Breaking News
11 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी 'एकला चलो रे' चा नारा देण्याची शक्यता आहे. महाआघाडीत जागावाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे राजू शेट्टी स्वबळावर लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी राज्यभरात वेगवेगळी आंदोलन करून सरकारला जेरीस आणलं. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी महाआघाडीची वाट निवडली. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरून महाआघाडीशी चर्चा सुरू झाली. काँग्रेस राष्ट्रवादीने स्वाभिमानीला सहा जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील तीन जागांवर शेट्टी ठाम होते. हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या जागा शेट्टींनी मागितल्या होत्या. बुलढाणा जागा रविकांत तुपकर आणि वर्ध्यात माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी जागा हवी होती. परंतु,यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे राजू शेट्टींनी सात ते नऊ जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या चार पाच दिवसांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीत याबद्दल राजू शेट्टी निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दलाल म्हणून काम करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. एवढेच नव्हे तर 'चौकीदार चोर है' अशी घोषणा देत राहुल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले होते. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी दलाल म्हणून काम करतात. अन्यथा त्यांना एअरबस या कंपनीचा ईमेल कसा मिळाला? यूपीए सरकारच्या काळातील एअरबसचे अनेक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचा आरोपही यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी केला.
नवी दिल्ली भारतीय संघात पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेला क्रिकेटपटू सुरेश रैना सध्या एका कारणामुळे त्रस्त आहे. त्याचं कारण तंदुरुस्तीचं नाही तर युट्यूबवर शेअर केलेला एक व्हिडिओ आहे. रैनाचा अपघाती मृत्यू झाल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलंय. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने रैनाने सर्वांना आवाहन करत ही अफवा असल्याचं म्हटलंय. कार अपघातात माझा मृत्यू झाल्याची बोगस बातमी पसरवली जातेय. ही बोगस बातमी माझं कुटुंब आणि मित्रांसाठी डोकेदुखी बनलीय. अशा बोगस बातम्यांकडे दुर्लक्ष करा, हे माझं सर्वांना आवाहन आहे. देवाच्या कृपेने मी ठणठणीत आहे. ज्या चॅनेल्सनी ही अफवा पसरवली आहे त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असं सुरेश रैनाने स्पष्ट केलंय. सुरेश रैना सध्या भारतीय संघात नाहीए. उत्तर प्रदेशच्या रणजी संघाकडून तो सामने खेळतोय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झारखंडविरोधात तो शेवटचा सामना खेळला होता. त्यात त्याने शानदार ७५ धावा केल्या होत्या. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरोधात सुरेश रैनाने शेवटचा सामना खेळला होता.
मुंबई, दि. ८ : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एस.टी महामंडळ वातानुकुलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करीत आहे. कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दर कपात करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घोषित केले. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली आहे. एस.टी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. सध्या, एस.टी. महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी झालेल्या तिकीट दरांमुळे खाजगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढवण्याचे उद्दिष्ट एस.टी महामंडळाने ठेवले असून प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरु करण्याची तयारी ठेवली आहे. वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित आरामदायी व किफायतशीर शयनयान प्रवासासाठी एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
पुणे : राज्य मार्ग परिवहन मंडळाने (एसटी) शिवशाही आसनी बससाठी देखील दिव्यांग व्यक्तींना आणि त्यांच्या समवेत असलेल्या एका व्यक्तीस तिकीट दरात ७० टक्के सवलत लागू केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून (दि. ७) करण्यात येईल. ही सवलत लागू होण्याआगोदर एखाद्या व्यक्तीने तिकीट आरक्षित केले असल्यास, त्यांना उर्वरीत रक्कमेचा परतावा दिला जाणार आहे. अपंगत्व असलेल्या राज्यातील व्यक्तींना बसच्या प्रवास दरामध्ये ७५ आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीस ५० टक्के सवलत देण्यात येते. तर, ६५ टक्के आणि त्या पेक्षा अधिक उपंगत्व असलेली व्यक्ती आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीस तिकीट दराच्या ५० टक्के सवलत देण्यात येते. सर्वसाधारण आणि निमआराम बस