभासदांच्या साथीने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना उभा केला. आज ही संस्था पुर्णपणे आर्थिक सक्षम आणि भक्कम आहे. सभासद शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न सत्यात उतरले असून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती हेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान, कारखान्याची एफआरपी रक्कम प्रतिटन ३ हजार ४३ रुपये असून गाळपास येणार्‍या ऊसाला एफआरपीनुसार संपुर्ण पेमेंट वेळेत अदा केले जाईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने सुरु असून उत्पादीत झालेल्या १ लाख ११ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत, व्हा.चेअरमन विश्‍वास रामचंद्र शेडगे, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक संजीव देसाई, जि.प.सदस्य प्रतीक कदम, माजी उपाध्यक्ष चंंद्रकांत जाधव, महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती श्रीमती वनिता गोरे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, माजी सभापती लालासाहेब पवार, रामचंद्र जगदाळे, पंचायत समिती सभापती सौ.सरिता इंदलकर, उप सभापती अरविंद जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हंगाम चालू झाल्यापसून ते दि.०२/१२/२०२० अखेर १,२१,२९० मे.टन गाळप झाले असून सरासरी साखर उतारा १०.७०% इतका आहे. कारखान्याचे दैनंदिन गाळप ४५०० मे.टन क्षमतेने सुरु असून एका महिन्यात १,१२,६८० मे.टन इतके गाळप झाले आहे. कारखान्याने दि.०४.११.२०२० ते २०.११.२०२० अखेर गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल रू.२६००/- प्र.मे.टनाप्रमाणे रू.१७ कोटी ९० लाख ७५ हजार इतकी रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. कारखाना एफ.आर.पी रू.३,०४३ प्र.मे.टन इतकी असून एफआरपी प्रमाणे संपूर्ण पेमेंट ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना देण्यास कारखाना व्यवस्थापन कटिबध्द आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. कारखान्याने बी-हेवी मोलॅसिस पासून ४० लाख लिटर इथेनॉल टेंडर भरलेले आहे व त्याचा ऑईल कंपन्यांना पुरवठा दि.०१ डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आला आहे. तसेच कारखान्याने बी-हेवी मोलॅसिस १७,००० मे.टन विक्री केले असून त्याचीही डिलीव्हरी चालू आहे. त्यामुळे कारखान्यास पैसे वेळेत उपलब्ध होऊन शेतकर्‍यांना ऊस बिल वेळेत देण्यास मदत होणार आहे. शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या धोरणानुसार अशा प्रकारचा निर्णय जिल्ह्यात प्रथम अजिंक्यतारा कारखान्यामार्फत घेतला आहे. कारखाना व्यवस्थापनाचे योग्य आर्थिक नियोजन, मशिनरी मध्ये वेळोवेळी केलेले तांत्रिक बदल यासह नोंद केलेल्या ऊसाचे तोडणी प्रोग्राम अचूकपणे राबविण्यात येत असून सभासद, शेतकर्‍यांच्या सहकार्याने यंदाचा हंगामही यशस्वीपणे पुर्ण होणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले. कार्यक्रमास पंचायत सभापतीचे माजी सभापती मिलिंद कदम, माजी उपसभापती जितेंद्र सावंत, अरविंद चव्हाण, दादा शेळके, विद्यमान सदस्य राहूल शिंदे, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ऍड.सुर्यकांत धनावडे, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण फडतरे, तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष गणपतराव शिंदे, संचालक दिलीपराव फडतरे, अजिंक्यतारा सुत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष बळीराम देशमुख, माजी अध्यक्ष पंडितराव सावंत, माजी उपाध्यक्ष गणपतराव मोहिते, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक सदस्य, युनियन अध्यक्ष श्री.धनवे, अजिंक्य उद्योग समुहाचे सर्व पदाधिकारी अधिकारी, अन्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ग्रेड सेपरेटर तात्काळ सुरु न केल्यास आंदोलन : आ. शिवेंद्रसिंहराजे; उदघाटनाच्या नावाखाली वाहतूकीचा बोजवारा उडवू नका

सातारा : पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. राजवाडा- पोवई नाका ते मध्यवर्ती बस स्थानक, पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील ग्रेड सेपरेटरचे काम पुर्ण झाले आहे. पोवई नाका ते वायसी कॉलेज या मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम पुर्ण झालेले रस्ते वाहतूकीसाठी खुले करणे अत्यावश्यक आहे. उदघाटनाचा कार्यक्रम ज्यावेळी घ्यायचा असेल त्यावेळी घ्या आणि ज्यांच्या हस्ते घ्यायचा असेल त्यांच्या हस्ते घ्या. मात्र त्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांची कुचंबना करु नका. येत्या आठवडाभरात ग्रेड सेपरेटरमधील पुर्ण झालेल्या मार्गावरुन वाहतूक सुरु करा अन्यथा स्वत: बॅरेकेटस काढून आंदोलन करु आणि वाहतूक सुरु करु, असा इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, सातार्‍यातील सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. यामुळे सातारा शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. बांधकाम विभागाकडून ग्रेड सेपरेटरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरु आहे. केवळ आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण करुन चालणार नाही तर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी ग्रेड सेपरेटर वाहतूकीसाठी तात्काळ खुला करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीला ग्रेड सेपरेटर म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. पोवई नाका हे शहराचे मुख्य ठिकाण आहे. सर्व प्रकारची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, दुकाने आणि बाजारपेठा सुरु झाल्याने सातारा शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत आहे. ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरु नसल्याने या रस्त्यांवर वाहतूकीचा ताण पडत आहे. गेले कित्येक वर्षांपासून ग्रेड सेपरेटरची फक्त चर्चा सुरु आहे. मात्र ग्रेड सेपरेटर वाहतूकीसाठी कधी खुला होणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. सध्या सातारकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. ग्रेड सेपरेटरमधील ज्या मार्गांचे काम पुर्ण झाले आहे ते मार्ग खुले केल्यास वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. केवळ उदघाटनासाठी ग्रेड सेपरेटर खुला न करणे हे अनाकलनीय कोडे आहे. ग्रेड सेपरेटरचे उदघाटन जेव्हा करायचे असेल तेव्हा सवडीने आणि आवडीने करा पण, त्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय करु नका. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निर्णय घेवून येत्या आठ दिवसांत ग्रेड सेपरेटरमधील काम पुर्ण झालेले मार्ग खुले करावेत अन्यथा लोकहितासाठी मला स्वत: ग्रेड सेपरेटरला लावलेले बॅरेकेटस काढून रस्ता सुरु करण्याचे आंदोलन करावे लागेल असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

