सातारा : सातारा जिल्हा बँक असोसिएशन व जनता सहकारी बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष, पुण्यशील सुमित्राराजे नागरी सहकारी पतसंस्था आणि ट्रस्टचे संस्थापक-चेअरमन, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संघटक सातारा जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशनचे उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी देवतांचे दर्शन व आई-वडिलांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आई सिंधू शरदराव चव्हाण, पत्नी सौ. निलम चव्हाण आणि कुटुंबातील इतरांनी त्यांचे औक्षण केले.
त्यानंतर क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांना गणेश गडकरी यांच्यातर्फे भोजन देण्यात आले.
वाढदिवसानिमित्त जयेंद्र चव्हाण यांना श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत सौ.वेदांतिकाराजे भोसले, देनिक ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणिटकर, सल्लागार संपादक देवेंद्र पळणिटकर, सातारा हॉस्पिटलचे डॉ. सुरेश शिंदे, सुहास जोशी, डॉ. श्रीकांत बोकील, डॉ. सुरेश महाजन, डॉ.अनिल घोलप, अमर जाधव, केदार शालगर, जिल्हा पत्रकार संघातर्फे हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी, अविनाश कदम, उमेश मोरे, सचिन देशमुख, सुशांत मोरे, नाना खैर, आबा बेंद्रे, पुण्यशील सुमित्राराजे नागरी सहकारी पतसंस्था व्यवस्थापक चौगुले, पुण्यशील सुमित्राराजे ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव ढाणे, शंकर धनवडे, भूषण पाटील, धनंजय जाधव, विजय बेंद्रे, महेश शिंदे, प्रदीप येवले, जनता बँकेचे मॅनेजर व कर्मचारी, कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, सौ. मालती साळुंखे व महिल मंडळ, भूषण पाटील, संजय देशपांडे, धनंजय जाधव, राजेंद्र माने, संतोष भोईटे, राहुल पाटील, अनिल पोळ, विश्वासराव माने, दिलीप म्हेत्रे, बाळासाहेब देशमुख, सुजित खुटाळे, संतोष गायकवाड, मिलींद घाडगे, योगेश भंडारे, विवेक शिंदे, युवराज जाधव, राजेंद्र जाधव, अमित लावंगरे, विशाल शेलार, दीपक शिंदे, रमेश शर्मा, छोटू पिसाळ, संदीप कर्पे, अक्षय मतकर, परशुराम सपकाळ, दत्ता शिंदे, कर्तव्य ग्रुप नरहर उभे, सुनील भंडारी आदींनी शुभेच्छा दिल्या.