प्रवासासाठी ही सवलत लागू आहे. एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या बससेवेसाठी अशा प्रकारची सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे या बससाठी देखील प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना शिवशाही बस प्रवासासाठी सवलत लागू करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना शिवशाही बस प्रवासासाठी प्रवास रक्कमेच्या ३० आणि त्यांच्या समवेत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला ५५ टक्के रक्कम भरावी लागेल. ज्या दिव्यांग व्यक्तींनी ७ मार्च पुर्वी तिकीट आरक्षित केले असल्यास त्यांना व आणि त्यांच्या साथीदारांना तिकिटाच्या ७० ते ४५ टक्के रक्कमेचा परतावा देण्यात येईल. सवलतीच्या दराची रक्कम सरकार एसटी महामंडळास देणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
नवी दिल्ली : ?स्वच्छ सर्वेक्षण -2019? मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षणात ?बेस्ट परफॉर्मिंग स्टेट? चा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. येथील विज्ञान भवनात एका शानदार समारंभात ?स्वच्छ सर्व्हेक्षण-2019? चे निकाल घोषित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्तम 10 पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राला सर्वोत्तम (बेस्ट परफॉर्मिंग स्टेट) राज्याचा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, राज्य अभियान संचालक जयंत दांडेगावकर व सुधाकर बोबडे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा उपस्थित होते. राज्यातील 27 शहरांना कचरा मुक्त शहरांसाठी ?थ्री स्टार? दर्जा स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 27 शहरे कचरा मुक्त ठरली आहेत. यामध्ये मूल, वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, मंगळवेढा, महाबळेश्वर, पाचगणी, क-हाड, रत्नागिरी, मलकापूर, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, गडहिंग्लज, विटा, तासगाव, कोरेगाव या शहरांचा समावेश आहे. कचरा मुक्तीसाठी या शहरांना ?थ्री स्टार? दर्जा देण्यात आला आहे. या सर्व शहरांना केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कराड शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कार स्वच्छ सर्वेक्षणातील पश्चिम विभागात एकूण 19 पुरस्कार देण्यात आले यापैकी 13 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. यामध्ये कराड, लोणावळा, मूल, उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई, खोपोली, विटा, देवळाली-प्रवरा, इंदापूर, पोंभूर्णा , मौदा सीटी या शहरांचा समावेश आहे. एक लाख लोखसंख्या असलेल्या शहरामधून सातारा जिल्हयातील कराड, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या शहरांना स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई व खोपोली या शहरांना स्वच्छ शहरांचा पुरस्कार मिळाला आहे. 25 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या वीटा, देवळाली-प्रवरा व इंदापूर या शहरांनाही स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे तर 25 हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पोंभूर्णा, मौदा, मलकापूर या शहरांनाही पश्चिम विभागतून स्वच्छ शहरांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरिक प्रतिसादामध्ये नवी मुंबईला पुरस्कार 10 लाखा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील शहरांमध्ये नवी मुंबई शहराला स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या उत्त्म प्रतिसादाबद्दल पुरस्कृत करण्यात आले. 3 ते 10 लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठी चंद्रपूर शहराला गौरविण्यात आले, तर घन कचरा व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कार्यायाठी लातूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला. पन्हाळा स्वच्छ सर्वेक्षणात देशात 17 व्या स्थानी स्वच्छ सर्वेक्षणात नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठी असलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार बृन्हमुंबईला शहराला देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या शहराला देशातील 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत 17 वा क्रमांक मिळाला आहे. देशातील पाच शहरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये राजकोट, भिलाई नगर, विजयवाडा व गाजियाबाद या शहरांचा समावेश आहे. अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डास उत्तम स्वच्छ कॅन्टोनमेंट पुरस्कार देण्यात आला आहे. स्वच्छ रॅकिंगमध्ये पहिल्या शंभरात राज्यातील 24 शहरे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील 423 शहरांची रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या 100 शहरांत महाराष्ट्रातील 24 शहरांचा समावेश आहे. या शहरामध्ये नवी मुंबई (7), कोल्हापूर (16), मीरा-भाईंदर (27), चंद्रपूर (29), वर्धा (34), वसई-विरार (36), पुणे (37), लातूर (38), सातारा (45), पिंपरी-चिंचवड(52), उदगीर (53), सेालापूर (54), बार्शी (55), ठाणे (57), नागपूर (58), नांदेड-वाघाळा (60), नाशिक (67), अमरावती (74), जळगाव (76), कल्याण-डोबिंवली (77), पनवेल (86), अचलपूर (89),बीड (94) व यवतमाळ (96) या शहरांचा समावेश आहे. घन कचरा व्यवस्थापनात राज्यातील चार शहरे घन कचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रातील चार शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये लातूर, खोपोली, इंदापूर व मलकापूर या शहरांचा समावेश आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद मिळविण्यात प्रभावी कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील नवी मुंबई, चंद्रपूर, उमरेड व पोंभूर्णा या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
All England Championships: भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. सायनाने पहिल्या फेरीत स्कॉटलंडच्या कर्स्टी गिलमर हिचा २१-१७, २१-१८ अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. दोनही गेममध्ये सायनाला गिलमरने कडवी झुंज दिली. पण सायनाच्या अनुभवापुढे गिलमरची चपळता फिकी पडली. पहिल्या गेममध्ये ४ गुणांच्या तर दुसऱ्या गेममध्ये ३ गुणांच्या फरकाने सायनाने गिलमरला पराभूत केले. दुसऱ्या फेरीत सायनाची झुंज डेन्मार्कच्या लाईन जाएर्सफेल्ड (Line Kjaersfeldt) हिच्याशी होणार आहे. याबाबत बोलताना सायना म्हणाली की कडवी झुंज देणाऱ्या खेळाडूंबरोबर खेळायला कायम मजा येते. ज्यावेळी प्रत्येकालाच विजेतेपद हवे असते, तेव्हा सारेच प्राण पणाला लावून खेळतात आणि स्पर्धा अधिक चुरशीची होती. अशा वेळी तुम्हाला तुमच्या नैसर्गिक खेळाकडे लक्ष देणे आवश्यक असते. पण स्वतःवर दडपण देण्यात काहीही अर्थ नसतो. कारण जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच.
सातारा : किसान मरे तो चुनाव का मुद्दा, जवान मरे चुनाव का मुद्दा क्यों नही हो सकता, असं धडधडीत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यामुळे केवळ राजकीय फायद्यासाठीच आमचे ४० जवान पुलवामात ठार केले गेलेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.
सांगली : राज्यातील पत्रकारांच्या नोंदणी,हक्क,संरक्षण,वेतन, अधिस्वीकृती,घरकुल व पेन्शन योजना यासारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर संघटना व शासनाच्या समन्वयातून तोडगा काढणार असल्याचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने पत्रकारांच्या राज्यव्यापी समस्यांचे निवेदन आमदार पडळकर यांनाही देण्यात आले. त्यावेळी पत्रकारांच्या समस्याबाबत चर्चा करताना ते बोलत होते. एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतलताई करदेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी सर्वसमावेशक पत्रकार धोरण व पत्रकार संबंधित समित्यांचे पुनर्गठन यासह पत्रकारांच्या समस्येबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, इतर मंत्री आणि आमदार यांना राज्यभर निवेदने देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटक देवानंद जावीर, आटपाडी तालुकाध्यक्ष नंदकुमार विभुते,कार्याध्यक्ष विक्रम भिसे, सचिव अक्षय बनसोडे,मार्गदर्शक हमीदभाई शेख, भरत पाटील,यांच्यासह सर्व सभासद पत्रकारांनी पडळकर यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले,राज्यातील पत्रकारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांबाबत माहिती घेऊन संघटना व शासनाच्या समन्वयातून तोडगा काढण्यात येईल.यासाठी सर्व समस्यांची युनियनच्या माध्यमातून माहिती घेऊ व प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी सर्वसमावेशक पत्रकार धोरण व पत्रकारांशी संबंधित समितीचे पुनर्घटन करणेबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे म्हणाले. माध्यमकर्मींच्या समस्यांबाबत माहिती देताना जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके म्हणाले, राज्यातील प्रसारमाध्यमातील सर्व पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचाऱ्यांची नोंदणी आणि हक्क मिळणे,त्यांना आर्थिक लाभाच्या सुविधा मिळण्यासाठी समिती नेमून जिल्हानिहाय पत्रकार नोंदणी होणे आवश्यक आहे, पत्रकार संरक्षण कायद्यातील त्रुटी सुधारून सुरक्षेची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.मजीठिया वेतन आयोग, पत्रकार आवास योजना धोरणात सर्वसमावेशकता आणणे,अधिस्वीकृती समितीचे पुनर्घटन करून सुयोग्य कर्मचाऱ्याला अधिस्वीकृती देणे,बाळशास्त्री जांभेकर सन्मान पेन्शन योजनेत जाचक व कष्टदायक अटी दुरुस्ती करणे,प्रसारमाध्यमात अचूकतेने महिला लैंगिक अत्याचार विरोधी तक्रार समितीची अंमलबजावणी करणे, यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यावर आपण अभ्यासपूर्वक तोडगा काढून हे प्रश्न तडीस न्यावेत अशी विनंती केली.
Leave a comment