पालकांनी शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवावे : शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर

सातारा : पालकांनी शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना शळेमध्ये पाठवावे. गरज आहे मानसिकता बदलण्याची विद्यार्थी व शिक्षक स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत शिक्षणाचे धडे नक्कीच गिरवतील. आठ महिने निर्जीव भासत असलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या बागडण्याने पुन्हा सजीव होतील. अध्ययन-अध्यापनाचे पडसाद वर्गावर्गातून घुमू लागतील आणि पुनश्च विद्यार्थी व शिक्षकांच्या मनात चैतन्याचे वारे वाहू लागेल, असा विश्वास माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केला आहे. पत्रकात म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. २३ मार्च २०२० पासून बंद असलेल्या शाळा अखेर १०नोव्हेंबर २०२० च्या शासन परिपत्रकानुसार सुरु करण्याचा शासन स्तरावरुन निर्णय झाला आणि २३ नोव्हेंबर २०२० पासून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानंतर सातारा जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या ९० टक्के शाळा सुरु झाल्या आहेत, जिल्हा परिषदेचे मुखृय काय्रकारी अधिकारीविनय गौडा यांच्या मागर्हदर्शन व प्रेरणेतून पुढील वाटचाल करत आहोत. ठिकठिकाणी झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा, पूर्वतयारी अन संमतीने नववी वे बारावीच्या वर्गासाठी घंटा पुन्हा वाजू लागली आहे. राज्य शसनाकडून शाळा सुरु करणृयापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार सर्व शळांनी शाळेची स्वच्छता व निर्जंतुककरण, शिक्षकांची कोविड-१९बसबतची चाचणी, विद्यार्थी व शिक्षक बैठक व्यवस्था, विविध कार्यगट गठीत करणे, शरीरीक अंतर राखण्हयासाइी शलेय परिसरात विविध चिन्ह व खुणा प्रदर्शित करणे तसेच प्रामुख्‌याने पालकांची संमतीपत्रे घेणे, या मार्गदश्रक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. पालक बंधू-भगिनींनो प्रत्यक्षात शळा सुरु झाल्यापासून दररोज शलेय परिसर तसेच वर्ग निर्जंतुक करणृयात येत आहेत. सव्र विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी मोजून त्याच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत. शहळेतील प्रत्येक घटकासाठी मास्हक, सॅनिटायण्र व सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री बंधनकारक असून विद्यार्थी सुरक्षित अंतर ठेवतील व मस्क किंवा इतर वैयक्तिक वस्तूंची अदलाबदल करणार नाहीत, याची दक्षता शळांकडून घेतली जात आहे. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात शसन व शळा सज्ज असतानाही पालकांचा प्रतिसाद मात्र अल्प दिसून येत आहे. सातारा जिल्हातील एकूण्‍ ८२० शाळांपैकी ७२६ शाळा सध्या सुरु आहेत. उर्वरीत शळाही टप्प्याटप्प्यावने सुरु होतीलच. या शळांमधील ४० टक्के विद्यार्थांच्या पालांनीच विद्यार्थी शळेत पाठविण्यास संमती दिली आहे. त्यानुसार विद्यार्थि शाळेत पाठविण्यास संमती दिली आहे. त्यानुसार विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात उपस्थित राहत आहेत. मात्र उपस्थिती समाधानकारक नाही.

एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने सह आयुक्त कामगार यांना एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी माध्यमकर्मींंविषयक मागण्यांचे दिले निवेदन

मुंबई : मा रविराज इळवे,सह आयुक्त कामगार ,महाराष्ट्र यांना एनयुजे महाराष्ट्र च्या माध्यमकर्मींंविषयक मागण्यांचे निवेदन एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष मा शीतल करदेकर यांनी दिले. याप्रसंगी मा नीलांबरी भोसले,सहायक कामगार आयुक्त,स्वीयसहायक कामगार आयुक्त याही उपस्थित होत्या! नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र ची नवीन कामगार कायदे विषयक भूमिका, पत्रकार रजिस्ट्रेशन,त्रिपक्षीय समिती,तसेच मजिठिया त्रिपक्षीय निरिक्षण समितीची तातडीने बैठक होणे आदी विषयात कामगार आयुक्तांलयाने तातडीने लक्ष घालून त्रस्त माध्यमकर्मींंना दिलासा आणि विधायक कृतीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली

डॉ. आंबेडकरांची महापरिनिर्वाण दिन सर्वानी एकत्रित येऊन साजरा करावा : रमेश उबाळे

कोरेगाव : २१ व्या शतकामध्ये देशाला विकासाच्या दिशेने वाटचाल करायची झाल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचाराशिवाय पर्याय नाही.त्यांचे विचार समजण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकत्रित येऊन डॉ. बाबासाहेब यांचा महापरिनिर्वाण दिन साजरी केली पाहिजे असे मत रमेश उबाळे यांनी व्यक्त केले. ल्हासुरणें ता.कोरेगाव येथे ग्रामपंचायतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रमेश उबाळे बोलत होते. रमेश उबाळे पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मच अस्पृश्य समजामध्ये झाला असल्याने अस्पृश्यतेचे चटके सहन त्यांना सहन करावे लागले म्हणून त्यांनी अस्पर्शता निर्मूलनला प्राधान्य दिले. तळागाळातील माणूस सर्वशक्तीनिशी जागा केला.त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता तसेच सामर्थ्याची जाणीव करून दिली. देशामध्ये आदर्श असा समाज निर्माण झाला पाहिजे यासाठी त्यांनी लोकशाही शासनाचा स्वीकार करून एक व्यक्ती एक मत, एक मूल्य आणि त्याची एकच किंमत हा सिद्धांत मांडला. राजकीय लोकशाही असली तरीही त्याचे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतर झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. असे झाले तरच हा देश जगापुढे टिकेल अन्यथा देश अडचणीत येईल त्यासाठी त्यांनी जगाला शोभेल आणि भारताला आधुनिक काळात सर्व प्रकारच्या सुधारणा व सर्वांगिण विकास करता येईल अशी आदर्श अशी राज्यघटना दिली आहे. या राज्यघटनेवर देशाची वाटचाल सुरू असून २१ व्या शतकात देशाला विकासाच्या दिशेने जावायचे असेल तर डॉ.आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. असे रमेश उबाळे यावेळी म्हणाले. डॉ. नितीन सावंत म्हणाले, डॉ. बाबासाहेब समजायचे झल्यास त्यांच्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारच आज देशाला तारू शकतात. यावेळी दीपप्रज्वलन करून ग्रामसेवक खंडाईत त्यांच्या हस्ते डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अशोक उबाळे, शिवाजी गुरव, जयवंत इंगळे, रत्नप्रभा उबाळे, रोहिणी उबाळे,आशा इंगळे ,तेजस इंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

खटाव तालुका पंचायत समिती मध्ये खा शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

वडूज : आपल्या कष्ट आणि कर्तृत्वाच्या जोरावर वयाच्या २१ व्या वर्षांपासून आज अखेर वयाच्या ८० व्या वर्षी ही त्याच उत्साहाने कृषी, उद्योग, क्रीडा या क्षेत्राबरोबरच विशेषतः राजकीय क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार साहेबांचा ८०वा वाढदिवस खटाव तालुका पंचायत समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी खटाव पंचायत समितीच्या सभापती कल्पना खाडे, प्रा बंडा गोडसे,माजी सभापती संदीप मांडवे,नियोजन मंडळाचे नंदकुमार मोरे,छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे पृथ्वी राज गोडसे, हर्षदा देशमुख,बाळासाहेब पोळ,ज्ञानेश्वर शिंदे,विजय खाडे, डॉ देशमुख, सदाशिव बागल,अक्षय थोरवे आदींची उपस्थिती होती

सातारा जिल्हा बँकेत खा.शरद पवार साहेबांचा वाढदिवस साजरा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८० वा वाढदिवस सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भव्य सभागृहामध्ये राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते केक कापून साजरा करण्यात आला. आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथून राज्यभर डिजिटल व्हर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे थेट प्रक्षेपण सभागृहामध्ये करण्यात आले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये आयोजित समारंभप्रसंगी पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, शहाजीराव क्षीरसागर बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, बँकेचे जनरल मॅनेजर सरकाळे साहेब यांचेसह सातारा जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेलच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

उरमोडी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड

वडूज : खटाव - माण चा पाणीप्रश्न कायमच राजकारणाच्या चर्चेचा विषय असतो. गेली अनेक वर्षे हा विषय खटाव-माण च्या लोकांच्या जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी जे प्रकल्प अपुरे आहेत ते पूर्ण करणे व ज्या ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले अशा ठिकाणी पाणी वाटप करण्यासाठी शासनाकडून एक समिती स्थापन केली जाते त्यामध्ये 18 मार्च 2016 व 26 डिसेंबर 2019 मधील तरतुदीनुसार उरमोडी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र माननीय जलसंपदा विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झाले असून सदर निवडीमुळे खटाव व माण तालुक्यातून रणजितसिंह देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना रखडलेल्या उरमोडी प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे उरमोडी प्रकल्प पूर्ण होऊन पाणी माण खटाव मध्ये आले या पूर्वीच्या सदस्यांच्या काळात पाण्याचे वाटप व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होऊ लागल्या चे लक्षात घेऊन सध्याच्या महाविकास आघडी सरकारने कालवा समितीच्या सदस्यपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड केली . उरमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून खटाव मधून माणला पाणी गेल्यामुळे सध्या उसाचे क्षेत्र वाढले आहे तसेच कृष्णा खोरे जिहे- कटापूर व तारळी प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात खटाव-माण चा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यास आम्ही बांधील असून या रखडलेल्या प्रकल्पाचे कामे ही लवकरच पूर्ण होतील व यामुळे येथील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होईल असे मत रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केले

