हे चांगल्या लोकप्रतिनिधीचे लक्षण नाही : प्रभाकर देशमुख
दहिवडी : आपल्याला पालिका निवडणुकीत मते दिली नाहीत, म्हणून म्हसवडकरांना उरमोडीचे पाणी देणार नाही. असे म्हणणे हे चांगल्या लोकप्रतिनिधींचे लक्षण नाही, असा टोला अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी माजी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला, तसेच ही विधानसभेची निवडणूक माण-खटावच्या जनतेसाठी अस्तित्व, सन्मान व स्वाभिमानाची निवडणूक आहे. जनतेला भयमुक्त करण्यासाठीची निवडणूक असल्याचेही त्यांनी सांगितले.
म्हसवड येथील राजवाड्यात अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ युवक मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, युवा नेते मनोज पोळ, प्रा. विश्वंभर बाबर, दिलीप तुपे, बबन वीरकर, बाळासाहेब माने, तेजसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, गोरख शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ?शहरातील जनतेने गुंडगिरी, दहशत अनुभवली आहे. अनेक तरुण पोलिस व कोर्ट कचेर्यांच्या चक्रात अडकून त्यांच्या आयुष्याची फरफट झालेली सगळ्यांनी बघितले आहे. ज्येष्ठांचा अपमान व अवहेलना आपण सहन केली. या सर्वांचा कडेलोट झाल्यामुळे मागील पालिका निवडणुकीत सर्वांनी एकत्रित परिवर्तन घडवून शहरात शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळवले. सर्वसामान्य जनता पेटून उठली व एकत्र झाली, तर काय घडू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळे माझी बदनामी करण्याचा विरोधकांनी प्रयत्न सुरू केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझ्याबद्दल तक्रार करून काहीही साध्य झाले नाही. या दोघांनी विरोधकांच्या तक्रारीत काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. माझी संपत्ती शासनाच्या वेबसाईटवर आहे. ती सर्वांना पाहण्यासाठी खुली आहे.?
या वेळी श्रीमंत भैयासाहेब राजेमाने युथ फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ मंडळी, युवक उपस्थित होते.