सातारा : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधून ते सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवार, दि.3 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सिध्देश्वर पुस्तके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक भवन सातारा येथे झालेल्या महामंडळ सभेत आंदोलनाची हाक देण्यात आली.
प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, व्हा. चेअरमन महेंद्र अवघडे, बँकेचे संचालक, कराड पाटण, शिक्षक सोसायटीचे चेअरमन नामदेव घोलप, जिल्हा संघाचे पदाधिकारी रामचंद्र लावंड,मोहनराव जाधव, सुरेश गायकवाड, महेंद्र जानुगडे, राजेंद्र बोराटे, समीर बागवान, सुनिल सावंत, तानाजी ढमाळ, अनिल जायकर, दादासाहेब सरकाळे, गोरख साळुंखे, मच्छिंद ढमाळ, तुकाराम कदम, संतोष जगताप, प्रविण घाडगे आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
सिध्देश्वर पुस्तके म्हणाले, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यामक पदवीधर उपशिक्षकांची रिक्तपदे पदोन्नतीने त्वरित भरावीत या व अन्य मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाकडे अनेकवेळा निवेदने देऊन, चर्चा करुनही दुर्लक्ष होत आहे. शिक्षकांच्या बदल्यामध्ये गैरसोई झालेल्या शिक्षकांना विशेषतः महिला शिक्षिकांना सोईच्या शाळा देण्यात याव्यात तसेच मागील वर्र्षाचे रॅण्डम राऊंड या शैक्षणिक वर्षातील विस्थापित शिक्षक बंधू भगिनी यांन सम उपदेशाने बदलीची संधी मिळावी, या व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे संघटनेकडून अनेक वेळा निवेदन देऊन चर्चा करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने धरणे आंदोलनास उपस्थित रहावे, असे आवाहन पुस्तके यांनी केले
यावेळी शिक्षक बँकेचे संचालक भगवान धायगुडे, अनिल शिंदे, मोहन निकम, ज्ञानेश्वर कांबळे, गणेश तोडकर, दत्तात्रय कोरडे, राजकुमार जाधव, शंकर जांभळे, चंद्रकांत आखाडे, बंडोबा शिंदे, राजाराम खाडे, वैशाली जगताप, सौ. निर्मला बसागरे, कराड पाटण सोसायटीचे माजी चेअरमन संजय शेजवळ, बाजीराव शेटे सर्व तालुका संघाचे अध्यक्ष महेंद्र इथापे, शाम पवार, संतोष कदम, लालासो भंडलकर, सूर्यकांत कदम, तात्यासो सावंत, मोहन पाटील, सुरेश जेधे, हिम्मत जगताप, गणेश शिंदे, राजू घोरपडे, सतीश जाधव, सुरज तुपे, तानाजी साळुंखे, रवींद्र भोसले, मधुकर गावडे, पोपट चांगण, लालासो भोसले, सचिन जाधव, किरण खरात, सुरेश दुधाणे, विजय शिर्के, दादा थोरात प्रवीण गायकवाड, धनाजी चव्हाण, संभाजी जाधव, नवनाथ कणसे, नवनाथ खरमाटे, गणपत घाडगे, रामचंद्र चव्हाण, रियाज पटेल, शांताराम मासाळ राजेंद्र दगडे, सुनील धनावडे, नारायण धायगुडे मिलिंद जगताप, सुभाष जाधव, गणेश धुमाळ यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.