हाॅटेल दरबारच्या फिश फेस्टिव्हलला पहिल्या दिवसापासूनच खवय्यांची माेठी झुंबड

काेरेगांव : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपल्या लज्जतदार चवीने हजाराे खव्वय्यांना आपलेसे करणाऱ्या काेरेगांव येथील हाॅटेल दरबारच्या फिश फेस्टिव्हलला शुक्रवार पासून शानदार सुरुवात झाली असून या फेस्टिव्हलला पहिल्या दिवसापासूनच खवय्यांनी जाेरदार प्रतिसाद देत माेठी झुंबड केली हाेती. हाॅटेल दरबारने आयाेजित केलेल्या फिश फेस्टिव्हलचा प्रारंभ काल माेठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी पहिले फॅमिली ग्राहक व फिश स्पेशल कुकच्या हस्ते फेस्टिव्हलचा प्रारंभ दिपप्रज्वलनाने करण्यात आला. चाेखंदळ खवय्यांसाठी नेहमीच हाॅटेल दरबारने वेगवेगळ्या फेस्टिव्हलचे आयाेजन करुन ग्राहकांना पर्वणी मिळवून दिली आहे. यावेळच्या फिश फेस्टिव्हलमध्ये गाेवन आणि अस्सल काेकणी पध्दतीच्या फिश डिशेस् उपलब्ध केल्या असून त्यातून खवय्यांना एक वेगळेपण निर्माण करुन दिले आहे. गाेवण, काेकणी पध्दतीच्या 70 च्या वर वेगवेगळ्या फिश, प्राॅन्स, क्रॅब्स डिशेस्सह वेगवेगळ्या फिश करीज्, फ्राय डिशेस्, तंदूर डिशेस् सुध्दा चाखायला मिळणार आहेत. फिश फेस्टिव्हलच्या प्रारंभी हिंदी-मराठी गीतांची सुमधूर मैील सुध्दा ग्राहकांना ऐकायला मिळाली. चमचमीत डिशेस् साेबतच खूप सारे मनाेरंजन मिळवून देणाऱ्या हाॅटेल दरबारची तत्पर आणि विनम्र सेवा ही खासीयत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. त्यासाेबतच प्रशस्त वाहन पार्किंग व्यवस्था, पार्टी लाॅन गार्डन मध्ये फॅमिली ग्राहकांसाठी सुसज्ज व्यवस्था, फॅमिली हाॅल व काॅन्फरन्स हाॅल मध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह काॅटेजेस् उपलब्ध करुन दिल्या आहेत. प्रत्येक डिशची खासीयत असणाऱ्या हाॅटेल दरबारने चव आणि दर्जा कायम राखत अधिकाधिक ग्राहकांना गेली एक दशक उत्तम सेवा दिली आहे. याचमुळे या हाॅटेलचा सर्वत्र नावलाैकीक हाेत असून हाॅटेलचे संचालक व काेरेगांवचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे यांच्या कल्पकतेतून या हाॅटेलने आजपर्यंतचे सगळेच फेस्टिव्हल यशस्वी केले आहेत. फिश फेस्टिव्हल दि. 15 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून ग्राहकांसाठी विविध डिशेस् घरपाेहाेच सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

शिवसुर्य

सातारा आणि जावली तालुक्यांच्या सर्वांगिण विकासासह अजिंक्य उद्योग समुहाला उभारी देण्याचे शिवधनुष्य लीलया पेलणार्‍या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने राजकारणात एक आदर्श घालून दिला आहे. राजघराण्याचा समाजसेवेचा वारसा अविरतपणे पुढे चालवणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा आणि जावली तालुक्यात विकासगंगा कायम प्रवाहित ठेवून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साध्य केला आहे. अनेक सहकारी संस्थांना उर्जितावस्था देत अजिंक्य उद्योग समुहाला सहकाराच्या उच्च शिखरावर विराजमान करुन हजारो हातांना काम आणि तालुक्यातील शेतकर्‍यांना हक्काचे दाम मिळवून देऊन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा समाजसेवेचा वारसा अखंडीत ठेवला आहे. विकासकामात राजकारण न आणता, पक्षीय भेदभावास थारा न देता, प्रत्येकाचे प्रश्‍न सोडवणार्‍या, मतदारसंघाचा विकास हाच आमचा ध्यास, हे ब्रिद सत्यात उतरवून एक आदर्श समाजकारणी कसा असावा, याचे मुर्तीमंत उदाहरण बनलेल्या, सर्वसामान्यांच्या या नेतृत्वाने राज्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमठवला आहे. केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श बँक अशी ख्याती असलेल्या सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर बँकेच्या नावलौकिकातही भर टाकली. सत्तेपेक्षा मतदारसंघाचा विकास केंद्रबिंदू मानून अखंड कार्यरत राहणारे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणजे समाजकारणाच्या क्षितिजावर तळपणारा शिवसुर्य होय! १९७८ मध्ये आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या रुपाने सातारा तालुक्याला प्रभावी नेतृत्व लाभले आणि वाई अथवा कराड मतदारसंघावर अवलंबून राहणार्‍या सातारा तालुक्याला विकासाची एक वेगळी आणि सकारात्मक दिशा मिळाली. स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या परिसस्पर्शाने सातारा तालुक्याचे खर्‍या अर्थाने सोने झाले. आमदार ते सहकारमंत्री अशी अनेक पदे भूषविणार्‍या भाऊसाहेब महाराजांनी त्या- त्या पदांना साजेशे काम करुन सातारा तालुक्याचा चेहरामोहरा बदलून जिल्ह्याच्या राजकारणात सातारा तालुक्याला महत्वाचे स्थान निर्माण करुन दिले. भाऊसाहेब महाराजांच्या अकाली निधनानंतर तालुका आपल्या भाग्यविधात्या नेतृत्वाला पारखा झाला. स्व. भाऊसाहेब महाराजांनंतर सातारा तालुक्यात सुरु झालेली विकासाची गंगा अविरत सुरु ठेवण्याची जबाबदारी त्यांचे सुपुत्र आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर आली. समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या बाबाराजेंनी लहान वयात ही जबाबदारी समर्थपणे पेलली आणि तालुक्याच्या राजकारण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात अलौकिक कर्तुत्वाने एक आदर्श निर्माण केला. भाऊसाहेब महाराजांच्या काळातील जुन्या, जेष्ठ कार्यकर्त्यांच्यासोबत नव्या पिढीतील युवा कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांनी सातारा विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरु केला. अल्पावधीतच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपले नाव कोरले. स्व. भाऊसाहेब महाराजांची उणीव आ. शिवेंद्रसिंहराजेंनी भरुन काढली आणि सातारा तालुक्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. दांडगा जनसंपर्क, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, रात्री, अपरात्री, कोत्याही प्रसंगी जनतेसाठी उपलब्ध असणारे, विनयशिल, संयमी, स्पष्टवक्ते, विकसनशील नेतृत्व. राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे कृतीशिल नेतृत्व आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या रुपाने सातारा- जावली मतदारसंघाला लाभले आहे. ■ कृषी- औद्योगिक- शैक्षणिक क्रांती ■ स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासगंगेचा उगम करुन सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक विकासाला चालना दिली. अजिंक्य उद्योग समुहाच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यातील बेरोजगारीला लगाम घालण्याचे काम केले. त्यांच्या पश्‍चात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अजिंक्य उद्योग समुहाला सहकाराच्या उंच शिखरावर नेवून ठेवले आहे. केवळ साखर निर्मीतीवरच अवलंबून न राहता साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प, सहवीज निर्मीती प्रकल्प असे मुल्यावर्धित प्रकल्प सुरु करुन साखर उद्योगाला खर्‍या अर्थाने उर्जीतावस्था प्राप्त करुन दिली. आज शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपीप्रमाणे वेळेत संपूर्ण बिल अदा करणारा राज्यातील एकमेव कारखानाअसा नावलौकिक अजिंक्यतारा कारखान्याचा आहे. अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीत प्रत्यक्ष सूत उत्पादास प्रारंभ करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्व. भाऊसाहेब महाराज आणि सातारा तालुक्याचे स्वप्न पुर्णत्वास नेले. सूत गिरणीच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला असून प्रत्येक हाताला काम देण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खर्‍या अर्थाने सत्यात उतरले आहे. कारखाना कार्यस्थळावर सुरु करण्यात आलेल्या अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रीकी महाविद्यालयामुळे सातारा तालुक्यासह जिल्हाभरातील गोरगरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली. मुलींना मोफत शिक्षण देणार्‍या या महाविद्यालयाने असंख्य गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि इंजिनियर्स घडवले आहेत. अजिंक्यतारा सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी- विक्री संस्थेच्या माध्यमातून सातारा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मालाला दर्जा आणि रास्त भाव मिळवून दिला जातो. शेतकर्‍यांचा माल अधिक दर्जेदार असावा, त्याला चांगला भाव मिळावा म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून संस्थेच्या कोल्ड स्टोरेज युनीटची उभारणी झाली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आधूनिक शेतीची ओळख होण्यासाठी फळे, फुले संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय ख्यातीप्राप्त निसर्ग कृषी प्रदर्शनात दरवर्षी शेतकर्‍यांची जत्रा भरते आणि या आधुनिक कृषी प्रदर्शनात जिल्हाभरातील शेतकर्‍यांना आपण शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो. शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी गहू- ज्वारी, तांदूळ महोत्सव आयोजित केले जात असून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांती घडली आहे. ■ जल, सिंचनक्रांती ...■ स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, हे स्वप्न उराशी बाळगून उरमोडी धरणाची पायाभरणी केली. आज धरण मोठ्या दिमाखाने उभे असून या धरणातील पाणी कालव्यांद्वारे तालुक्याच्या कानाकोपर्‍यात पोहचले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन उरमोडी धरणाचे पाणी शेतकर्‍याच्या शेतात पोहचवून स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार केले आहे. सातारा आणि जावली तालुक्यात असंख्य बंधारे बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघात जल क्रांती घडवून आणली आहे. जावली सारख्या दुर्गम, डोंगराळ भागात ठिकठिकाणी बांधलेल्या बंधार्‍यांमुळे परिसरातील पाणी टंचाई कायमची दूर झाली आहे. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी बंधारे बांधले असून या बंधार्‍यांमुळे हजारो हेक्टर जमिनीला बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा शेतीसाठी नियोजनबध्द वापर होत असल्याने सातारा- जावली मतदारसंघ खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाम झाला आहे. जावली तालुक्यातील ५४ गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी बोंडारवाडी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून हे धरण लवकरच पुर्ण होणार आहे. ■ पाणीप्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य ■ सातारा शहरासह सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गाव पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपुर्ण व्हावे, हे ध्येय ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारसंघातील पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करुन सातारा शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी त्यांनी कास धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून दिली. कास धरणाच्या उंची वाढविण्याच्या प्रत्यक्ष सुरुवात झाली. निधी अभावी या प्रकल्पाचे काम रखडले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता लवकरच पूर्णत्वास जात असून या महत्वकांक्षी योजनेमुळे सातारा शहरासह आजूबाजूच्या १५ ते २० गावांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. सातारा शहरालगत असलेल्या शाहुपूरी ग्रामपंचायतीला भेडसावणारा पाणीप्रश्‍नही नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सोडवला आहे. शाहूपुरीसह दिव्यनगरी, कोंडवे, अंबेदरे, दरे बु. आदी गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत. जावली तालुक्यातही याचपध्दतीने प्रत्येक गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून होत आहे. ■ पर्यटनाला चालना ■ सातारा शहर आणि परिसराला समृध्द असा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पर्यटनालाही चालना दिली आहे. सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालयासाठी नवीन, सुसज्ज आणि देखणी इमारत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे मध्यवर्ती बस स्थानकाशेजारी उभी राहिली आहे. येत्या काही दिवसांतच या नवीन प्रशस्त वास्तूत शिवकालीन व ऐतिहासीक वस्तू स्थलांतरीत केल्या जाणार असून या प्रशस्त वास्तू संग्रहालयामुळे सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. याशिवाय ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्याचा निश्‍चय आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला असून आगामी काळात हा संकल्पही पुर्णत्वास जाणार आहे. जागतीक वारसा स्थळामध्ये स्थान मिळालेले कास पठार पाहण्यासाठी देश- परदेशातून पर्यटक हजेरी लावतात. कास पर्यटनवाढीच्या दृष्टीने आ. शिवेंद्रसिंहराजेंनी बोगदा ते अनावळे या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम मार्गी लावले आहे तर कास, बामणोली भागातील १२ दुर्गम गावातील पोच रस्त्यांच्या कामासाठीही भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या जावली तालुक्यातही पर्यटनवाढीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रस्ताव तयार करुन त्यांच्या मंजूरीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे. कुसुंबी पर्यटनस्थळाला जोडणारे रस्ते, संपुर्ण मेढा भाग कास बामणोलीला जोडणारा रस्ता, कास बामणोली ते महाबळेश्‍वर रस्ता असे महत्वपुर्ण रस्ते तयार करुन दळणवळणाची उत्तम सोय करुन पर्यटकांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी महत्वपुर्ण पावले त्यांनी उचलली आहेत. ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या सज्जनगडावर जाण्यासाठी परळी येथून रोप वे करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. गोडोली येथील नैसर्गिक तळ्याच्या सुशोभोकरणासाठीही त्यांनी पाठपुरावा सुरु केला असून लवकरच यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. ■ साहित्य, कला, क्रीडा व संस्कृतीचे जतन ■ राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक चळवळीलाही उभारी देण्याचे महान कार्य सातत्याने केले आहे. विविध क्रीडा प्रकारात सातारा शहरासह जिल्हाभरातून खेळाडू तयार व्हावेत, यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शरिरसौष्ठव, भारोत्तोलन, कबड्डी, क्रिकेट, बॉक्सिंग, बास्केट बॉल, फुटबॉल, हॉकी, ऍथलेटीक्स आदी क्रीडा प्रकारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली असून अशा क्रीडा स्पर्धांना सातत्याने मदतीचा हात दिला आहे. स्वत: एक उत्तम धावपटू असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई, गोवा, सातारा आदीठिकाणी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले असून मॅरेथॉन मध्ये धावणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार अशी वेगळी ओळखही त्यांनी निर्माण केली आहे. मतिमंद खेळाडूंना आर्थिक मदत होण्याच्या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र राज्य डेफ क्रिकेट फेडरेशन विरुध्द मराठी सिने कलावंतांच्या प्रदर्शनीय क्रिकेट सामान्याचे तसेच मेढा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे नेटके आयोजन केले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच आज जिल्हा क्रीडा संकुलात बास्केट बॉल, बॅडमिंटन, स्विमिंग आदी खेळामध्ये खेळाडूंची संख्या वाढत आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने होत असलेल्या सातारा फेस्टीवलमुळे सांस्कृतिक चळवळ जोपासण्याचे कार्य आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हातून घडत आहे. साहित्यसंस्कृती वाढीसाठी सातार्‍यात होणारी साहित्य संमेलने, नाट्य संमेलने आदींसाठीही ते नेहमीच सहकार्याची भावना ठेवून साहित्य चळवळ वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ■ गरजूंना मदतीचा हात ■ मतदारसंघात चौफेर विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी समाजकार्याचा अनोखा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. जावली तालुक्यातील महु- हातगेघर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. उरमोडी, कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आदी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने व्हावे आणि त्यांचे प्रश्‍न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करुन जनतेला न्याय देण्याची भुमिका घेतली आहे. पवनचक्क्या, टोलनाके व औद्योगिक कंपन्या यामध्ये स्थानिक भुमिपुत्रांना प्राधान्य दिले जावे, यासाठी प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसून भुमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त, जळीतग्रस्त, उघड्यावर पडलेल्या कुटूंबांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांचा संसार सावरण्याचा प्रयत्नही त्यांनी अनेकदा केला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांतून हजारो रुग्णांना जगण्याची नवी दिशा दिली गेली. जयपूर फूट शिबीराच्या माध्यमातून दिव्यांगांना मोफत कृत्रीत हाप, पाय बसवले, हजारो दिव्यांगांना कुबड्या, तीनचाकी सायकल, व्हील चेअर देवून या बांधवांचे जगणे सुसह्य करुन एक आदर्श समाजसेवक कसा असावा, याचे मुर्तीमंत उदाहरण आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यारुपाने जिल्ह्याने पाहिले आहे. ■ सातारा शहराचा कायापालट ■ ऐतिहासिक सातारा शहराला आधुनिकतेकडे नेताना शहरातील सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण आणि दर्जेदार डांबरीकरण करण्याचा सपाटा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने लावला आहे. राज्य शासन, केंद्र शासनासह नगरोत्थान, जिल्हा नियोजन समिती, अशा मिळेल त्या योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहरातील रस्ते चकचकीत केले आहेत. पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला असून त्यामुळे वाहतूक कोंडी आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेवरुन सर्वच रस्त्यांचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पोवई नाका ते विसावा नाका (कोरेगाव रोड) या रस्त्याचे चौपदरीकरण, विसावा नाका ते कृष्णानगर या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे. मोळाचा ओढा- मध्यवर्ती बस स्थानक ते गोडोली नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १९ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. पोवई नाका, जिल्हा रुग्णालय ते जरंडेश्‍वर नाका या रस्त्याच्या रूंदीकरणाचेही काम युध्दपातळीवर सुरु आहे. सुसज्ज फीश मार्केट उभारणीसाठी दोन कोटी निधी उपलब्ध करुन दिला आहे. भाजी मंडईचे विस्तारीकरण, हॉकर्स झोन, पार्किंग झोन आदी अद्ययावत सोयी, सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले आहे. ■ सातारा- जावलीत विकासाचा झंजावात ■ सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे पुर्ण करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संपुर्ण मतदारसंघात विकासाचा झंजावात अखंड चालू ठेवला आहे. राजकीय गट- तट न पाहता विकासकामे केल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे हे एक लोकाभिमुख नेतृत्व असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दुर्गम आणि डोंगराळ जावलीच्या खोर्‍यातील खेड्यापाड्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सोन्याचे दिवस आले आहेत. कोट्यवधीची विकासकामे खेचून आणत आमदारांनी आपल्या कतृत्वाचा नारा जावलीच्या दर्‍याखोर्‍यात घुमवला आहे. मेढा पंचायत समितीची प्रशासकीय इमारत, न्यायालयाची सुसज्ज इमारत, पोलीस ठाण्याची इमारत, ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रशस्त इमारत व कर्मचारी निवासस्थान आदीसाठी कोट्यवधी रुपये निधी मिळवून देऊन ही सर्व कामे मार्गी लावली. मेढा ग्रामिण पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी १ कोटी ६९ लाखाचा निधी मिळवला. गेली ३० वर्ष रखडलेल्या कुसुंबी- कोळघर रस्त्यासाठी ९० लाखाचा निधी उपलब्ध करुन या रस्त्याचा प्रश्‍न महतप्रयासाने मार्गी लावला. वेण्णा नदीवरील भामघर पुलासाठी ६० लाख, खर्शी बारामुरे रस्त्यावरील मोठ्या पुलासाठी ४० लाख, पावगणी कुडाळ रस्ता व महू गावाजवळच्या पुलासाठी दोन कोटी ६० लाखण एकीव ते दुंद रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख निधी मिळवून दिला तर याच रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. बोंडारवाडी धरण, महू- हातगेघर रिंगरोडचे काम आणि या धरणाच्या प्रलंबीत कामांना चालना दिली. कोयना पुर्नवसीत गावांना नागरी सोयी- सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मेढा ते सातारा रस्त्यासाठी २५ लाख, आलेवाडी खिंड पदमलेमुरा, रेंगडीमुरा धनगर पेढा रस्त्याच्या कामासाठी ८२ लाख, रेंगडीमुरा- मेढा रस्त्यावरील पुलासाठी १ कोटी ५० लाख रुपये निधी मिळाला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या पाच वर्षात सातारा आणि जावली मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधी निधी उपलब्ध करुन दिला. बहुसं?य कामे मार्गी लागली असून उर्वरीत सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत. दुर्गम अशा जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. डोंगराळ भागातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडून प्रत्येक गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळेच्या इमारती बांधून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या भागातील जनतेला खर्‍या अर्थाने ज्ञानाची कवाडे खुली करुन दिली आहेत. केवळ विकासकामे करण्याकडेच कल न ठेवता आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून विकासाचा झंजावात असाच सुरु राहणार असून येत्या काही दिवसांत सातारा- जावली मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलेला पहावयास मिळेल हे निश्‍चित ! जनहिताचे निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करणारे नेतृत्व अशी ख्याती आ. शिवेंद्रसिंहराजे यांची आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामाच्या रुपाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे विचार पोहचले असून आ. शिवेंद्रसिंहराजे हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनतेतील प्रेम आणि जिव्हाळा एवढा वाढला की, सामान्य कार्यकर्ताच नव्हे तर सामान्य माणूसही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी थेट संपर्क साधू लागला. मागेल ते काम पुर्ण करण्याची धमक आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये असल्याने सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात डांबरी रस्ता, वीज, समाजमंदीर, अंगणवाडी, शाळा इमारत, पाणीपुरवठा योजना असा चौफेर विकास झाला आहे. जनसामान्य थेट आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे येवू लागल्याने आपोआपच ऋणानुबंध वाढत गेला आणि आ. शिवेंद्रसिंहराजे हे आपल्या घरातीलच एक सदस्य आहेत अशी भावना जनसामान्यांमध्ये वाढीस लागली. विवाह सोहळ्याला उपस्थित राहणारे आ. शिवेंद्रसिंहराजे कोणताही भेदभाव न ठेवता मतदारसंघातील जनतेच्या सुख- दुख:त नेहमीच सहभागी होत असतात. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनता यांचे घनिष्ठ नाते निर्माण झाले आहे. जनतेने वेळोवेळी टाकलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरवून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना भूरळ घातली. यामुळेच आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या भोवती युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ वाढू लागले. नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थावर सत्ता असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विविध पदांवर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांलाही संधी दिली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या निस्वार्थी स्वभावामुळे हजारो कार्यकर्ते त्यांच्याशी मनाने जोडले गेले आहेत. केवळ कार्यकर्त्यांची फौज सोबत मिरवणार्‍या नेत्यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. कार्यकर्त्यांना केवळ फिरवण्यापेक्षा त्यांच्या हातला काम मिळाले पाहिजे, कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, हीच भुमिका आ. शिवेंद्रसिंहराजे यांची असल्याचे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होते. आपला समाजसेवेचा वसा जपण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे नेहमीच प्रयत्नशील असतात. विकासाच्या झंजावातामुळे सातार्‍याप्रमाणेच जावलीतील कार्यकर्ते आणि सामान्य जनता आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत जोडली गेली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे कोणत्या राजकीय पक्षात आहेत, याहीपेक्षा ते जनतेच्या ह्रदयात कायस्वरुपी आहेत, हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सातार्‍यासह जावलीतील प्रत्येक गावात मुलभूत सोयी- सुविधा पुरवून, विकासापासून वंचीत राहिलेल्या जनतेला त्यांनी प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. सत्ता कोणाचीही असो मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी खेचून आणणारे एकमेव लोकप्रतिनिधी अशी ख्याती असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील अनेक महत्वकांक्षी प्रकल्पांना भरिव निधी मिळवून ही कामे मार्गी लावली आहेत. सातारा- जावलीचा विकास हाच आपला ध्यास हे ब्रीद घेतलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या कतृत्वाने हे ब्रीद सार्थ ठरवले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतीही तडजोड न करता आपले कर्तृत्व, जनतेचे प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा- जावली मतदारसंघाचा कायापालट केला आहे. हा मतदासंघ विकासाचा रोल मॉडेल ठरावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रयत्न असून आगामी काळात त्याचा प्रत्यय येईल, हे निश्‍चित! - अमर मोकाशी (जनसंपर्क अधिकारी, सातारा)

सामर्थ्य सोशल फौंडेशन समाजोपयोगी कार्य करेल : आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले

सातारा : शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा येथे सामर्थ्य सोशल फौंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेला मिळालेल्या प्रमाणपत्र आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. सामर्थ्य सोशल फौंडेशनचे अध्यक्ष ऍड गणेश चोरगे यांनी संस्थेची उद्दिष्टे, कार्ये व पदाधिकारी याबाबत माहिती दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन हे सामर्थ्य सोशल फौंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याचप्रमाणे संस्थेने विविध क्षेत्रामध्ये समाजोपयोगी कामे करावी, यासाठी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन केले जाईल. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष ऍड गणेश चोरगे, विक्रम फडतरे, प्रणव पवार, स्वप्नील नलावडे, आरिफ शेख, अमर जगताप, वैभव चंदनशिवे उपस्थित होते.

मनाेहर बर्गे यांना काँग्रेस निष्ठेचे फळ मिळाले : किशाेर बर्गे

काेरेगांव : गेली 35 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केल्यानेच मनाेहर बर्गे यांना काँग्रेस पक्षाने निष्ठेचे फळ दिल्याचे प्रतिपादन काेरेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तथा काेरेगांव विकास मंचचे अध्यक्ष किशाेर बर्गे यांनी व्यक्त केले. सातारा जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीसपदावर नव्याने निवड झालेल्या मनाेहर बर्गे यांचा काेरेगांव विकास मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यावेळी किशाेर बर्गे बाेलत हाेते.     युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजित भाेसले, प्रभाकर बर्गे, साेमनाथ शिंदे, राजु बागवान, प्रशांत भाेसले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती हाेती.    किशाेर बर्गे पुढे म्हणाले, स्व. आमदार दत्ताजीराव बर्गे यांच्यापासून आज अखेर बर्गे कुटुंबिय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. यापूर्वी स्व. दत्ताजीराव बर्गे यांनी सुध्दा जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्षपद भूषविले हाेते. 35 वर्षे पक्षाशी प्रामाणिक राहून काँग्रेस विचारधारा जनमानसात रुजवित लाेकांची कामे मार्गी लावणाऱ्या मनाेहर बर्गे यांची जिल्हा कमेटीवर झालेली निवड निश्चितच स्तुत्य आहे. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष वाढीचे काम अधिक प्रभावीपणे हाेईल असा विश्वासही किशाेर बर्गे यांनी व्यक्त केला.     सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मनाेहर बर्गे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले, पक्षाशी प्रामाणिक राहिल्यानेच ही संधी मिळाल्याचे सांगून काँग्रेस विचार अधिक भक्कम करण्याचा यापुढेही प्रयत्न राहिल.     यावेळी काेरेगांव विकास मंचच्या वतीने मनाेहर बर्गे यांचा पेढे, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रशांत भाेसले यांनी मानले. कार्यक्रमास काेरेगांव विकास मंचचे सदस्य, नागरिक उपस्थित हाेते.

ल्हासुरणे येथे महिलांनी एकत्रित येऊन साजरी केली शिवजयंती; हळदी-कुंकू, स्नेह भोजन कार्यक्रमांचेही आयोजन

कोरेगाव : ल्हासुरणें ता. कोरेगाव येथे सर्व जाती-धर्मातील महिलांनी एकत्रीत येऊन शिवजयंतीचा उत्साह उत्साहात साजरा केला. दरम्यान यावेळी शिवजयंतीनिमित्त हळदी-कुंकु, स्नेह भोजन कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. शिवजयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लासुर्णे महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्त प्रथमच हळदी कुंकू कार्यक्रम पार पाडून नवा संदेश दिला सर्वच जाती धर्मातील महिलांनी एकत्र येऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पाडला रांगोळी काढून महाराजांच्या मूर्तीचे पूजन केलं पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलन केले सर्वांमध्ये मोठा उत्साह व आनंद होता ज्या पद्धतीने आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो त्याच पद्धतीने आम्ही शिवजयंती सुद्धा साजरी करतो असाच संदेश बौद्ध धर्मातील महिलांचा यावेळी दिसला. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या सुप्रिया ताई सावंत उपस्थित होत्या त्यांनीही महिलांना संघटन बांधणी याविषयी मार्गदर्शन केले एकीचे बळ किती मोठं असतं हे सुप्रिया सावंत यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितल या कार्यक्रमासाठी रोहिणी उबाळे यांनी पुढाकार घेतला व सर्व महिलांना एकत्र आणलं कार्यक्रमासाठी सौ रत्नमाला उबाळे सौ सावित्री उबाळे सौ अनिता उबाळे व सर्व उबाळे इंगळे महिला वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे संयोजक रमेश उबाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग यांनी केले होता सर्व महिलांनी रमेश उबाळे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते अतीशय कल्पकतेतुन त्यांनीं हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानून कौतुकही केले शिवजयंतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम सस्नेह भोजन अशा पद्धतीचा कार्यक्रमाचे स्वरूप होते तसेच यावेळी सर्व महिला वर्गाने रमेश उबाळे यांना पुढील सामाजिक कार्य व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

Leave a comment